coronavirus: सौम्य, मध्यम व तीव्र कोरोना कसा ओळखाल? जाणून घ्या...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2020 03:26 AM2020-07-09T03:26:20+5:302020-07-09T03:26:26+5:30
कोरोनाचा संसर्ग झाल्यावर बहुतांश जणांमध्ये तो सौम्य किंवा मध्यम स्वरूपाचा आहे असे म्हटले जाते. पण आपल्याला झालेला कोरोना हा नेमका सौम्य, मध्यम स्वरूपाचा आहे आणि ही पातळी ओलांडल्यावर त्याला कधी तीव्र किंवा गंभीर मानायचे हे आपल्याला माहिती असायला हवे.
- अमोल अन्नदाते,
(लेखक बालरोगतज्ज्ञ
असून, वैद्यकीय साक्षरतेसाठी कार्यरत आहेत.)
- कोरोनाचा संसर्ग झाल्यावर बहुतांश जणांमध्ये तो सौम्य किंवा मध्यम स्वरूपाचा आहे असे म्हटले जाते. पण आपल्याला झालेला कोरोना हा नेमका सौम्य, मध्यम स्वरूपाचा आहे आणि ही पातळी ओलांडल्यावर त्याला कधी तीव्र किंवा गंभीर मानायचे हे आपल्याला माहिती असायला हवे.
- आॅक्सिजनची पातळी ९४ पेक्षा जास्त असेल तर सौम्य, ९० ते ९४ असेल तर मध्यम आणि ९० पेक्षा कमी असेल तर गंभीर मानला जातो.
- श्वासाची गती २४ पेक्षा कमी असेल तर सौम्य, २४ ते ३० असेल तर मध्यम आणि ३० पेक्षा जास्त असेल तर गंभीर कोरोना आहे, असे मानले जाते.
- सौम्य कोरोना असेल तर न्युमोनिया नसतो. मध्यम कोरोना असेल तर न्युमोनिया असतो. न्युमोनिया जास्त असेल तर गंभीर कोरोना आहेल असे समजले जाते.
- सी.टी. स्कॅन नॉर्मल किंवा २५ टक्के पेक्षा कमी असेल तर कोरोना सौम्य आहे. २५ ते ७५ टक्के असेल तर मध्यम आणि ७५ ते १०० टक्के असेल तर कोरोना गंभीर स्वरूपाचा आहे, असे समजले जाते.
-सौम्य कोरोनामध्ये आॅक्सिजनची गरज नाही. मध्यम कोरोनामध्ये आॅक्सिजन टार्गेट ९२ ते ९६ टक्के गरज भासू शकते. गंभीर कोरोनामध्ये आॅक्सिजन टार्गेट ९० टक्क्यांपेक्षा जास्त गरज असते
.
- सौम्य कोरोनामध्ये रक्तदाब आणि हृदयाचे ठोके दररोज किमान एकदा मोजण्याची गरज असते.
- मध्यम कोरोनामध्ये दररोज दर ६ तासांनी तर गंभीर कोरोनामध्ये दररोज दर ४ तासांनी ते मोजण्याची गरज असते.
-सौम्य कोरोनामध्ये श्वासाची गती आणि आॅक्सिजन दररोज दर २ तासांनी मोजण्याची गरज असते. तर गंभीर कोरोनामध्ये ती सतत मोजण्याची गरज असते.
-सौम्य व मध्यग कोरोनाच्या रुग्णांना लक्षणांपासून १० दिवसांनी सुट्टी मिळू शकते. मात्र, रुग्णाला तीन दिवस ताप नसावा आणि श्वास घेण्यास त्रास नसावा.
- गंभीर कोरोनाच्या रुग्णाला मात्र पूर्ण बरे झाल्याशिवाय सुट्टी दिली जाऊ शकत नाही.