Coronavirus : एन-95 मास्क कितीदा वापरू शकतो? समोर आली अशी माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2022 06:11 AM2022-02-01T06:11:27+5:302022-02-01T06:13:48+5:30

Coronavirus: कोरोनाचा प्रभाव कमी होऊ लागला असला तरी कोरोनानियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन सातत्याने केले जात आहे. त्यातही मास्क वापराबाबत विविध स्तरावरून सूचना केल्या जातात.

Coronavirus: How often can I use N-95 mask? | Coronavirus : एन-95 मास्क कितीदा वापरू शकतो? समोर आली अशी माहिती

Coronavirus : एन-95 मास्क कितीदा वापरू शकतो? समोर आली अशी माहिती

googlenewsNext

कोरोनाचा प्रभाव कमी होऊ लागला असला तरी कोरोनानियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन सातत्याने केले जात आहे. त्यातही मास्क वापराबाबत विविध स्तरावरून सूचना केल्या जातात. कोरोनापासून स्वत:चा बचाव करायचा असेल तर मास्क वापरणे गरजेचे आहे. त्यातही सुरक्षित मास्कला प्राधान्य आहे. 

सध्या वापरात असलेले मास्क
- एन-९५
- डबल लेअर
- सर्जिकल
- कापडी

कोणता मास्क कितीदा वापरावा?
- मास्क दिवसभर लावून फिरलात तर तो मास्क दुसऱ्या दिवशी वापरू नये, असा नियम आहे.
- त्यातही मास्क कापडाचा असेल तर 
तो वापरून झाल्यावर धुण्यास टाकावा.
- सर्जिकल मास्क एकदाच वापरावा. त्यानंतर 
तो फेकून द्यावा.

 एन-९५ मास्कबाबत...
- एन-९५ किंवा केएन-९५ मास्क थोडे दिवस वापरता येऊ शकतात.
-अमेरिकेच्या सेंटर ऑफ डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन (सीडीसी) यांच्या मते एन-९५ मास्क किमान पाच वेळा वापरता येऊ शकतो.
-कार्यालयीन कामकाजाच्या पूर्ण वेळेत एन-९५ मास्क वापरणे शक्य नाही, असेही सीडीसीचे म्हणणे आहे.
- मास्क किती वेळा वापरावा यापेक्षा तो कितीदा वापरला गेला, हे महत्त्वाचे आहे.
-कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथील तज्ज्ञांच्या मते एन-९५ मास्क दोन किंवा तीन दिवस वापरणे योग्य ठरते.

धोका काय?
- एन-९५ मास्क लावल्यानंतर श्वास घेतेवेळी काही धुलिकण मास्कवर अडकतात.
- मास्कवर मोठ्या प्रमाणात धुलिकण जमल्यास श्वासोच्छवास घेण्यास त्रास होतो.
- सतत हाच मास्क लावल्याने तो अधिकाधिक खराब होत जातो.
- या सगळ्यांमुळे एन-९५ मास्कची परिणामकारकता घटण्याचा धोका असतो.
- त्यामुळे शक्यतो हा मास्क दोन ते तीन दिवसच वापरावा असे तज्ज्ञांचे मत आहे.

Web Title: Coronavirus: How often can I use N-95 mask?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.