CoronaVirus : कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी प्लाझ्मा थेरेपी कशी ठरते फायदेशीर, जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2020 11:03 AM2020-04-12T11:03:44+5:302020-04-12T11:13:05+5:30
चीनमध्ये कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी वेगवेगळ्या थेरेपीजचा वापर करण्यात आला होता. त्यापैकी एक प्लाझ्मा थेरेपी.
कोरोना व्हायरसमुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कारण कोरोना व्हायरसमुळे मृत्यू होत असलेल्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. जगभरातून या महामारीला कसं रोखता येईल याचा विचार केला जात आहे. चीनमध्ये कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी वेगवेगळ्या थेरेपीजचा वापर करण्यात आला होता. त्यापैकी एक प्लाझ्मा थेरेपी. प्लाझ्मा थेरेपी कशी काम करते. याबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
काय आहे प्लाझ्मा थेरेपी
प्लाझ्मा थेरेपीचा वापर नेहमी संक्रमित आजारांसाठी होत आला आहे. म्हणून आता कोरोना व्हायरसपासून वाचवण्यासाठी या थेरेपीचा वापर केला जात आहे. या थेरेपीचा वापर करून रुग्ण बरा होऊ शकतो. असा दावा करण्यात आला आहे. या थेरेपीमध्ये पूर्णपणे रुग्ण बरा होण्यासाठी ३ ते ७ दिवसांचा कालावधी लागतो. असं म्हणतात की, पहिल्या महायुद्धात १९१८ मध्ये पसरलेल्या स्पॅनिश फ्लू पासून लोकांची सुटका करण्यासाठी प्लाझ्मा थेरेपीचा वापर करण्यात आला होता.
जेव्हा एखादी व्यक्ती कोरोना व्हायरसचा सामना करून त्यातून पूर्णपणे बरी होते. किंवा व्हायरसचं संक्रमण होण्यापासून वाचते तेव्हा एंटीबॉडीज तयार होतात आणि त्या व्यक्तीची इम्यून सिस्टिम काही वेळासाठी चांगली होते. इम्युनिटी सेल्समधून प्रोटिन्स उत्सर्जित होत असतात. जे प्लाझ्मामध्ये असतात. ब्लड प्लाझ्मामध्ये असलेल्या एंटीबॉडीजला औषधात रुपांतर करण्याासाठी ब्लड प्लाझ्माला वेगळं केलं जातं. त्यानंतर एंटीबॉडीज वेगळ्या काढल्या जातात. या थेरेपीला प्लाझ्मा डेराईव्ह थेरेपी असं म्हणतात. यामुळे रुग्णांच्या शरीरात रोगांपासून लढण्याची क्षमता वाढते. ( हे पण वाचा-Coronavirus : कोरोनाग्रस्त रूग्णाच्या मागे चालल्यानेही धोका, वाचा व्हायरसची मजबूत पकड कुठपर्यंत?)
प्लाझ्मा थेरेपीला एंटीबॉडी थेरेपी असं सुद्धा म्हटलं जातं. कोरोनाच्या रुग्णांवर या थेरेपीमुळे तात्काळ उपचार केले जातील. कोरोना व्हायरसचं संक्रमण थांबवण्यासाठी ICMR ने केरळमधील आरोग्य तज्ञांना प्लाझ्मा थेरेपीचा वापर करण्याची परवानगी दिली आहे. चीनमध्ये सुद्धा कोरोना व्हायरसचं संक्रमण थांबवण्यासाठी डॉक्टरांनी प्लाझ्मा थेरेपीचा वापर केला होता. या थेरेपीचा वापर चीनच्या शांघाईमध्ये कोरोना रुग्णाला बरं करण्यासाठी केला होता. ( हे पण वाचा-ब्लड शुगर कमी करण्यासाठी घरच्याघरी वापरा 'हे' उपाय, डायबिटीसचा धोका होईल कमी)