Coronavirus: फायद्याची बातमी! कोरोना काळात लहान मुलांच्या ताण-तणावाला कसे कमी करता येईल?
By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2021 07:15 AM2021-05-21T07:15:00+5:302021-05-21T07:15:14+5:30
तिसरी लाट मुलांवर धडकणार! याची दहशत लहान मुलांनासुद्धा बसल्याचे जाणवते.मुलांना खाटा, ऑक्सिजन मिळेल का? असं काही पालकांनी बोलून दाखवलं
Next
डॉ. मंगला बोरकर, प्राध्यापक, जेरियाट्रिक्स,
शासकीय वैद्यकीय रुग्णालय व महाविद्यालय (घाटी), औरंगाबाद
तिसरी लाट मुलांवर धडकणार! याची दहशत लहान मुलांनासुद्धा बसल्याचे जाणवते.मुलांना खाटा, ऑक्सिजन मिळेल का? असं काही पालकांनी बोलून दाखवलं; पण तशी वेळच कशाला येऊ द्यायची? आपण लस, मास्क, गर्दी टाळणे असे केले तर मुलांचं संरक्षण होईल.
डॉ. संजीव सावजी,मानसोपचार तज्ज्ञ
- सध्या लहान मुलांच्या ताण-तणावाला कसे कमी करता येईल?
- त्यांची शाळा, सुटीतील मौज, फिरणे, मित्रांबरोबर खेळणं सगळच बंद झालं. त्यामुळे पालकांनीच नवीन नवीन युक्त्या शोधून, काम सांभाळून मुलांना गुंतवून ठेवायला हवं.
- ज्या आई-वडिलांकडे स्मार्टफोन नाही किंवा एकच आहे, त्यांनी मुलांच्या अभ्यासाचं कसं करायचं?
- शाळेला सुट्टी असली की मजा वाटते; पण ती महिनोमहिने चालत राहिली तर मात्र मुलांना अनेक गोष्टींपासून वंचित राहावं लागतं.
- मुलांना आपल्या कामात सहभागी करून घ्या.
- जमेल तितकं मीडियापासून दूर ठेवा. व्यायाम, घरातल्या घरात खेळणं, गाणी, नवीन कौशल्य यांची आवड लावा. आपलं मुल जर आजरी पडलं तर त्याला बरं करण्यासाठी आपण आकाश पाताळ एक करू. मग याच्यापेक्षा त्याला आजारच नाही होणार याच्यासाठी दक्षता घेतली तर?
- स्वत: प्रयत्नपूर्वक सकारात्मक राहा म्हणजे तेही राहतील.
डॉ. प्रसाद देशपांडे, प्राध्यापक, मानसोपचार विभाग,
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, औरंगाबाद
- वर्षभरात महिला, मुलांवर अत्याचार तसेच पुरुषांमध्ये व्यसनांचे प्रमाण वाढले आहेत.
- आई-वडिलांच्या नैराश्य, भांडणाचा मुलांवर दुष्परिणाम होतो.
- मुलांच्या हातात मोबाइल गेल्यामुळे गैरवापर होऊ शकतो.
- मीडियामध्ये कोरोनाच्या बातम्यांचा भडीमार, आप्तांमधील कोरोनामुळे आजार, मृत्यूचा कोवळ्या मनांवर आघात होतो.
- घरातील आर्थिक अडचणींचा मुलांवरही ताण होतो.
- बंदिस्त राहण्यामुळे कोंडमारा होतो.
- पालकांच्या चिडचिडेपणामुळे मुलं अस्वस्थ होतात.
- पालकांनी संयम दाखवून व्यायाम, योगासने, यांचा उपयोग करून मुलांची मानसिक स्थिती संतुलित ठेवायला हवी. जिवंत असल्याची कृतज्ञता, भविष्यकाळाचा आशावाद मुलांच्या मनात जागवायला हवा.