Coronavirus : कोरोनामुळे शरीराला येणारी कमजोरी कशी दूर कराल? पोस्ट कोविड रूग्णांसाठी तज्ज्ञांचा सल्ला....

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2021 11:46 AM2021-04-27T11:46:42+5:302021-04-27T11:46:56+5:30

Croronavirus : कोरोना होऊन गेल्यावर रूग्णांना कमजोरीच्या समस्येचा मोठा सामना करावा लागत आहे. अनेक रूग्णांना तर बेडवरून उठताही येत नाहीये. अशात चला जाणून घेऊन कोविडनंतर घ्यावयाची काळजी.

Coronavirus : How will weakness corona treated post covid patient know this things | Coronavirus : कोरोनामुळे शरीराला येणारी कमजोरी कशी दूर कराल? पोस्ट कोविड रूग्णांसाठी तज्ज्ञांचा सल्ला....

Coronavirus : कोरोनामुळे शरीराला येणारी कमजोरी कशी दूर कराल? पोस्ट कोविड रूग्णांसाठी तज्ज्ञांचा सल्ला....

googlenewsNext

कोरोनाने (Croronavirus) देशात मोठं थैमान घातलं असलं आणि रूग्णांची संख्या वाढत असली तरी दुसरीकडे कोरोनातून बरे होणाऱ्यांचीही संख्या मोठी आहे. एका रिपोर्टनुसार, ८० टक्क्यांपेक्षा जास्त कोरोना रूग्ण घरीच ठीक होत आहेत. मात्र, यादरम्यान रूग्णांना कमजोरीच्या (Post Covid Weakness) समस्येचा मोठा सामना करावा लागत आहे. अनेक रूग्णांना तर बेडवरून उठताही येत नाहीये. अशात चला जाणून घेऊन कोविडनंतर घ्यावयाची काळजी.

कोविड १९ ची लागण झाल्यावर व्हायरससोबत लढताना आपल्या शरीरातील अ‍ॅंटीबॉडी नष्ट होतात. अशात कोरोना निघून गेल्यावर शरीरात फार कमजोरी येते. डॉक्टर सल्ला देतात की, कोरोना पॉझिटिव्ह झाल्यावर आपण मल्टी व्हिटॅमिन, व्हिटॅमिन सी आणि झिंक घेत रहा. (हे पण वाचा : लक्षणं किंवा चाचणी पॉझिटिव्ह येण्याची वाट पाहू नका; संसर्गापासून लांब राहण्यासाठी 'अशी' घ्या)

त्यानंतर जेव्हा कोविड-१९ आपल्या शरीरातून निघून जाईल तेव्हाही मल्टी व्हिटॅमिन्स बंद करून नये. सफरचंद हॉस्पिटल दिल्लीचे सीनिअर कन्सल्टंट डॉ. विनोद चैतन्य आजतकला सांगितले की, कोरोनातून ठीक झाल्यावर सर्वात महत्वाचं असतं आपलं शरीर पूर्णपणे हायड्रेट ठेवणे. त्यासाठी डाएटमध्ये फळं आणि भाज्यांचा समावेश करा. सोबतच मल्टी व्हिटॅमिन्स घेणं सुरू ठेवा.

तुम्ही कोरोना निगेटिव्ह झाल्यावर स्वत:वर जास्त तणावही येऊ देऊ नका. थोडं बरं वाटत आहे किंवा कोरोना निगेटिव्ह आले म्हणून लगेच चाला-फिरायला सुरूवात करू नका. डॉ. चैतन्य म्हणाले की, तुमचं शरीर अजून कमजोर आहे. त्यासोबत पोस्ट कोविडही लोकांना भरपूर समस्या येत आहेत. त्यामुळे कोरोनाचा ताप येणं बंद झालं तर स्वत:च्या ऑक्सीजन लेव्हलवर जास्त लक्ष द्या. तसेच घरातील इतर लोकांपासून अंतर ठेवा. सकाळी थोडा वॉक आणि एक्सरसाइज नक्की करा. (हे पण वाचा : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेपासून बचावासाठी काय खायचं आणि काय टाळायचं?; WHO नं दिल्या गाईडलाईन्स)

हार्ट केअर फाउंडेशन ऑफ इंडियाचे प्रेसीडेंट डॉ. केके अग्रवाल म्हणाले की, पोस्ट कोविड म्हणजे कोविड होऊ गेल्यावर रूग्णांनी हाय प्रोटीन डाएट घेतली पाहिजे. याने त्यांना कमजोरी दूर करण्यास मदत मिळेल. तसेच पाणी भरपूर पित रहावं. तसेच त्यांनी रूग्णांना आराम करण्यावर भर दिला. ते म्हणाले की, तुम्ही ठीक झाल्यावरही कमीत कमी दहा दिवस आराम केला पाहिजे. यादरम्यान तुम्ही थोड चालावं आणि हलका व्यायाम करावा. आराम जास्तीत जास्त करा. 
 

Web Title: Coronavirus : How will weakness corona treated post covid patient know this things

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.