सावधान! कोरोना संक्रमित लोकांनी चुकूनही करू नये या औषधाचं सेवन; WHO चा इशारा
By Manali.bagul | Published: March 3, 2021 05:11 PM2021-03-03T17:11:57+5:302021-03-03T17:23:47+5:30
CoronaVirus News & Latest updates : जागतिक आरोग्य संघटनेच्या तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार संक्रमित रुग्णांवर याचा कोणताही परिणाम दिसून येत नाही.
कोरोनाचे उपचार करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या औषधांचा वापर केला जात आहे. त्यात हाइड्रॉक्सीक्लोरोक्वीनचाही समावेश आहे. कोरोनाच्या माहामारीत सुरूवातीच्या काळात या औषधाचा वापर मोठया प्रमाणावर करण्यात आला होता. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही कोरोनाच्या माहामारीत हे औषध गेम चेंजर ठरत असल्याचे सांगितले होते. आता जागतिक आरोग्य संघटनेनं या औषधापासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार संक्रमित रुग्णांवर याचा कोणताही परिणाम दिसून येत नाही.
जागतिक आरोग्य संघटना तज्ज्ञांच्या समितीनं मंगळवारी दिलेल्या माहितीनुसार कोरोना रुगणांच्या उपचारात हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन या औषधाचा काहीही परिणाम दिसून येत नाही. यामुळे रुग्णालयात भरती होत असलेल्यांची संख्या कमी झालेली नाही तसंच मृताचे प्रमाणही कमी झालेले नाही.
याऊलट या औषधाच्या वापराचे प्रतिकुल परिणाम संभवण्याचा धोका वाढत आहे. सहा हजारांपेक्षा जास्त लोकांवर करण्यात आलेल्या परिक्षणानंतर या औषधाच्या परिणामांबाबत माहिती मिळू शकली आहे. WHOनं दिलेल्या माहितीनुसार या औषधाचा वापर आता संशोधनासाठी केला जाणार नाही.
गेल्या वर्षी देखील, जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना विषाणूने संक्रमित रूग्णांच्या उपचारांमध्ये हायड्रॉक्सीक्लोरोक्विनसह चार औषधे कमी प्रभावी असल्याचे नोंदवले होते. दरम्यान जागतिक आरोग्य संघटनेतर्फे एकूण चार औषधांची चाचणी घेण्यात आली असून या निकालांच्या पार्श्वभूमीवर असे दिसून आले आहे की ही औषधे रुग्णांचे जीव वाचविण्यात आणि संक्रमणाची तीव्रता कमी करण्यात प्रभावी ठरली नाहीत. वाढत्या गरमीत त्वचेवर खाज आल्यानं तुम्हीही होऊ शकता सोरायसिसचे शिकार; वेळीच जाणून घ्या उपाय
कोणत्या आजाराचे औषध आहे
हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनचा उपयोग मलेरियाचे उपचार आणि प्रतिबंधासाठी केला जातो. मलेरियाव्यतिरिक्त, हे औषध संधिवात उपचारात देखील वापरले जाते. जगभरात या औषधाचे सर्वाधिक उत्पादन भारतातच केले जात आहे आणि दरवर्षी कोट्यावधी लोकांच्या मलेरियाच्या उपचारांसाठी या औषधाचा वापर केला जातो. अरे व्वा! भारतीय वैज्ञानिकांनी विकसित केली खास टेक्नोलॉजी; हवेतच कोरोना व्हायरस मारला जाणार