Coronavirus : एक कोरोना पॉझिटिव्ह व्यक्ती किती लोकांना संक्रमित करू शकते? रिसर्चमधून धक्कादायक खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2021 02:44 PM2021-04-27T14:44:03+5:302021-04-27T14:50:51+5:30
Coronavirus : आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल म्हणाले की, एकीकडे हे आवश्यक आहे की, क्लीनिकल मॅनेजमेंटवर लक्ष केंद्रीत केलं जावं.
(Image Credit : business-standard.com)
कोरोना संक्रमित (Coronavirus) एक व्यक्ती ३० दिवसात ४०६ लोकांना संक्रमित करू शकते. असा दावा केंद्र सरकारने केला आहे. सोमवारी आरोग्य मंत्रालयाचे (Health Ministry) संयुक्त सचिव लव अग्रवाल (Luv Agrawal) म्हणाले की, जर सोशल डिस्टंसिंगचं पालन केलं गेलं नाही तर संक्रमण वेगाने वाढू शकतं. संक्रमणावर सोशल डिस्टंसिंग आणि मास्कच्या माध्यमातून तोडगा निघू शकतो.
लव अग्रवाल म्हणाले की, अनेक विश्व विद्यालयांनी रिसर्च केला आहे की, जर एक कोरोना संक्रमित व्यक्ती ६ फूट अंतराचं पालन करत नसेल तर ३० दिवसात ४०६ लोकांना संक्रमित करू शकतो. जर एखादा कोरोनो रूग्ण ५० टक्क्यांपर्यंत आपला धोका कमी करत असेल तर तो ३० दिवसात १५ लोकांना संक्रमित करू शकतो. (हे पण वाचा : Coronavirus : कोरोनामुळे शरीराला येणारी कमजोरी कशी दूर कराल? पोस्ट कोविड रूग्णांसाठी तज्ज्ञांचा सल्ला....)
ते पुढे म्हणाले की, जर संक्रमित व्यक्ती ५० टक्क्यांपर्यंत शारीरिक धोका कमी करत असेल तर असं आढळून आलं आहे की, त्याच्याकडून ३० दिवसात ४०६ ऐवजी १५ लोक संक्रमित होऊ शकतात. तेच जर संक्रमित व्यक्ती शारीरिक धोका ७५ टक्के कमी करत असेल तर त्याच्याकडून केवळ २.५ टक्के लोक संक्रमित होतील. म्हणजे कोरोनाची लागण असलेल्या रूग्णांना सोशल डिस्टंसिंग पाळणं फार गरजेचं आहे. (हे पण वाचाा : लक्षणं किंवा चाचणी पॉझिटिव्ह येण्याची वाट पाहू नका; संसर्गापासून लांब राहण्यासाठी 'अशी' घ्या काळजी)
आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल म्हणाले की, एकीकडे हे आवश्यक आहे की, क्लीनिकल मॅनेजमेंटवर लक्ष केंद्रीत केलं जावं. तर दुसरीकडे कोविडचा प्रसार नियंत्रित करण्यावर लक्ष केंद्रीत केलं पाहिजे. त्यांनी मास्कच्या उपयोगावर पुन्हा जोर दिला आणि म्हणाले की, याने धोका कमी होऊ शकतो.
(Image Credit : cnn.com)
लव अग्रवाल म्हणाले की, अध्ययनातून समोर येतं की, जर आपण कोरोना संक्रमित व्यक्तीपासून सहा फूट अंतरावर असू तर कोरोनाची लागण होण्याचा धोका कमी आहे. जर मास्कचा वापर योग्य प्रकारे केला नाही तर एका संक्रमित व्यक्तीला दुसऱ्याला संक्रमित करण्यासाठी ९० टक्के संधी मिळते.
ते म्हणाले की, जर कुणी मास्क लावत असेल आणि एक कोविड रूग्ण मास्क लावत नसेल तर अशात स्थितीत त्याच्याकडून दुसरी व्यक्ती संक्रमित होण्याची शक्यता ३० टक्केच आहे. जर दोन्ही कोरोना पॉझिटिव्ह व्यक्ती आणि निगेटिव्ह व्यक्ती मास्क वापरत असतील तर कोरोनाची लागण होण्याचा धोका १.५ टक्केच असतो.