जीवघेणा ठरतोय भारतात आढळलेला 'डबल म्यूटेंट स्ट्रेन'? इम्यूनिटी बचाव करू शकणार का; जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2021 07:15 PM2021-03-24T19:15:08+5:302021-03-24T19:19:19+5:30

CoronaVirus News & Latest Updates : महाराष्ट्र, केरळ, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातही कोरोनाचे नवीन स्ट्रेन सापडले आहेत.

Coronavirus in india covid-19 new double mutant variant coronavirus new strain | जीवघेणा ठरतोय भारतात आढळलेला 'डबल म्यूटेंट स्ट्रेन'? इम्यूनिटी बचाव करू शकणार का; जाणून घ्या

जीवघेणा ठरतोय भारतात आढळलेला 'डबल म्यूटेंट स्ट्रेन'? इम्यूनिटी बचाव करू शकणार का; जाणून घ्या

Next

भारतात कोरोना संक्रमित रुग्णांमध्ये कमालीची वाढ झालेली पाहायला मिळत आहे. देशात कोरोनाचा डबल म्यूटेंट वेरिएंट हल्ला करत असल्याचं दिसून येत आहे. आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार १८ राज्यांमध्ये कोरोना व्हायरस 'डबल म्यूटेंट' वेरिएंट आढळला आहे. हा वेरिएंट अधिक संक्रामक असून शरीरातील इम्यून सिस्टीम म्हणजेच  रोगप्रतिकारकशक्ती या व्हायरसशी लढण्यासाठी सक्षम असल्याचे सांगितले जात आहे. पण अजूनही कोणतेही पुरावे याबाबत याबाबत मिळालेले नाहीत.  व्हायरसचा हा प्रकार संक्रामकता वाढवत असल्याचं तज्ज्ञांचे म्हणणे आहे. 

सरकारने अशी माहिती दिली आहे की देशात कोरोनाची अशी 771 प्रकरणे आहेत, ती नवीन स्ट्रेनशी संबंधित आहेत. यामध्ये यूकेच्या कोरोना व्हेरिएंटची 736 प्रकरणे, दक्षिण आफ्रिकन प्रकारातील 34 प्रकरणे आणि ब्राझिलियन व्हेरियंटमधील एक प्रकरणांचा समावेश आहे. महाराष्ट्र, केरळ, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातही कोरोनाचे नवीन स्ट्रेन सापडले आहेत.

खरं तर, आरोग्य मंत्रालयाने १० राष्ट्रीय प्रयोगशाळांचा एक गट तयार केला होता, जी कोरोनाच्या वेगवेगळ्या जिनोम-सीक्वेन्सिंगवर परिक्षण करीत आहेत. मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, केरळमधील सर्व 14 जिल्ह्यांमधून 2032 नमुन्यांची जीनोम्सचे परिक्षण करण्यात आले असून यापैकी 11 जिल्ह्यांतील 123 नमुन्यांचा लोकांच्या प्रतिकारशक्तीवर कोणताही परिणाम झाला नाही. आता आणखी काळजी घ्यावी लागणार! किडनीवर हल्ला करतोय कोरोना व्हायरस; संशोधनातून मोठा खुलासा

याशिवाय आंध्र प्रदेशातील एकूण नमुन्यांपैकी 33 टक्के असे आहेत, तर तेलंगणात 104 पैकी 53 नमुन्यांमध्ये नवीन स्ट्रेन आढळले आहेत. कोरोनाचा हा नवीन प्रकार ब्रिटन, डेन्मार्क, सिंगापूर, जपान आणि ऑस्ट्रेलियासह जगातील अन्य 16 देशांमध्येही आढळला आहे. आरोग्य मंत्रालयाचे म्हणणे आहे की या नवीन प्रकारामुळे भारतात संसर्ग होण्याचे प्रमाण वाढत आहे, हे समजण्यासाठी अजून संशोधन आवश्यक आहे. तब्बल ५ वर्ष माणसांच्या शरीरात लपून होता हा व्हायरस; आता पुन्हा वेगानं होतंय संक्रमण, ९ रूग्णांचा मृत्यू

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी काही गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं आहे

मास्क लावा

सतत साबणानं  हात धूवत राहा

गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळा

आजारी व्यक्तीपासून योग्य अंतर ठेवून बोला

सतत सॅनिटायजरचा वापर करत  राहा.

Web Title: Coronavirus in india covid-19 new double mutant variant coronavirus new strain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.