देशात कोरोनाबाधितांचा आकडा ९ लाखांवर; पण 'या' ९ गोष्टी दिलासादायक
By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2020 05:32 PM2020-07-14T17:32:47+5:302020-07-14T17:41:16+5:30
CoronaVirus News & Latest Updates : भारतात एकूण कोरोना रुग्ण 9,06,752 असून त्यातील 5,71,460 रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे देशातील कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट 63.02% आहे.
जगभरासह भारतात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची धडकी भरवणारी आकडेवारी समोर येत आहे. संक्रमणाचा वेग कमी करण्यासाठी वेगवेगळ्या देशात राज्यात लॉकडाऊन केलं जात आहे. कोरोना टेस्टिंगबाबत गेल्या दोन महिन्यांत वेगाने काम झालेलं दिसून आलं. भारतात कोरोना रुग्णांचा पॉजिटिव्ह रेट 7.44 आहे. मे महिन्यात हा आकडा 4.14 होता. म्हणजेच जितक्या जास्त टेस्ट केल्या जात आहेत तितके जास्त रुग्ण दिसून येत आहेत. भारतात कोरोना रुग्णांची संख्या 9 लाखांवर पोहोचली आहे.
भारतात एकूण कोरोना रुग्ण 9,06,752 असून त्यातील 5,71,460 रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे देशातील कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट 63.02% आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार रिकव्हरी आणि मृत यांच्यातील गुणोत्तर 96.01%:3.99% आहे. देशात 63.02% लोक रिकव्हर झाले असून लडाख, दिल्ली, उत्तराखंड, छत्तीसगढ़, हिमाचल प्रदेश आणि हरियाणामध्ये रिकवरी रेट 75 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. भारतातील कोरोना पॉजिटिव्ह रुग्णांच्या तुलनेत मृत्यूदर कमी होत आहे. म्हणजेच भारत कोरोनामुळे होत असलेल्या मृतांच्या संख्येला आटोक्यात आणण्यासाठी यशस्वी होत आहे.
ICMR आणि भारत बायोटेकने मिळून कोरोनाची लस तयार केली आहे. आणि या लसीचे मानवी परिक्षण लवकरच सुरू होणार आहे. सुरूवातीला स्वयंसेवकांच्या सुरक्षेबाबत विचार करून लहान डोस दिले जाणार आहेत. ICMR ने स्वयंसेवकांवर एंटीबॉडी टेस्ट करण्याचे प्रोटोकॉल सुद्धा जोडले आहेत. पहिल्या टप्प्यात 1,500 स्वयंसेवकांना लस दिली जाणार आहे.
भारतात नऊ लाख रुग्ण असतानाही सरकारने कम्यूनिटी ट्रांमिशन होत असल्याचे मान्य केलेले नाही. आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिलेल्या माहितीनुसार भारतासारख्या देशात आपल्याकडे जो डेटा आहे त्याद्वारे आपण प्रश्नांची उत्तरं शोधू शकतो. भारतात कम्युनिटी ट्रांसमिशन नसून काही भागात लोकलाइज्ड ट्रांसमिशन असू शकते.
भारतात आता लाखोंच्या संख्येने टेस्ट करायला सुरूवात केली आहे. जुन आणि जुलैमध्ये होत असलेल्या चाचण्याची संख्या वाढली आहे. आयसीएमआरनं दिलेल्या माहितीनुसार १३ जुलैपर्यंत 1,20,92,503 सॅपल टेस्ट केल्या आहेत. देशभरातील 10 राज्यांमध्ये रुग्णांची संख्या वाढत आहेत. त्यापैकी आठ राज्यात रोज 1000 पेक्षा जास्त कोरोना रुग्ण सापडत आहेत. बाकीच्या राज्यांमध्ये तुलनेने सुधारणा आहे. आरोग्य मंत्रालयान होम आयसोलेशलनसाठी नियम तयार केले आहेत. तसंच ऑक्सिमीटरही देण्यात आले आहेत.
धक्कादायक! लक्षणं नसलेल्या महिलेमुळे तब्बल ७१ लोक झाले कोरोना पॉझिटिव्ह; पण कसे?
खरचं चीनने जाणीवपूर्वक कोरोना विषाणू पसरवला?; WHO ची टीम सत्य समोर आणणार