CoronaVirus : भारतात लसीशिवाय नष्ट होतेय कोरोनाची महामारी? तज्ज्ञांनी सांगितलं की.....
By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2020 02:50 PM2020-12-13T14:50:27+5:302020-12-13T14:56:54+5:30
CoronaVirus News & Latest Updates : आतापर्यंत ९३ लाख २४ हजारांपेक्षा जास्त लोक बरे झाले आहेत. ही आकडेवारी पाहून कोरोनाच्या लसीशिवाय माहमारी नष्ट होण्याच्या मार्गावर येत आहे. असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
जगभरात कोरोना व्हायरसच्या माहामारीने कहर केला आहे. आतापर्यंत ७ कोटी २१ लाखांपेक्षा जास्त लोकांना संक्रमणाचा सामना करावा लागला आहे. आतापर्यंत १६ लाखांपेक्षा अधिक लोकांचा कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झाला आहे. भारतातही संक्रमितांचा आकडा ९८ लाखांवर पोहोचला आहे. भारतात कोरोनातून बरे झालेल्यांचा दर ९४.८९ टक्के इतका आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत ९३ लाख २४ हजारांपेक्षा जास्त लोक बरे झाले आहेत. ही आकडेवारी पाहून कोरोनाच्या लसीशिवाय माहमारी नष्ट होण्याच्या मार्गावर येत आहे. असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
दिल्लीतील सफरजंग रुग्णालयातील डॉ. रूपाली मलिक यांनी अमर उजालाशी बोलताना सांगितले की, कोरोना व्हायरसचा प्रसार आता आटोक्यात आला आहे. असा विचार अनेकजण करत आहेत. पण आतापर्यंत काहीही निश्चित झालेलं नाही. या माहामारीवर आपण विजय मिळवला असं समजणं एवढ्यात योग्य ठरणार नाही. कारण देशात अनेक अशी राज्य आहेत. जिथं कोरोनाची दुसरी आणि तिसरी लाट दिसून येत आहे. तीन मोठ्या शहरांमध्ये कोरोनाचा प्रभाव कमी झाला असून मोठ्या प्रमाणात रोगप्रतिकारकशक्ती विकसित झाली आहे. लसीबाबत नवनवीन माहिती समोर येत आहे. असं असलं तरी लहानात लहान गोष्टीत दाखवलेला निष्काळजीपणा महागात पडू शकतो.
डॉ. रूपाली मलिक यांनी सांगितले की, ब्रिटनमध्ये फायजरच्या कोरोना लसीचे १२ वर्षांवरील लोकांवर परिक्षण सुरू आहे. जगभरात अजून काही लसींची तपासणी सुरू आहे. १८ वर्षांवरील वयोगटातील लोकांसाठी नवीन लस दिली जाणार आहे. सध्या लहान मुलांसाठी लसीकरण योजना तयार करण्यावर भर दिला जात आहे.
लस तयार करण्यासाठी ज्या पदार्थांचा वापर केला जातो. त्यामुळे एलर्जीचा सामना करावा लागू शकतो. अनेकांमध्ये ही माईल्ड स्वरूपाची एलर्जी असते. तर काही लोकांमध्ये गंभीर स्वरूपात एलर्जीची लक्षणं दिसून येतात. चिंता वाढली! कोरोनाच्या प्रसाराबाबत नवीन माहिती समोर; 'या' ५ Genes च्या लोकांना धोका जास्त
एनाफायलॅक्सिसमध्ये ही एलर्जी गंभीर स्वरूपाची असू शकते. ज्या लोकांना एलर्जीच्या समस्येचा सामना करावा लागतो त्यांनी लस घेण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा. याआधीही ज्या लसी आल्या होत्या. त्यात आजाराला रोखण्याची क्षमता ५०-५० टक्के होती. लस १०० टक्के प्रभावी ठरेल की नाही याबाबत सांगणं कठीण आहे. अजूनही लसीच्या परिणामांबाबत अधिक अभ्यास सुरू आहे. काळजी वाढली! समोर आलं कोरोना संक्रमणाचं नवं लक्षणं; संशोधनानंतर तज्ज्ञांचा दावा