CoronaVirus : चिंता वाढली! कोरोनामुळे पुन्हा देशात मागिल वर्षाप्रमाणेच स्थिती उद्भवणार? तज्ज्ञ म्हणाले की....
By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2021 10:54 AM2021-03-21T10:54:04+5:302021-03-21T11:03:36+5:30
CoronaVirus : देशात आतापर्यंत संक्रमित लोकांची संख्या एक कोटी 15 लाखांपेक्षा अधिक आहे.आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, १० लाखांपेक्षा अधिक लोक या आजाराने बरे झाले आहेत.
भारतात कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रकरणांमध्ये लसीकरण कार्यही वेगवान वेगाने सुरू आहे. 24 तासात २० लाखांपेक्षा अधिक लोकांवर लस दिली जात आहे. आतापर्यंत देशातील ९३ लाखांपेक्षा अधिक लोकांना कोरोना ही लस दिली गेली आहे. तथापि, येथे सक्रिय प्रकरणांची संख्याही वाढत आहे. देशात आतापर्यंत संक्रमित लोकांची संख्या एक कोटी 15 लाखांपेक्षा अधिक आहे. आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, १० लाखांपेक्षा अधिक लोक या आजाराने बरे झाले आहेत.
लस आल्यानंतर वाढतोय कोरोनाचा संसर्ग?
ऋषिकेश येथिल एम्सचे डॉ. प्रसन पांडा यांनी सांगितले की, ''कोरोनाची लस घेतल्यानंतर तुम्ही पूर्णपणे सुरक्षित राहू शकतात. पण दुसरी व्यक्ती सुरक्षित राहिल याबाबत सांगता येणार नाही. लसीमुळे 100 टक्के सुरक्षा मिळतेच असं नाही. लसीमुळे मिळणारी सुरक्षा 80 ते 85 टक्क्यांपर्यंत असू शकते. या व्यतिरिक्त शरीरात एंटीबॉडी किती प्रमाणात तयार होतात. यावर कोरोना संक्रमणाची तीव्रता अवलंबून असते. त्यासाठी नियमांचे पालन करणं गरजेचं आहे. लस घेतल्यानंतर कोरोनाचं संक्रमण झाल्यास त्याचे गांभीर्य कमी होते. याव्यतिरिक्त देशात सगळ्या लोकांना इतक्या लवकर लस देणं शक्य नाही. त्यामुळे निष्काळजीपणा केल्यास कोरोना संसर्गाचं प्रमाण वाढू शकतं.
खरंच शहरांमध्ये लॉकडाऊनची स्थिती उद्भवतेय?
डॉ. प्रसन पांडा सांगतात की, ''ज्याप्रमाणे कोरोनाच्या प्रकरणांमध्ये वाढ होत आहे. हे थांबवण्यासाठी आणि संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी अनेक शहरांमध्ये लॉकडाऊन आणि कर्फ्यू लावण्यात आला आहे. कोरोनाचा वेग असाच वाढत राहिला तर लोकांचा संपर्क टाळण्यासाठी सरकारकडून मोठं पाऊल उचलण्याची शक्यता आहे. ''
देशात पुन्हा लॉकडाऊनची स्थिती येणार?
लॉकडाऊनच्या स्थितीबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, ''एका वर्षापूर्वी देशात कोरोना आपले हात पाय पसरू लागला होता. माहामारीच्या सुरूवातीला वेगवेगळ्या देशांमधून प्रवास करून आले होते. त्यामुळे मोठ्या शहरात संक्रमण वाढत होतं. मोठ्या शहरांमध्ये गर्दी जास्त असते, त्यामुळे संक्रमण वेगानं पसरतं. पण सध्या लोकांच्या निष्काळजीपणामुळे लहान लहान गावांमध्येही संक्रमण वेगानं पसरत आहे. म्हणूनच लोकांनी नियमांचे पालन न विसरता करायला हवा. आधीपेक्षा जास्त सावधगिरी बाळगायला हवी.''
"लस घेतल्यानंतर जर तुम्हाला ताप येत असेल तर काळजी करू नका. अनेकदा लस घेतलेल्या ठिकाणी वेदना झाल्यास बर्याच लोकांना ताप देखील येतो. ही एक सामान्य प्रक्रिया आहे. जर आपल्याला ताप असेल तर आपण पॅरासिटामोल घेऊ शकता. अनेकदा ही समस्या दोन दिवसात बरे होते. तशाच प्रकारे इतर लसीमध्येही काही लोकांना समान समस्या येत आहेत, परंतु ही लस नवीन असल्याने लोकांचे अधिक लक्ष वेधले जात आहे.'' असेही त्यांनी यावेळी सांगितले आता आणखी काळजी घ्यावी लागणार! किडनीवर हल्ला करतोय कोरोना व्हायरस; संशोधनातून मोठा खुलासा