संक्रमणानंतर 'एवढ्या' महिन्यांनंतरही इम्यूनिटी ठरतेय प्रभावी, नव्या रिसर्चमधून खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2020 01:17 PM2020-11-04T13:17:35+5:302020-11-04T13:30:08+5:30
CoronaVirus News & latest Updates : एका नव्या रिसर्च रिपोर्टने रोगप्रतिकारकशक्तीबाबत दिलासादायक बाब स्पष्ट केली आहे. १०० लोकांवर करण्यात आलेल्या एका अभ्यासात सगळ्याच लोकांच्या शरीरात टी सेल्स रेस्पांस जनरेट झाला होता.
कोरोना व्हायरसच्या माहामारीत आतापर्यंत कोणत्याही लसीचा शोध लागलेला नाही, रोगप्रतिकारकशक्ती कोरोनाशी सामना कशी करते, हे पाहण्यासाठी संशोधकाचे सध्या नवीन संशोधन सुरू आहे. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोना व्हायरसपासून बचाव करण्यासाठी प्रभावी असलेल्या पेशी संक्रमणानंतर कमीत कमी सहा महिन्यांपर्यंत शरीरात राहू शकते. एका नव्या रिसर्च रिपोर्टने रोगप्रतिकारकशक्तीबाबत दिलासादायक बाब स्पष्ट केली आहे. १०० लोकांवर करण्यात आलेल्या एका अभ्यासात सगळ्याच लोकांच्या शरीरात टी सेल्स रेस्पांस जनरेट झाला होता. जे कोरोना व्हायरस प्रोटीन्सची चेन पूर्ण करण्यासाठी तसंच लढण्यासाठी सक्षम असतात. त्यात एका स्पाईक प्रोटीन्सचाही समावेश होता.
लक्षणं असलेल्या रुग्णांमध्ये ५० टक्के जास्त इम्यूनिटी असते
इंग्लँडमध्ये करण्यात आलेल्या एका रिसर्चनुसार ज्या लोकांमध्ये कोरोना व्हायरसची लक्षणं होती. त्यांच्यातील पेशींची संख्या लक्षण नसलेल्या रुग्णांच्या तुलनेत ५० टक्के जास्त होती. आतापर्यंत रोगप्रतिकारकशक्ती कितीवेळ राहू शकते याबाबत माहिती स्पष्ट झालेली नाही. सहा महिने हा रोगप्रतिकारकशक्ती चांगली राहण्याचा आतापर्यंतचा सगळ्यात मोठा काळ आहे. तरीसुद्धा काही रुग्णांना एकदा संक्रमण झाल्यानंतर पुन्हा संक्रमणाचा सामना करावा लागला होता.
यूकेच्या मेडिकल रिसर्च काउंसिलचे प्रमुख फियोना वाट यांनी सांगितले की, व्हायरसच्या इन्फेक्शनपासून मजबूत टी सेल्स तयार होतात. म्हणजेच लस दिल्यानंतरही असा परिणाम दिसू शकतो. T सेल्स ऐंटीबॉडीज नसतात. त्या पांढऱ्या पेशी असतात. ज्यामुळे मागच्यावेळी आलेलं आजारपण लक्षात ठेवून पुन्हा येत असलेल्या आजारांशी सामना केला जातो. गरजेच्यावेळी एंटीबॉडी सक्रिय केल्या जातात. १७ वर्षांपूर्वी सार्स कोविडची माहामारी पसरली होती. ती सुद्धा कोरोना व्हायरसप्रमाणेच होती. जे लोक सार्सने संक्रमित झाले होते. त्याच्यात व्हायरसशी लढत असलेले टी सेल्स आतापर्यंत आहेत.
कोरोनाचं नवं रूप ठरतंय घातक; ८५ टक्के रुग्णांमध्ये नवीन व्हायरस स्ट्रेनचा प्रसार
अमेरिकेतील टेक्सासच्या एका रुग्णालयात दाखल झालेल्या ५ हजार कोरोना रुग्णांवर करण्यात आलेल्या एका परिक्षणादरम्यान दिसून आले की, जवळपास ९९.९ टक्के केसेस कोरोनाचे रुप बदलल्यामुळे दिसून आल्या आहेत. म्हणजेच D614G व्हायरसचं हे रूप यासाठी जबाबदार आहे. कोरोना व्हायरसचं नवीन रूप मूळ व्हायरसच्या रुपापेक्षा जास्त संक्रामक आणि भयंकर असल्याचे सांगितले जात आहे. या रिसर्चसाठी तज्ज्ञांनी जवळपास ५ हजार रुग्णांमधील कोरोना व्हायरसच्या स्ट्रेनचे विश्लेषण केले होते. सगळ्यात आधी युरोपात कोरोना व्हायरसचा D614G स्ट्रेन पसरण्याची माहिती समोर आली होती.
पहिल्यांदा फेब्रुवारी महिन्यात कोरोना व्हायरसच्या D614G स्ट्रेनबाबत माहिती मिळाली होती. नंतर हा स्ट्रेन अमेरिका आणि इतर आशियाई देशांमध्ये काही आठवड्यातच पसरला. वैज्ञानिक आता SARS-CoV-2 चे हे रूप मोठ्या प्रमाणात वेगाने पसरत आहे का, याचा शोध घेत आहेत. माहामारीच्या सुरूवातीच्या दिवसात D strain व्हायरसमुळे जास्तीत जास्त लोकांना संक्रमणाचा सामना करावा लागला होता. कोरोनाकाळात थंडीच्या वातावरणात कसे राहाल निरोगी? जाणून घ्या तज्ज्ञांनी सांगितलेल्या ८ टिप्स
मार्चपर्यंत D614G स्ट्रेन जगाच्या वेगवेगळ्या भागात पोहोचला होता. एकूण संक्रमणाच्या एक चतृर्थांश रुग्णांच्या संक्रमणासाठी हा स्ट्रेन कारणीभूत होता. मे महिन्यापर्यत D614G स्ट्रेन असलेल्या रुग्णांची संख्या ७० टक्के होती. आता जगभरात एकूण कोरोना रुग्णांपैकी ८५ टक्क्यांपेक्षा अधिक रुगण D614G स्ट्रेनमुळे संक्रमित झाल्याचे सांगितले जात आहे. ऑगस्टमध्ये सिंगापूर नॅशनल युविव्हर्सिटीचे सिनिअर कंसलटंट पॉल तांबयाह यांनी सांगितले की, ''D614G स्ट्रेन अधिक संक्रामक आहे. पण मूळ व्हायरसच्या तुलनेत कमी जीवघेणा आहे.'' खुशखबर! जर्मन कंपनीच्या कोरोना लसीनं केली कमाल; मानवी चाचणीदरम्यान 'अशी' ठरली प्रभावी