CoronaVirus News: कोविडबाधित गर्भवतींनाही रक्तात गुठळ्या होण्याचा धोका

By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2020 01:09 AM2020-08-09T01:09:56+5:302020-08-09T06:51:51+5:30

ऑक्सफर्डच्या अंतस्त्रावशास्त्र शाखेचा अभ्यास । काळजी घ्यायला हवी

CoronaVirus infected pregnant women may face problem of Blood clots | CoronaVirus News: कोविडबाधित गर्भवतींनाही रक्तात गुठळ्या होण्याचा धोका

CoronaVirus News: कोविडबाधित गर्भवतींनाही रक्तात गुठळ्या होण्याचा धोका

Next

मुंबई : कोविड बाधित लहानग्यांमध्ये रक्ताच्या गुठळ्या होऊन त्यातून गंभीर परिणाम होत असल्याचे दिसून आले आहे. अशाच पद्धतीने आता कोविडबाधित गर्भवतींमध्ये रक्तात गुठळ्या होण्याचा धोका संभावत असून याविषयी अधिक खबरदारी बाळगणे गरजेचे असल्याचा निष्कर्ष ऑक्सफर्डच्या अंतस्त्रावशास्त्र शाखेचा अभ्यास अहवालात म्हटले आहे.

कोविड बाधित गर्भवतींमध्ये हार्मोन्सच्या बदलांमुळे व गर्भधारणेदरम्यान सुरु असलेल्या औषधोपचारांमुळे गुंतागुंत निर्माण होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे कोविड आणि गर्भावस्थेमुळे या रुग्णांच्या प्रकृती गंभीर होत असून त्यांच्या जीवाला धोका निर्माण होत आहे असे या अहवालात नमूद आहे. याविषयी, रक्तविकारतज्ज्ञ डॉ. शीला सोमण यांनी सांगितले, रुग्णांच्या रक्तवाहिन्यामध्ये छोट्या गुठळ्या झाल्याचे समोर आले. काही रुग्णांना आकडी येण्याची घटना घडली आहे. कोरोनाच्या संसगार्चा सर्वात जास्त परिणाम हा रक्तवाहिन्यांच्या आतील भागात इजा होते. त्यातून, रक्ताची गाठ तयार होते. ही गाठ शरीराच्या कोणत्याही भागात म्हणजेच मेंदू, ह्रदयात जाऊन बसली की रुग्णाचा आकस्मिक मृत्यू होतो. त्यामुळे अशा स्थितीतील अतिजोखमीचे आजार असणाऱ्या हेच टाळता यावे म्हणून सध्या रुग्णांना ब्लड थिनर्सचे इंजेक्शन देण्यात येत आहेत. कोरोनासारख्या विषाणू संसर्ग काळामध्ये होण्याची शक्यता अधिक असते. या पार्श्वभूमीवर ३ ते ९ महिन्यांच्या गर्भवतींनी विशेष काळजी घेण्याची गरज आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने काही महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. गर्भवती महिला वावरत असलेल्या घरांमध्ये दररोज स्वच्छता करणे आवश्यक आहे. तसेच गर्भवती महिलांनी सातत्याने हात स्वच्छ धुवावेत. करोना विषाणूचा धोका गर्भवतींना असण्याचा सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे या काळामध्ये श्वास घेण्यासाठी होणारा त्रास आणि कमी-अधिक प्रमाणात बदलणारा रक्तदाब या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्यासाठी गर्भवती महिलांनी सार्वजनिक ठिकाणी, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे . मास्क लावल्यानेही कदाचित या काळामध्ये घुसमट होण्याची शक्यता असल्याने घरातच राहण्याचा पर्याय गर्भवतींसाठी योग्य ठरू शकतो.

Web Title: CoronaVirus infected pregnant women may face problem of Blood clots

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.