थंडीच्या वातावरणात फ्लू आणि कोरोनामधील फरक 'असा' ओळखा? तज्ज्ञांनी दिली लसीबाबत महत्वाची माहिती

By manali.bagul | Published: November 27, 2020 12:09 PM2020-11-27T12:09:42+5:302020-11-27T12:10:36+5:30

CoronaVirus News & Latest Updates : कोरोना व्हायरस आणि सामान्य फ्लू  यांची लक्षणं काही प्रमाणात समान आहेत. वातावरणातील बदलांमुळे उद्भवलेले आजारपण आणि कोरोनाचे संक्रमण यातील फरक कसा ओळखायचा याबाबत तज्ज्ञांनी माहिती दिली आहे. 

Coronavirus information difference between normal flu and covid-19 coronavirus | थंडीच्या वातावरणात फ्लू आणि कोरोनामधील फरक 'असा' ओळखा? तज्ज्ञांनी दिली लसीबाबत महत्वाची माहिती

थंडीच्या वातावरणात फ्लू आणि कोरोनामधील फरक 'असा' ओळखा? तज्ज्ञांनी दिली लसीबाबत महत्वाची माहिती

Next

जगभरात कोरोना व्हायरसची रुग्णसंख्या वाढत आहे. आता कोरोनाग्रस्तांची संख्या ६ कोटी १० लाखांवर केली आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या  १४ लाख ३२ हजारांवर पोहोचली आहे. भारतातही रोज संक्रमणाचे केसेस जास्तीत जास्त दिसून येत आहेत.  हिवाळ्यामुळे वातावरणात गारवा वाढला आहे. अशा स्थितीत लोकांना सामान्य फ्लू होणं ही सामान्य गोष्ट आहे.  कोरोना व्हायरस आणि सामान्य फ्लू  यांची लक्षणं काही प्रमाणात समान आहेत. वातावरणातील बदलांमुळे उद्भवलेले आजारपण आणि कोरोनाचे संक्रमण यातील फरक कसा ओळखायचा याबाबत तज्ज्ञांनी माहिती दिली आहे. 

साधारण फ्लू आणि कोरोनामधील फरक कसा ओळखाल

दिल्लीतील जीबी पंत रुग्णालयातील डॉ. संजय पांडेय यांनी दिलेल्या माहितीनुसार ऑक्टोबर ते नोव्हेंबर मध्य या कालावधीत फ्लूच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. सामान्य लोकांना फ्लू आणि कोरोना यामधील अंतर कळणं कठीण होऊ शकते. जर फ्लू ची लक्षणं घसा खवखवणं, सर्दी होणं अशी लक्षणं जाणवत असतील तर लवकरच तपासणी करून घ्यायला हवी. काही लोक लक्षणं नसतानाही व्हायरसने संक्रमित होऊ शकतात. सध्या कोरोनाची चाचणी करणं सोप असल्यामुळे तुम्ही सहज चाचणी करून घेऊ शकता.

डॉ. संजय पांडेय यांनी सांगितले की, ''आता कोरोना व्हायरसबाबत जास्त माहिती उपलब्ध झालेली नाही.  इतर व्हायरस कधी येतात, किती वेळानंतर माहामारी पुन्हा येऊ शकते. याबाबत  आम्हाला माहिती आहे. परंतु कोरोना व्हायरसबाबत अजूनही कोणताही निश्चित डेटा मिळालेला नाही. वेगवेगळ्या देशातील शास्त्रज्ञ कोरोनाच्या प्रसाराबाबत नवीन माहिती  घेण्याचा प्रयत्न करत आहेत. 

पुढे त्यांनी सांगितले की, ''रॅपिड एंटीजन चाचणीचे रिपोर्ट्स काही मिनिटात मिळतात. आरटी पीसीआर या चाचणीचे रिपोर्ट येण्यासाठी वेळ लागू शकतो. साधारणपणे आरटी-पीसीआर चाचणीचे रिपोर्ट्स  ७ ते ८ तासात येऊ शकतात. पीसीआर चाचणीसाठी काही ठिकाणी २४ तासांचा कालावधी लागतो.''

दातांचा पिवळटपणा आणि काळे डाग कसे साफ कराल? डेंटिस्ट्सनी सांगितले चमकदार दातांचे उपाय

ही लढाई पूर्ण करण्यासाठी शासनाने दिलेल्या गाईडलाईन्सचे पालन करायला  हवे. त्यासाठी सगळ्यांनीच धैर्य ठेवायला हवे. सोशल डिस्टेंसिंगच्या नियमांचे पालन करा, गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळा,  सरकारने दिलेले नवीन नियम हे गर्दीला नियंत्रणात ठेवण्यासाठी असून व्हायरसपासून बचावासाठी नियमांचे पालन करणं गरजेचं आहे. 

 भारतातील सर्व लोकांना लस देणं ही सरकारची एक पॉलिसी आहे. कधी, कसं, कोणाला सगळ्यात आधी लस द्यायची याबबत शासनाने योजना तयार केल्या आहेत. लसीच्या किंमतींबाबतही वेगवेगळी माहिती समोर येत आहे. लस  जेव्हा बाजारात येईल तेव्हा ती सगळ्यांपर्यंत पोहोचेल. यामध्ये अनेकदा फसवणूकींचा सामना करावा लागू शकतो.  त्यामुळे सरकारचा निर्णय येईपर्यंत संयम पाळा.

चिंताजनक! ९४ टक्के यशस्वी लसीनेही कोरोनाचा प्रसार थांबणार नाही, मॉर्डनाच्या तज्ज्ञांचा दावा

सरकराने नवीन दिशा निर्देश दिले आहेत. केंद्रांकडून देण्यात आलेल्या माहितीत लॉकडाऊनचा उल्लेख करण्यात आला नाही. काही राज्यात नाईट कफ्यू लावण्यात आला आहे. कोरोनाच्या उद्रेकामुळे संपूर्ण देशभरात मार्च महिन्यापासून शाळा बंद आहेत. तर काही ठिकाणी शाळा पुन्हा सुरू करण्यासाठीचे प्रयत्न देखील केले गेले. मात्र कोरोनाचा प्रसार पुन्हा वाढत असल्याची परिस्थिती पाहून शाळा सुरू करण्याचा निर्णय मागे देखील घेण्यात आला आहे. 
 

Web Title: Coronavirus information difference between normal flu and covid-19 coronavirus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.