Coronavirus : रक्ताच्या गाठी तयार होऊन कोरोना रूग्णांचा मृत्यू का होतोय? वैज्ञानिकांनी सांगितलं कारण....
By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2021 12:12 PM2021-06-24T12:12:14+5:302021-06-24T12:15:20+5:30
कोरोनाच्या रूग्णांमध्ये रक्ताच्या गाठी का तयार होतात हे समजून घेण्यासाठी डबलिनच्या ब्यूमॉनट हॉस्पिटलमध्ये दाखल कोरोना रूग्णांवर रिसर्च करण्यात आला.
कोरोनाच्या रूग्णांमध्ये रक्ताच्या गाठी का तयार होतात, याचं कारण वैज्ञानिकांनी सांगितलं आहे. वैज्ञानिकांनी सांगितलं की, एका खासप्रकारच्या मॉलीक्यूलमुळे हे होतं. संक्रमित रूग्णांमध्ये या मॉलीक्यूलचं प्रमाण वाढल्याने रक्ताच्या गाठी तयार होतात आणि मृत्यूचा धोका वाढतो. हा दावा रॉयल कॉलेज ऑफ सर्जन इन आयरलॅंड यूनिव्हर्सिटी ऑफ मेडिसिनच्या वैज्ञानिकांनी केलाय.
का होतात रक्ताच्या गाठी?
कोरोनाच्या रूग्णांमध्ये रक्ताच्या गाठी का तयार होतात हे समजून घेण्यासाठी डबलिनच्या ब्यूमॉनट हॉस्पिटलमध्ये दाखल कोरोना रूग्णांवर रिसर्च करण्यात आला. या रूग्णांचे ब्लड सॅम्पल घेण्यात आले. ब्लड रिपोर्टमध्ये समोर आलं की, या रूग्णांमध्ये VWF मॉलीक्यूसचं प्रमाण वाढलं आहे. याने रक्ताच्या गाठी तयार होतात. तसेच रक्ताच्या गाठी तयार होण्यापासून रोखणारं मॉलीक्यूल ADAMTS13 चं प्रमाण कमी होतं. (हे पण वाचा : CoronaVirus: ...म्हणून अत्यंत धोकादायक आहे करोनाचा ‘Delta Plus’ व्हेरिएंट, भयभीत करणारा आहे याचा फैलाव)
रिसर्चमधून समोर आलं मृत्यूचं कारण
दोन्ही मॉलीक्यूलचं बॅलन्स बिघडल्याने रक्ताच्या गाठी तयार होता आणि मृत्यूचा धोका वाढतो. याआधीच्या अनेक रिपोर्टमधून हे स्पष्ट झालं आहे की, कोरोनाच्या अनेक रूग्णांचा मृत्यू रक्ताच्या गाठी तयार झाल्याने झाला आहे. रिसर्चर डॉ. जॅमी ओ'सुलीवन म्हणाले की, कोरोनाच्या रूग्णांमध्ये ADAMTS13 आणि VVF चं प्रमाण मेंटेन ठेवण्यासाठी आणखी रिसर्च करण्याची गरज आहे.
वॅक्सीनेशननंतरही आल्या समोर अशा केसेस
आरोग्य मंत्रालयाने नुकताच एक रिपोर्ट जारी केला. ज्यानुसार कोवीशिल्ड वॅक्सीन घेतल्यानंतर २६ अशा संशयास्पद केस समोर आल्या ज्यांना ब्लीडिंग आणि रक्ताच्या गाठी तयार झाल्याच्या समस्या झाल्या. गंभीर साइड इफेक्ट्सच्या भीतीने अनेक देशांनी या वॅक्सीनला सस्पेंड केलं किंवा बंदी घातली आहे. मात्र, अनेक हेल्थ एक्सपर्ट्सचं मत आहे की, कोवीशिल्डचे साइड इफेक्ट्स या वॅक्सीनच्या फायद्यापेक्षा कमी आहेत. भारतात पहिल्यांदाच कोवीशिल्डमुळे होणाऱ्या गंभीर नुकसानाला अशाप्रकारे स्वीकारण्यात आलंय.
४९८ केसेसचा अभ्यास
मंत्रालयाने आपल्या रिपोर्टमध्ये सांगितलं की, त्यांनी एकूण ४९८ केसेसचा रिसर्च केला. जे गंभीर होते. यातील त्यांना २६ अशा केसेस सापडल्या ज्यांच्यत कोविशिल्ड वॅक्सीन घेतल्यावर रक्तस्त्राव किंवा रक्ताच्या गाठी तयार होण्याची शक्यता आहे. कोवॅक्सीन घेतल्याववर रक्ताच्या गाठी तयार होणे किंवा रक्तस्त्राव होणे अशा काहीच समस्या दिसल्या नाहीत.