आता हवेतूनही होऊ शकतो कोरोनाचा प्रसार; खरंच सोशल डिस्टेंसिंगने संसर्गापासून बचाव होईल? 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2020 11:08 AM2020-07-07T11:08:26+5:302020-07-07T11:10:54+5:30

CoronaVirus News Updates : कोरोना व्हायरस हवेत दीर्घकाळपर्यंत जीवंत राहू शकतो. अनेक मीटरचा प्रवास करून लोकांना संक्रमित करू शकतो असे तज्ज्ञांनी म्हटले आहे. 

CoronaVirus : Know about worry and social distancing standards as corona virus is airborne | आता हवेतूनही होऊ शकतो कोरोनाचा प्रसार; खरंच सोशल डिस्टेंसिंगने संसर्गापासून बचाव होईल? 

आता हवेतूनही होऊ शकतो कोरोनाचा प्रसार; खरंच सोशल डिस्टेंसिंगने संसर्गापासून बचाव होईल? 

Next

कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रसारामुळे संपूर्ण जगभरात हाहाकार पसरला आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रसार जगभरातील तज्ज्ञांनी कोरोना विषाणूंबाबत जागितक आरोग्य संघटनेला पत्राद्वारे माहिती दिली आहे. ३२ देशातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, कोरोना व्हायरसचे अस्तित्व हवेतही असते. तज्ज्ञांना या पत्रातील माहिती भविष्यकाळातील जर्नलमध्ये प्रकाशित करायच्या आहेत. परंतू त्याआधीच या माहितीचा प्रसार सर्वत्र वेगाने झाला आहे. संशोधकांनी याबाबत जागतिक आरोग्य संघटनेला गाईडलाईन्स देण्याची मागणी केली आहे. 

न्यूयॉर्क टाइम्सच्या रिपोर्टनुसार WHO ला दिलेल्या पत्रात तज्ज्ञांनी म्हटले आहे की, हवेत असलेल्या सामान्य व्हायरसच्या कणांमुळेही लोकांमध्ये संक्रमण पसरत आहे. तसंच कोरोना व्हायरस हवेत दीर्घकाळपर्यंत जीवंत राहू शकतो. अनेक मीटरचा प्रवास करून लोकांना संक्रमित करू शकतो असे तज्ज्ञांनी म्हटले आहे. 

जर तज्ज्ञााचं हे म्हणणं खरं असेल तर बंद खोलीत किंवा इतर ठिकाणी संक्रमण वेगाने पसरण्याचा धोका असू शकतो. शाळा, दुकानं, ऑफिसेस अशा सार्वजनिक ठिकाणी व्हायरसचा प्रसार मोठया प्रमाणावर होण्याची शक्यता आहे. कारण दोन किलोमीटरपर्यंत कोरोना व्हायरसचं संक्रमण पसरू शकतं. पत्र लिहिणारे तज्ज्ञ ऑस्ट्रेलियातील क्वींसलँड यूनिवर्सिटी ऑफ टेक्नोलॉजीचे प्रोफेसर लिडिया मोरावस्का यांनी सांगितले की, आम्ही या दाव्याबाबत १०० टक्के ठाम आहोत.

तज्ज्ञांचा हा दावा लक्षात घेता WHO आपली गाईडलाईन्स बदलण्याची शक्यता आहे. ज्या ठिकाणी योग्य व्हेटिंलेशन नसेल अशा ठिकाणी लोकांना नेहमी मास्कचा वापर करावा लागेल. आत्तापर्यंत कोरोना व्हायरस खोकण्यातून किंवा शिंकण्यातून ड्रॉपलेट्समार्फत पसरतो अशी माहिती देण्यात आली होती.  जर तुम्ही मास्क लावल्यानंतरही ३ ते ६ फुटांचे अंतर ठेवाल तर संक्रमणापासून लांब राहू शकता. 

हवेतील सुक्ष्म ड्रॉपलेट्स सक्रीय असल्यामुळे इतरांकडे संक्रमण पसरतं. हे ड्रॉपलेट्स रेस्पिरेटरी ड्रॉपलेट्सच्या संक्रमणाचं कारण ठरू शकतात. अशा स्थितीत सोशल डिस्टेंसिग कितपत सुरक्षित असा सवाल उपस्थित केला जात आहे.

या संशोधनातून समोर आलेल्या माहितीनुसार कोविड 19 ने संक्रमित व्यक्ती एखाद्या ठिकाणाहून वावरत असेल तर कोरोनाचं संक्रमण हवेत पसरण्याचा धोका असतो. वातावरणात असलेल्या व्हायरसच्या ड्रॉपलेट्समुळे इतरांना संक्रमण पसरू शकतं. त्यामुळे सध्या धोका वाढला आहे.  कॅलिफोर्निया सॅन डिएगो यूनिवर्सिटीतील  शोधकर्त्यांनी  वुहान, न्यूयॉर्क आणि इटलीतील माहितीवर संशोधन केले होते. वातावरणात असलेले संक्रमण साधारणपणे एयरोसॉलद्वारे  पसरते. या संशोधनात नोबेल विजेता मारियो जे मोलिना यांचा समावेश होता. 

युद्ध जिंकणार! भारतात कोरोनाची पहिली लस तयार होणार; जाणून घ्या 'या' १० महत्वाच्या गोष्टी

Coronavirus News: ठाणे आयुक्तालयात महिला अधिकाऱ्यासह आणखी दहा पोलीस कोरोनामुळे बाधित

Web Title: CoronaVirus : Know about worry and social distancing standards as corona virus is airborne

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.