Coronavirus : तुम्ही कुठे नोकरी करता? जाणून घ्या कोणत्या इंडस्ट्रीतील लोकांना कोरोनाचा जास्त धोका

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2020 11:13 AM2020-03-20T11:13:07+5:302020-03-20T11:19:08+5:30

भारतातही अनेक कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याची मुभा दिली आहे. पण काही लोकांसाठी हा पर्याय काही कामाचा नाही.

Coronavirus : Know how risky your job is in the times of coronavirus api | Coronavirus : तुम्ही कुठे नोकरी करता? जाणून घ्या कोणत्या इंडस्ट्रीतील लोकांना कोरोनाचा जास्त धोका

Coronavirus : तुम्ही कुठे नोकरी करता? जाणून घ्या कोणत्या इंडस्ट्रीतील लोकांना कोरोनाचा जास्त धोका

Next

कोरोनाचं जाळं दिवसेंदिवस जगभरात पसरत आहे आणि लोकांच्या मनात भीती वाढत जात आहे. याचा प्रभाव अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेवरही पडत आहे. उद्योग तर जवळपास थांबले आहेत. भारतातही अनेक कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याची मुभा दिली आहे. पण काही लोकांसाठी हा पर्याय काही कामाचा नाही. अशात कोणत्या नोकरदारांना कोरोना व्हायरसचा जास्त फटका बसू शकतो यावर एक रिसर्च समोर आला आहे.

सगळ्यात जास्त धोका कुठे?

न्यूयॉर्क टाइम्सने अमेरिकेतील नोकरदारांवर केलेल्या विश्लेषणानुसार, सर्वात जास्त धोका हेल्थकेअर आणि सर्व्हिस इंडस्ट्रीत काम करणाऱ्या लोकांना होणार आहे. हे विश्लेषण केवळ अमेरिकेशी निगडीत असलं तरी काही नोकऱ्या अशा आहेत ज्या युनिव्हर्सल आहेत. म्हणजे जगभरात कुणीही या नोकऱ्या करत असेल तर त्यांना कोरोनाचा अधिक धोका आहे. 

किती आहे धोका?

जगभरात हेल्थकेअर सेक्टरमध्ये काम करणाऱ्यांना या व्हायरसचा सर्वात जास्त धोका आहे. हे लोक इन्फेक्शनच्या केसेस तर बघतातच, पण सोबतच रोज अनेक लोकांना भेटतातही. हा व्हायरस जगभरात पसरण्याचं हेही कारण आहे की, हेल्थकेअर सेक्टरमध्ये सर्वात जास्त धोका आहे. 

हेल्थकेअरसोबत इथेही आहे धोका

सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये अनेक सेक्टर्स येतात, ज्यांचं काम करणं गरजेचं आहे. अनेक लोकांनी व्हायरसपासून बचावासाठी स्वत:ला क्वारेंटाइन करण्याचा निर्णय घेतला. पण फूड इंडस्ट्री सुरू राहण्यासाठी त्यांना काम करण्याची गरज आहे. तसेच ग्रॉसरी स्टोर्समध्ये राहणारे काम बंद करू शकत नाहीत, भलेही ग्राहक कमी झाले तरी. लोकांपर्यंत आवश्यक वस्तू पोहोचाव्या यासाठी त्यांचं काम करणं गरजेचं आहे. हे लोकही अनेकांच्या संपर्कात येतात.

डिलिवरी वर्कर्सना धोका

घरपोच सेवा देणाऱ्या कंपन्यातील कर्मचाऱ्यांना याचा धोका अधिक आहे. कारण त्यांनाही अनेकांसोबत भेटावं लागतं. एकाच दिवशी वेगवेगळ्या ठिकाणी त्यांना जावं लागतं. ज्यामुळे व्हायरसची लागण सहजपणे होऊ शकते. जेव्हा लोक घराबाहेर निघत नाहीत तेव्हा यांचं काम अधिक वाढतं. 

म्हणजे एकंदर काय तर ज्या नोकऱ्यांमध्ये किंवा कामांमध्ये ग्राहकांसोबत थेट संपर्क येतो त्या कर्मचाऱ्यांना कोरोना व्हायरसचा धोका असू शकतो.


Web Title: Coronavirus : Know how risky your job is in the times of coronavirus api

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.