CoronaVirus : कोरोना गेल्यानंतरही 'असे' होऊ शकतात परिणाम, रिसर्चमधून खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2020 05:32 PM2020-04-15T17:32:08+5:302020-04-15T17:33:49+5:30

जगभरातील शास्त्रांकडून कोरोनावर लस किंवा औषध शोधण्यासाठी अनेक रिसर्च केले जात आहेत.

CoronaVirus : Know the long term effects of the corona virus myb | CoronaVirus : कोरोना गेल्यानंतरही 'असे' होऊ शकतात परिणाम, रिसर्चमधून खुलासा

CoronaVirus : कोरोना गेल्यानंतरही 'असे' होऊ शकतात परिणाम, रिसर्चमधून खुलासा

Next

 कोरोना व्हायरसमुळे जगभरात भीतीचे वातावरण तयार झालं आहे. कारण दिवसेंदिवस कोरोना व्हायरसमुळे लागण होत असलेल्यांची आणि मृतांची संख्या वाढत आहे. जगभरातील शास्त्रांकडून कोरोनावर लस किंवा औषध शोधण्यासाठी अनेक रिसर्च केले जात आहेत. अशा परिस्थितीत मागील काही दिवसात समोर आलेले  रिसर्च चक्रावून टाकणारे आहेत. या रिसर्चमुळे कोरोनाबद्दल अर्लटनेस निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. कारण कोरोनाच्या टेस्टींग बरोबरचं क्लिनिकल परिक्षण सुद्धा बदलत आहे. हे रिसर्च भारताबाहेरील आहेत. 

रिसर्चकर्त्यांनी दिलेल्या एका रिपोर्टनुसार संक्रमित शवापासूनसुद्धा व्हायरस पसरू शकतो. थायलंडमध्ये अशी पहिली घटना समोर आली आहे. जिथे कोरोना व्हायरसचे संक्रमण मृत व्यक्तीपासून पसरलं गेलं. न्यूयॉर्कच्या जॉन जे  कॉलेज ऑफ जस्टिसमधील पॅथोलॉजीचे प्रोफेसर एंजलिक कोरथल यांच्यामते फक्त डॉक्टर नाही तर शवगृहाचे टेक्निशियन्स आणि मृत व्यक्तीच्या अंत्यसंस्कारात सामिल होत असलेल्या लोकांनी सावधानता बाळगणं गरजेंचं आहे.

अनेक देशांमध्ये कोरोनाने मृत्यू होत असलेल्यांची संख्या वाढत आहे. मृतांसाठी जागा कमी पडत आहेत. अशा परिस्थितीत मृत शरीरातून व्हायरसच्या संक्रमणाचा धोका जास्त असू शकतो. los Angle times ने चीनच्या एका रिसर्चचे उदाहरण दिलं आहे.

शास्त्रज्ञांनी चीनच्या हॉस्पिटलमधिल ३४ कोरोना रुग्णांवर परिक्षण केलं होतं.  हे रुग्ण कोरोनातून बरे झाल्यांनंतर त्यांची चाचणी दोनदा निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आलं होतं. पण त्या रुग्णांच्या लिव्हरवर नकारात्मक परिणाम झाला होता. १२ टक्के कोरोनातून बरे झालेल्या लोकांना श्वास घेण्याची समस्या उद्भवत होती. अजूनही कोरोनाचा वाढता फैलाव कोरोनावर लस शोधली जाण्यासाठी शास्त्रज्ञ सातत्याने प्रयत्न करत आहेत.

Web Title: CoronaVirus : Know the long term effects of the corona virus myb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.