पॉझिटिव्ह बातमी! भारतात सलग ८ दिवस कोरोना रुग्णांच्या मृत्यूंची १ हजारापेक्षा कमी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2020 07:13 PM2020-10-12T19:13:16+5:302020-10-12T19:53:29+5:30

CoronaVirus News & latest Updates : आता भारतात कोरोना रुग्णांची एकूण संख्या ही 70 लाखांवर पोहोचली आहे. 

CoronaVirus : less than 1000 coronavirus deaths recorded for 8 consecutive days in india | पॉझिटिव्ह बातमी! भारतात सलग ८ दिवस कोरोना रुग्णांच्या मृत्यूंची १ हजारापेक्षा कमी

पॉझिटिव्ह बातमी! भारतात सलग ८ दिवस कोरोना रुग्णांच्या मृत्यूंची १ हजारापेक्षा कमी

Next

कोरोना व्हायरसने गेल्या 7 ते 8 महिन्यांपासून  जगभरात थैमान घातलं आहे. कोरोना रुग्णांची रोज धडकी भरवणारी आकडेवारी समोर येत आहे. अशात कोरोनाच्या मृत्यूदराबाबत एक सकारात्मक माहिती समोर येत आहे.  कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना दिलासा देणारी आकडेवारी समोर आली आहे. गेल्या आठवड्याभरापासून  कोरोना रुग्णांच्या मृत्यूंची संख्या 1 हजारांपेक्षा कमी झाली आहे. आता भारतात कोरोना रुग्णांची एकूण संख्या ही 70 लाखांवर पोहोचली आहे. 

कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या ही देशात जास्त असून भारत जगात पहिल्या स्थानावर आहे.  भारतात सर्वाधिक रुग्ण संख्या असणाऱ्या 5 राज्यांमध्ये बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या ही 54.3 टक्के एवढी आहे. बरे होणाऱ्यांचे प्रमाण एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेत 86.17 टक्के आहे. रुग्णांचा मृत्युदर 1.54 टक्के इतका कमी आहे.

केंद्रीय आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार एकूण संख्या 7०,53,806 आहे. कोरोनामुळे आणखी 918 जण मरण पावले असून त्यामुळे बळींची एकूण संख्या 1,०8,334 झाली आहे. देशात सध्या 8,67,496 रुग्ण उपचार घेत आहेत. सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांचे प्रमाण एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेत 12.30 टक्के आहे. अवघ्या 13 दिवसांत कोरोना रुग्णांची संख्या 60 लाखांवरून 70 लाखांवर पोहोचली. 

या लक्षणामुळे समजू शकतो कोरोना आणि सामान्य तापामधील फरक

नॅशनल हेल्थ सर्व्हिंसच्या म्हणण्यानुसार शरीरातील तापमानाची तपासणी तीन प्रकारे करता येऊ शकते. पहिला प्रकार म्हणजे थर्मामीटर तोंडात किंवा काखेत ठेवून तसेच डिजिटल थर्मामीटर कानात घालून शरीराचे तापमान तपासता येते. थंडी वाजणे, ताप आणि कोरोना या तिघांमध्येही रुग्णाला खोकल्याचा त्रास होऊ शकतो. मात्र कोरोना विषाणूमुळे होणारा खोकला आणि इतर आजारांमधील खोकला यांच्यात मोठा फरक दिसून येतो.

कोरोनाचा संसर्ग झालेल्या व्यक्तीला एक तासाहून अधिक वेळ खोकला येत राहतो. दिवसाच्या २४ तासांमध्ये तीन किंवा त्यापेक्षा अधिक वेळा खोकला येऊ शकतो. जर अशा प्रकारे खोकला येत असेल तर कोरोनाची चाचणी करणे आवश्यक आहे. चव आणि वास घेण्याची क्षमता गमावणे हे कोरोनाचे प्रमुख लक्षण मानले जाते. मात्र असे लक्षण सामान्य थंडीतापामध्येही दिसून येते. अशा परिस्थिती जर अधिक अस्वस्थ वाटत असेल तर कोरोनाची चाचणी करून घ्यावी. डायबिटिसच्या 'या' औषधामुळे उद्भवू शकतो कॅन्सरचा धोका, कंपनीने परत मागवली औषधं

दरम्यान, तज्ज्ञ शिंक येणे हे कोरानाचे लक्षण मानत नाहीत. हे लक्षण केवळ थंडीतापामध्ये दिसून येते. जेव्हा जेव्हा तुम्हाला ताप, शिंका चव आणि वास जाणे अशी लक्षणे दिसतील तेव्हा प्रत्येकवेळी कोराना चाचणी करायची गरज नाही. मात्र शिंकल्यावर बाहेर फेकल्या जाणाऱ्या थेंबांमुळे कोरोनाचा फैलाव होऊ शकतो. त्यामुळे शिंकताना नाक आणि तोंडावर टिश्यू, रुमाल किंवा हात ठेवा. तसेच हात स्वच्छ धुवा. कोरोनामध्ये नाक गळण्याचे लक्षण क्वचितच दिसते. CoronaVirus : धोका वाढला! 'या' वस्तूंवर २८ दिवसांपर्यंत जीवंत राहू शकतो कोरोना विषाणू, तज्ज्ञांचा दावा

Web Title: CoronaVirus : less than 1000 coronavirus deaths recorded for 8 consecutive days in india

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.