लॉकडाऊनमुळे तुमच्याही मुलांचं मानसिक संतुलन बिघडतंय का? अशी घ्या काळजी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2020 01:44 PM2020-04-20T13:44:36+5:302020-04-20T13:56:43+5:30
कोरोना व्हायरसमुळे शाळा, कॉलेजेस, क्लासेस पूर्णपणे बंद झाले आहेत. याचा नकारात्मक परिणाम लहान मुलांच्या मानसिक आरोग्यावर होत आहे.
(image credit- coaching club)
कोरोना व्हायरसमुळे लाखों लोकांना मृत्यूचा सामना करावा लागला आहे. कोरोनाच्या महामारीने जगभरात कहर केला आहे. भीती निर्माण करण्यासोबतच कोरोना व्हायरसमुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. कोरोना व्हायरसचा वाढता प्रभाव थांबवण्यासाठी भारतात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. सोशल डिस्टेंसिंग आणि लॉकडाऊनसारख्या सुरक्षात्मक उपायांमुळे महामारीवर नियंत्रण मिळवण्यात यश येऊ शकतं. कोरोना व्हायरसमुळे शाळा, कॉलेजेस, क्लासेस पूर्णपणे बंद झाले आहेत. याचा नकारात्मक परिणाम लहान मुलांच्या मानसिक आरोग्यावर होत आहे.
लॉकडाऊनमुळे लहान मुलं आपापल्या घरात बंद आहेत. मुलांच्या मानसिक आरोग्यासाठी ही परिस्थिती नुकसानकारक ठरू शकते. घरात बंद असल्यामुळे चिडचिडपणा येतो. त्यामुळे ताण- तणाव वाढत जातो. अनेक ठिकाणी घरगुती हिंसेचे प्रकार सुद्धा घडले आहेत. त्यामुळे लहान मुलांमध्ये नैराश्याची भावना येते. ब्रिटेनमध्ये मानसिक आजारांचा इतिहास असलेल्या २ हजार १११ मुलांवर चॅरिटी यंगमाइंट्सद्वारे रिसर्च करण्यात आला होता. यात ८३ टक्के मुलं लॉकडाऊनमुळे मानसिकरित्या प्रभावित झाले होते.
लॉकडाऊनमध्ये मुलांची अशी घ्या काळजी
मुलांशी आपले अनुभव शेअर करा. शिवाय त्यांनाही एखादी गोष्ट सांगण्यासाठी प्रेरित करा.
खोकताना, शिंकताना तोंड झाकून घेणं, सोशल डिस्टन्सिंग पाळणं, हात धुणं हे सर्व शिकवा.
मुलांच्या मनातील कोरोनाबद्दल असलेली भीती घालवण्याचा प्रयत्न करा.
लॉकडाऊनच्या काळात मुलांना जास्तवेळ मोबाईलचा वापर करू देऊ नका.
मुलांसोबत एकत्र मिळून कॅरम, लूडो असे खेळ खेळा.
चांगल्या गोष्टी शिकण्यासाठी प्रेरित करा,जेणेकरून मुलं सकारात्मक विचार करतील.
घरकामामध्ये मुलांची मदत घ्या. जेवण बनवणं, साफ- सफाई किचनमधील सहान लहान काम शिकवा. (हे पण वाचा-डाएट करूनही 'या' वयात वाढतं महिलांचं वजन, जाणून घ्या फीट राहण्याचे उपाय)