सावधान! व्हिडीओ कॉलमुळे होत आहे आरोग्याचं मोठं नुकसान; 'अशी' घ्या काळजी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2020 06:50 PM2020-06-07T18:50:31+5:302020-06-07T18:57:05+5:30
व्हिडीओ फटिग हा आजार अनेकांना उद्भवला आहे. व्हिडीओ कॉलच्या दुष्परिणामांबाबत आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
(image credit- forbes)
लॉकडाऊनमुळे जास्तीत जास्त कंपन्यांनी आपल्या कर्मचारीवर्गाला वर्क फ्रॉम होम करायला सांगितले. सध्याच्या परिस्थितीत व्हायरसपासून बचावासाठी असं करणं गरजेंच होतं. पण या दरम्यान प्रत्यक्ष संवाद कमी झाल्यामुळे व्हिडीओ कॉलिंगचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढलं. परिणामी व्हिडीओ फटिग हा आजार अनेकांना उद्भवला आहे. अतिप्रमाणात केल्या जात असलेल्या व्हिडीओ कॉलच्या दुष्परिणामांबाबत आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
व्हिडीओ फटीग म्हणजे थकवा येणं ही स्थितीत अती व्हिडीओ कॉल केल्यामुळे जाणवते. एका रिपोर्टनुसार व्हिडीओ कॉलिंगमुळे लोकांच्या मानसिक आणि शारिरीक स्थितीवर गंभीर परिणाम होत आहे.
या आजारांपासून बचावासाठी इलेक्ट्रॉनिक वस्तूंपासून लांब राहायला हवं. जेव्हा गरज असते. तेव्हाच याचा वापर करावा. एका शोधानुसार इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा जास्त वापर केल्यामुळे डोळ्यांना नुकसान पोहोचतं.
त्यामुळे झोप न येण्याची समस्या उद्भवू शकते. झोप पूर्ण न झाल्याने कोणत्याही समस्या उद्भवू शकतात. अधिकवेळ व्हिडीओ कॉलवर असल्यामुळे तुमचा दिनक्रम सुद्धा बदलू शकतो.
तुम्ही ज्या खोलीत काम करत आहात तिथे पुरेसा प्रकाश असणं गरजेंच आहे. व्हिडीओ कॉल करताना सुद्धा खोलीत प्रकाश जास्त असावा.
प्रकाशाचा अभाव असल्यामुळे डोळ्यांव ताण येऊ शकतो. सतत बोलण्यापेक्षा व्हिडीओ कॉन्फरन्स दरम्यान थोड्या थोड्या वेळाने ब्रेक घ्या. काम करताना अधिकवेळ एकाच जागी बसू नका.
पर्सनल आणि प्रोफेशन व्हिडीओ कॉलमध्ये ताळमेळ ठेवा. पर्सनल व्हिडीओ कॉलद्वारे नातेवाईकांशी, मित्रांशी संवाद साधल्यास ताण-तणाव दूर होतो.
कोरोना विषाणूचं संक्रमण की सामान्य सर्दी ताप; दवाखान्यात न जाता कसं ओळखाल?
कोरोना काळात संजीवनी ठरतील आहारातील 'हे' पदार्थ; निरोगी राहण्यासाठी रोज करा सेवन