CoronaVirus : कोरोनाच्या रुग्णांना 'हे' औषध दिल्यास हृदयरोगाचा असू शकतो धोका, रिसर्चमधून खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2020 01:28 PM2020-04-06T13:28:17+5:302020-04-06T13:36:49+5:30
कोरोना व्हायरसच्या रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता रिसर्चकत्यांकडून वेगवेगळे औषधांवर प्रयोग केला जात आहे.
चीनमधून संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोनाने जगभरात थैमान घातलं आहे. कोरोनाची लागण होऊन मृत्यू होत असलेल्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे कोरोनापासून बचाव करण्यासाठी सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आलं आहे. कोरोना व्हायरसच्या रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता रिसर्चकत्यांकडून वेगवेगळे औषधांवर प्रयोग केला जात आहे.
अमेरिकेतील ह्रदयविकारतज्ज्ञांनी यांसंबंधी काही गोष्टी स्पष्ट केल्या आहेत. यांच्यामते कोरोनासाठी मलेरियाचे औषध दिल्यास हदयाच्या ठोक्यांवर परिणाम होऊ शकतो. भारतात कोरोनाशी लढा देणाऱ्या डॉक्टर, नर्स, आरोग्यसेविका यांना मलेरियारोधक औषधे देण्यासंदर्भात इंडियन कांऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने काही निर्देश दिले होते. त्या पार्श्वभूमीवर अमेरिकेतील ह्रदयविकारतज्ज्ञांचा सल्ला महत्त्वाचा मानला जात आहे. ( हे पण वाचा-CoronaVirus : लॉकडाऊनमध्येही 'या' कारणामुळे होऊ शकतं व्हायरसचं इन्फेक्शन)
कोरोनाचं इन्फेक्शन झालेल्या रुग्णांना मलेरियारोधक हायड्रोक्सीक्लोरोक्वीन किंवा अझिथ्रोमायसिन हे एँटिबायोटिक देण्याचे दुष्परिणाम आणि यामुळे हार्ट बिट्सवर परिणाम होऊ शकतो, असे त्यांनी सांगितले. कोरोना व्हायरसची लागण रोखण्याकरीता आत्तापर्यंत कोणतेही औषध किंवा लस उपलब्ध झालेली नाही. लस उपलब्ध व्हायला आणखी एक ते दीड वर्षांचा कालावधी लागू शकतो. त्या पार्श्वभूमीवर अमेरिकेतील ह्रदयविकारतज्ज्ञांनी आणि संशोधकांनी केलेले संशोधन महत्त्वाचे आहे. ( हे पण वाचा-कॉलेस्ट्रॉल नियंत्रणात 'असं' ठेवा, अन्यथा कोरोना राहील अन् भलत्याच आजारांना निमंत्रण द्याल...)