CoronaVirus News : बापरे! कोरोनावर मात केलेल्या 80% रुग्णांना होतोय 'हा' आजार; वेळीच व्हा सावध
By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2020 11:58 AM2020-07-30T11:58:03+5:302020-07-30T12:01:36+5:30
CoronaVirus Marathi News and Live Updates: जगभरात कोरोनावर संशोधन करण्यात येत आहे. नव्या रिसर्चमधून एक धक्कादायक माहिती समोर आली असून चिंता वाढवली आहे.
नवी दिल्ली - देशभरात कोरोनाने थैमान घातले आहे. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा 15,83,792 वर गेला आहे. तर गेल्या 24 तासांत कोरोनाचे तब्बल 52,123 नवे रुग्ण आढळून आले आहेत. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 34,968 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर दुसरीकडे जगभरात देखील कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. एकूण कोरोनाग्रस्तांच्या संख्येने एक कोटीचा टप्पा पार केला आहे.
जगभरात कोरोनावर संशोधन करण्यात येत आहे. नव्या रिसर्चमधून एक धक्कादायक माहिती समोर आली असून चिंता वाढवली आहे. देशात तब्बल दहा लाख तर जगात एक कोटी लोकांनी आतापर्यंत कोरोनाची लढाई जिंकली आहे. उपचारानंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. मात्र आता कोरोनावर मात केलेल्या जवळपास 80% रुग्णांना हृदयाचा आजार होत असल्याची चिंताजनक माहिती एका रिसर्चमधून समोर आली आहे.
CoronaVirus News : काय सांगता? भलं मोठं बिल भरण्यास प्रशासनाने दिला नकारhttps://t.co/LT3qoIlCNB#coronavirus#CoronaUpdatesInIndia#COVID19India#CoronavirusIndia#CoronaWarrior
— Lokmat (@MiLOKMAT) July 30, 2020
जर्नल ऑफ अमेरिकन मेडिकल असोसिएशनने याबाबतचा रिसर्च केला आहे. यामध्ये यावर्षी एप्रिल ते जून 2020 दरम्यान कोरोनातून बरे झालेल्या, मात केलेल्या 100 लोकांचा अभ्यास करण्यात आला. रिसर्चमध्ये असे दिसून आले आहे की 100 पैकी 78 रुग्णांना हृदयाच्या अनेक समस्या होत्या. 60 लोकांच्या हृदयाला सूज दिसून आली आहे. संशोधकांच्या मते सुरुवातीला अशा गंभीर समस्या रुग्णांना नव्हत्या, त्यांच्या अशी कोणतीही लक्षणं आधी आढळली नव्हती. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
CoronaVirus News : उंच लोकांसाठी कोरोना जीवघेणा?, जाणून घ्या कितपत आहे धोकाhttps://t.co/5GeblPEkkL#coronavirus#CoronaUpdates#COVID19
— Lokmat (@MiLOKMAT) July 29, 2020
काही व्यक्तींसाठी कोरोना जीवघेणा ठरत आहेत. त्यांना मृत्यूचा धोका अधिक असल्याची माहिती मिळत आहे. उंच लोकांना कोरोनाचा सर्वाधिक धोका असल्याची माहिती रिसर्चमधून समोर आली आहे. 6 फूट आणि त्यापेक्षा जास्त उंच असलेल्या लोकांचा कोरोना व्हायरसचा संसर्ग होण्याचा धोका हा इतर व्यक्तींच्या तुलनेत दुप्पट आहे असा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे. ब्रिटनच्या मॅनचेस्टर युनिव्हर्सिटी आणि ओपन युनिव्हर्सिटीसह आंतरराष्ट्रीय रिसर्चर्सच्या एका टीमने याबाबत संशोधन केलं आहे. जवळपास दोन हजार लोकांचा यासाठी अभ्यास करण्यात आला होता. रिपोर्टमध्ये देण्यात आलेल्या माहितीनुसार, लोकांचं पर्सनल प्रोफाईल, काम आणि घर या गोष्टींचा कोरोनाशी कसा संबंध आहे. याचा अभ्यास देखील या रिसर्चमध्ये प्रामुख्याने करण्यात आला.
CoronaVirus News : मोठा दिलासा! दहा लाख लोकांनी केली कोरोनावर मातhttps://t.co/lAWadJQhaT#coronavirus#CoronaUpdatesInIndia#COVID19India#CoronavirusIndia
— Lokmat (@MiLOKMAT) July 30, 2020
महत्त्वाच्या बातम्या
मुंबईचा वाघ! राणीच्या बागेतून थेट 'शक्ती' प्रदर्शन
WhatsApp ग्रुपच्या नोटिफिकेशन्सना कंटाळलात?; आता कायमस्वरूपी Mute करून टाका!
CoronaVirus News : बाबो! क्वारंटाईन सेंटरमध्ये डॉक्टरांच्या जेवणाचं बिल आलं तब्बल 50 लाख
CoronaVirus News : आनंदाची बातमी! देशात तब्बल 10 लाख लोकांनी जिंकली कोरोनाची लढाई
CoronaVirus News : बापरे! उंच लोकांना कोरोनाचा सर्वाधिक धोका; रिसर्चमधून मोठा खुलासा
दिलदार सुपरहिरो! नोकरी गेली, इंजिनिअरवर भाजी विकण्याची वेळ आली; सोनू सूदने दिला मदतीचा हात