CoronaVirus News: ICMRला मोठं यश, कोरोना व्हायरसवरील उपचारासाठी होणार फायदा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2020 09:34 PM2020-10-01T21:34:16+5:302020-10-01T21:36:45+5:30
बोली भाषेत सांगायचे झाल्यास, वैज्ञानिकांनी एखाद्या बाहेरील बॅक्टेरियासोबत अथवा व्हायरससोबत लढण्यासाठी आवश्यक अँटीबॉडी तयार केली आहे. (ICMR, Biological E. Limited, Hyderabad)
Big success icmr developed highly purified antisera for Corona virus treatment
नवी दिल्ली - इंडियन काउंसील ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) आणि बॉयोलॉजिक ई. लिमिटेड, हैदराबाद (Biological E. Limited, Hyderabad) यांनी एकत्रितपणे एक विशेष प्रकारचे अँटी-सिरम (Antisera) विकसित केले आहे. हे कोरोनावरील उपचारात प्रभावी ठरू शकते. हे अँटी-सिरम सध्या प्राण्यांमध्ये विकसित करण्यात आले आहे.
(1/4) ICMR and Biological E. Limited, Hyderabad have developed highly purified antisera (raised in animals) for prophylaxis and treatment of COVID-19.
— ICMR (@ICMRDELHI) October 1, 2020
बोली भाषेत सांगायचे झाल्यास, वैज्ञानिकांनी एखाद्या बाहेरील बॅक्टेरियासोबत अथवा व्हायरससोबत लढण्यासाठी आवश्यक अँटीबॉडी तयार केली आहे. हिचा उपयोग केवळ कोरोना संक्रमणाच्या उपचारातच नव्हे, तर संक्रमणापासून बचावासाठीही केला जाऊ शकते, यामुळे हा शोध अत्यंत महत्वाचा मानला जात आहे.
आयसीएमआरने म्हटले आहे, अशा प्रकारचा उपचार पूर्वेकडील देशांत अनेक व्हायरल आणि बॅक्टेरियल इंफेक्शनविरोधात करण्यात आला आहे. यात रेबीज, हेपेटायटिस बी, व्हॅक्सिनिया व्हायरस, टेटॅनस आणि डिप्थिरिआ यांसारख्या आजारांचा समावेश होतो.
(3/4)Although, plasma recovered from patients experiencing COVID - 19 could serve similar purpose, the profile of antibodies, their efficacy and concentration keep varying from one patient to another and therefore make it an unreliable clinical tool for patient management
— ICMR (@ICMRDELHI) October 1, 2020
कोरोनावर मात केलेल्या लोकांच्या प्लाझ्माचा वापरही काहिशा अशाच उपचारांसाठी केला जातो. मात्र, यात अँटीबॉडीचा स्तर व्यक्तीपरत्वे वेगवेगळा असतो. यामुळे याचा वापरही अवघड असतो. हे यश भारतात सार्वजनिक आरोग्याच्या सुरक्षिततेसाठी अत्यंत महत्वाचे असल्याचे आयसीएमआरने म्हटले आहे.