औषध की लस, कोणता आहे कोरोनाचा प्रभावी उपाय; माहीत करून घ्या दोघांमधील फरक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2020 12:49 PM2020-05-08T12:49:23+5:302020-05-08T12:57:52+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: लस प्रिवेंशनसाठी म्हणजेच एखाद्या आजारांपासून बचाव होण्यासाठी लस वापरली जाते. तर एखादा आजार झाल्यानंतर उपचारांसाठी औषधांचा वापर केला जातो. 

CoronaVirus Marathi News : know the difference between vaccine and medicine of corona myb | औषध की लस, कोणता आहे कोरोनाचा प्रभावी उपाय; माहीत करून घ्या दोघांमधील फरक

औषध की लस, कोणता आहे कोरोनाचा प्रभावी उपाय; माहीत करून घ्या दोघांमधील फरक

googlenewsNext

जगभरात जीवघेण्या कोरोना व्हायरसमुळे हाहाकार निर्माण झाला आहे.  जगभरात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या दीड लाखांपेक्षा जास्त आहे.  कोरोनावर लस आणि औषध शोधण्यासाठी वेगवेगळ्या देशातील शास्त्रज्ञ प्रयत्न करत आहेत. कोरोना व्हायरसच्या उपचारांसंबंधी लस आणि औषध शोधण्याच्या अनेक शास्त्रज्ञांनी दावा केला आहे.

आज आम्ही तुम्हाला या दोन्ही गोंष्टींमधील फरक सांगून एकमेकांपासून कसे वेगळे आहेत. याबाबत सांगणार आहोत. लस प्रिवेंशनसाठी म्हणजेच एखाद्या आजारांपासून बचाव होण्यासाठी लस वापरली जाते. तर एखादा आजार झाल्यानंतर उपचारांसाठी औषधांचा वापर केला जातो. 

लस

लस हा कोणत्याही आजारापासून बचावाचा मार्ग आहे. लसीच्या मदतीने सुरूवातीपासूनच इम्यूनिटी विकसीत केली जाते. भविष्यात आजार उद्भवू नये यासाठी लस दिली जाते. लसीमुळे दीर्घकाळापर्यंत व्यक्तीचे शरीर व्हायरसपासून स्वतःचा बचाव करू शकते. साधारणपणे लस शरीरात डायरेक्ट इंजेक्ट केली जाते.

औषधं

आजाराच्या उपचारांसाठी औषधं वेगवेगळया माध्यामातून दिली जातात. द्रव स्वरूपात, कधी इंजेक्शन तर कधी पावडर आणि गोळ्याच्या माध्यमातून रुग्णाला दिली जातात. पण एकदा औषधं घेतल्यानंतर पुन्हा रुग्णाला इन्फेक्शन किंवा त्रास होण्याची शक्यता असते.  औषधांचा परिणाम दीर्घकाळपर्यंत दिसून येत नाही. तात्पुरत्या स्वरुपाचा असतो.

कोरोनाला रोखण्यासाठी काय ठरेल प्रभावी

कोरोनाच्या उपचारांसाठी अद्याप कोणतंही औषधं किंवा  लस शोधण्यात आलेली नाही.  संपूर्ण जगाला कोरोनाच्या जाळ्यातून वाचवण्यासाठी कोरोनाची लस शोधणं गरजेंच आहे. कोरोनामुळे जगभरातून लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे. दिवसेंदिवस संख्या वाढत आहे. अशा स्थितीत लस महत्वाची आहे. कारण  जे व्यक्ती संक्रमित झालेले नाहीत अशा लोकांसाठी लस उपयोगी आहे. जे लोक कोरोना संक्रमित नाहीत अशा लोकांचा लसीद्वारे बचाव केला जाऊ शकतो.  (हे पण वाचा-तुमच्यामुळे तुमची मुलंही होऊ शकतात थॅलेसेमियाची शिकार; जाणून घ्या लक्षणं आणि उपाय)

ज्या लोकांना कोरोनाचं संक्रमण झालं आहे. अशा रुग्णांची प्रकृती चांगली  करण्यासाठी औषधांचा वापर केला जाऊ शकतो. जर कोरोनावर औषधं तयार झाली नाही तर कोरोना बाधित रुग्णांचे उपचार करणं कठीण होईल. त्यामुळे संक्रमित लोकांकडून सगळ्यांकडे या व्हायरसचा प्रसार होईल. त्यामुळे कोरोनाला रोखण्यासाठी औषधं आणि लस दोन्हींचा शोध लागणं आवश्यक आहे.

( हे पण वाचा-CoronaVirus News : कोरोना विषाणूंशी लढण्याासाठी मानवी शरीर कधीपर्यंत तयार होणार? जाणून घ्या)

Web Title: CoronaVirus Marathi News : know the difference between vaccine and medicine of corona myb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.