CoronaVirus News : काळजी वाढली! वाढत्या तापमानाचा कोरोना विषाणूंवर परिणाम होत नाही, तज्ञांचा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2020 10:03 AM2020-05-09T10:03:53+5:302020-05-09T10:10:13+5:30
CoronaVirus Marathi News and Live Updates: या संशोधनात दिसून आलं की, कोरोना व्हायरस आणि वातावरणातील तापमान यांचा काहीही संबंध नाही.
कोरोना व्हायरसमुळे जगभरात हाहाकार पसरला आहे. कोरोनाच्या माहामारीवर उपाय शोधण्यासाठी सर्वच देशातील शास्त्रज्ञांचे प्रयत्न सुरू आहेत. कारण कोरोना व्हायरसचं संक्रमण होऊन मृत्यू झालेल्यांची संख्या अडीच लाखांपेक्षा जास्त झाली आहे. उन्हाळा सुरू झाल्यानंतर तापमान वाढणार आणि त्यामुळे कोरोना जास्त काळ टिकू शकणार नाही. असा अंदाज काही दिवसांपूर्वी शास्त्रज्ञांनी व्यक्त केला होता.
अलिकडे करण्यात आलेल्या संशोधनात तापमान आणि कोरोना व्हायरसबाबत माहिती दिली आहे. याबाबतची माहिती कॅनेडियन मेडिकल असोसिएशन जर्नल मध्ये प्रकाशित करण्यात आली आहे. हे संशोधन ऑस्ट्रेलिया, अमेरिका आणि कॅनडाच्या राज्यांमध्ये करण्यात आल होतं. संशोधकांच्यामते इटली, इराण आणि दक्षिण कोरिया या देशांच्या तुलनेत चीनमध्ये कोरोना व्हायरसचा फारसा प्रभाव दिसून येत नाही. म्हणजेच चीनमध्ये हा व्हायरस हळूहळू नाहीसा होण्याच्या मार्गावर आहे.
टोरंटो युनिव्हरसिटी आणि कॅनडामधील सेंट मायकल रुग्णालयातील तज्ञ पीटर जूनी यांनी सांगितले की, कोरोनाच्या महामारीवर संशोधन करण्यासाठी जगभरातील माहितीचा वापर केला जात आहे. यासाठी संशोधकांनी २७ मार्च ते २० मार्च या कालावधीमधील रुग्णांची तुलना केली. त्यांनी १३ मार्चला त्यांनी लॉकडाऊनदरम्यानच्या सामाजीक स्थितीचा आढावा घेतला त्यावेळी लोक एकत्र न होणं, शाळा बंद असणं. यामुळे कोरोना व्हायरसच्या प्रसारावर परिणाम दिसून आला. (हे पण वाचा-उन्हाळ्यात आजारी पडायचं नसेल; तर व्हिटॅमीन 'सी' मुळे शरीराला होणारे फायदे वाचा)
या संशोधनात दिसून आलं की, कोरोना व्हायरस आणि वातावरणातील तापमान यांचा संबंध नाही. वाढत्या तापमानामुळे कोरोनाच्या प्रसारावर काहीही परिणाम दिसून आला नव्हता. गरमीच्या वातावरणाचा कोरोनाच्या व्हायरसवर काहीही परिणाम घडून येत नाही. हे या रिसर्चमध्ये स्पष्ट झालं.
(हे पण वाचा-CoronaVirus News : शारीरिक संबंधांमुळे कोरोना होण्याची भीती; स्पर्म्समध्ये सापडला विषाणू)