CoronaVirus News : आयोडीनमुळे फक्त 15 सेकंदात कोरोना होणार नष्ट?; रिसर्चमधून 'मोठा' खुलासा

By सायली शिर्के | Published: September 20, 2020 09:45 AM2020-09-20T09:45:28+5:302020-09-20T09:57:43+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: अमेरिकेत करण्यात आलेल्या रिसर्चनुसार, आयोडीनने (Iodine) नाक आणि तोंड धुतल्यास कोरोना व्हायरसच्या संसर्गापासून बचाव करता येऊ शकतो.

CoronaVirus Marathi News washing nose with iodine solution protect from covid 19 study | CoronaVirus News : आयोडीनमुळे फक्त 15 सेकंदात कोरोना होणार नष्ट?; रिसर्चमधून 'मोठा' खुलासा

CoronaVirus News : आयोडीनमुळे फक्त 15 सेकंदात कोरोना होणार नष्ट?; रिसर्चमधून 'मोठा' खुलासा

googlenewsNext

वॉशिंग्टन - वेगाने पसरणाऱ्या कोरोना व्हायरसमुळे जगभरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जगभरातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल तीन कोटींचा टप्पा पार केला असून रुग्णांची संख्या 30,984,415 वर गेली आहे. तर 961,400 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी, लस शोधण्यासाठी जगभरात युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. अनेक ठिकाणी संशोधन सुरू असून नवनवीन माहिती ही सातत्याने समोर येत आहे. कोरोनाबाबत संशोधकांनी  एक दावा केला आहे. 

आयोडीनमुळे 15 सेकंदात कोरोनाचा नष्ट होणार असल्याचा मोठा खुलासा एका रिसर्चमधून करण्यात आला आहे. अमेरिकेत करण्यात आलेल्या रिसर्चनुसार, आयोडीनने (Iodine) नाक आणि तोंड धुतल्यास कोरोना व्हायरसच्या संसर्गापासून बचाव करता येऊ शकतो. अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ कनेक्टिकट स्कूल ऑफ मेडिसीनच्या संशोधनात हा दावा करण्यात आला आहे. मात्र याआधी करण्यात आलेल्या काही रिसर्चमध्ये आणि जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना संदर्भातील हा दावा फेटाळून लावला आहे. 

कोरोना व्हायरस निष्क्रिय करण्यासाठी फक्त 15 सेकंदाचा कालावधी

लोकांनी आयोडीनने नाक धुतल्यास कोरोना व्हायरसची लागण होण्याची शक्यता कमी होत असल्याचं रिसर्चमध्ये म्हटलं आहे. तसेच संशोधकांनी प्रयोगशाळेत कोरोना व्हायरसच्या एक नमुन्यावर तीन वेगवेगळ्या सांद्रतेचे अँटीसेप्टिक पोविडोन-आयोडीन (पीवीपी- I)चे सोल्यूशन टाकले. पोव्हिडोन-आयोडीन 0.5 टक्के सांद्रतेच्या सोल्यूशनमध्ये कोरोना व्हायरस निष्क्रिय करण्यासाठी फक्त 15 सेकंदाचा कालावधी लागला. त्यानंतर संशोधकांकडून नाक आणि तोंड आयोडीनने धुतलं तर कोरोनाचा संसर्ग टाळता येऊ शकतो असा दावा करण्यात आला आहे.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी नाकाची स्वच्छता महत्त्वाची

कोरोना व्हायरस हा नाकाच्या रिसेप्टर एसीई -2 वापर करून माणसांच्या शरीरात प्रवेश करतो आणि त्यांना कोरोनाची लागण होते. त्यामुळे काही मानवी चाचण्यांमध्ये व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी नाकाची स्वच्छता करून व्हायरसला रोखण्याचा प्रयत्न केला जात आहे. यासाठी आयोडीन प्रभावी असल्याचं रिसर्चमध्ये म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. कोरोनातून बऱ्या झालेल्या रुग्णांना पुन्हा एकदा कोरोनाची लागण होत असल्याची धक्कादायक माहिती आता समोर आली आहे. एका रिसर्चमधून हा धोक्याचा इशारा देण्यात आला आहे.

भय इथले संपत नाही! कोरोनातून बऱ्या झालेल्या रुग्णांना पुन्हा लागण, रिसर्चमधून धोक्याचा इशारा

नोएडामधील दोन आणि मुंबईतील चार आरोग्य कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग झाला आहे. दिल्ली सीएसआईआरच्या इन्स्टीट्यूट ऑफ जीनोमिक्स अँड इंटिग्रेटिव बायोलॉजी (आयजीआयबी) च्या रिसर्चमध्ये हा खुलासा करण्यात आला आहे. कोरोनाची पुन्हा लागण होते का याचा तपास करण्यासाठी आयजीआयबीच्या एका टीमने देशभरातून 16 आरोग्य कर्मचाऱ्यांचे सँपल घेतले असून त्याची चाचणी केली जात आहे. एका कोरोनाग्रस्ताला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं. तर दुसऱ्या रुग्णाला घरामध्ये आयसोलेट करण्यात आलं. ज्या व्यक्तींची रोगप्रतिकार क्षमता मजबूत नाही त्यांच्यावर व्हायरस पुन्हा हल्ला करत आहे. कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी शरीरात रोगप्रतिकारक क्षमता कमी असल्यास शरीरात असलेला व्हायरस पुन्हा शरीरात पसरतो आणि पुन्हा कोरोनाची लागण होते.

महत्त्वाच्या बातम्या

कर्तव्यनिष्ठेला सलाम! कोरोनाच्या संकटात 'या' शिक्षकाने विद्यार्थ्यांसाठी घरासमोरच आणली 'शाळा'

CoronaVirus News : आनंदाची बातमी! प्रत्येक तिसऱ्या व्यक्तीमध्ये अँटीबॉडी; सीरो सर्व्हेमधून दिलासा

"शिवसेनेचा दुटप्पीपणा, मुंबईवरील बेगडी प्रेम उघड?, मरिन ड्राइव्हच्या किनाऱ्याला ढोंगीपणाचा गाळ दिसला", शेलारांचा टोला

बलात्कार करणाऱ्याला 'नपुंसक' करणार; 'या' देशाने घेतला मोठा निर्णय 

Video - पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात हेलियम फुग्यांचा स्फोट, भाजपाचे 30 कार्यकर्ते जखमी

Web Title: CoronaVirus Marathi News washing nose with iodine solution protect from covid 19 study

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.