Coronavirus Medicine : अरे व्वा! टेक महिंद्रानं विकसित केलं कोरोनाचा खात्मा करणारं औषध; लवकरच पेटंट मिळणार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2021 11:30 AM2021-05-04T11:30:33+5:302021-05-04T12:01:01+5:30

Coronavirus Medicine & latest Updates : भविष्यातील औषध शोधासाठी हे तंत्रज्ञान चांगले आहे. तथापि, यावर अजून संशोधन होणे आवश्य आहे.

Coronavirus Medicine tech mahindra and reagene biosciences to file patent for coronavirus attacking molecule | Coronavirus Medicine : अरे व्वा! टेक महिंद्रानं विकसित केलं कोरोनाचा खात्मा करणारं औषध; लवकरच पेटंट मिळणार

Coronavirus Medicine : अरे व्वा! टेक महिंद्रानं विकसित केलं कोरोनाचा खात्मा करणारं औषध; लवकरच पेटंट मिळणार

googlenewsNext

देशात कोरोना व्हायरसच्या वाढत्या उद्रेकात आशेचा किरण दाखवणारी माहिती समोर येत आहे. आयटीआय क्षेत्रात आपला दबदबा निर्माण करणारी कंपनी टेक महिंद्रानं रेजेनं बायोसायंसेससह मिळून एक नवीन ड्रग रेणू म्हणजेच औषधाचा शोध लावला आहे. कोरोना व्हायरसवर हल्ला करून नष्ट करण्यात हे औषध प्रभावी ठरू शकतं असा  दावा केला जात आहे. 

हा दावा टेक महिंद्राच्या रिसर्च एंड डेव्हलपमेंट युनिट मेकर्स लॅबने केला आहे. आता कंपनी या औषधाचे पेटंट मिळवण्याच्या तयारीत आहेत. जेणेकरून या औषधावर पुढील रिसर्च करता येऊ शकतो. याबाबतची माहिती मेकर्स लॅबचे प्रमुख निखिल मल्होत्रा यांनी दिली आहे. 

तथापि, निखिल मल्होत्रा ​​यांनी औषधी रेणूचे (Molecule) नाव दिले नाही. ज्यामधून कोरोना व्हायरसचा खात्मा होतो. प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत औषधांच्या रेणूविषयी माहिती सार्वजनिक केली जाणार नाही असे त्यांनी म्हटले आहे. निखिल मल्होत्राच्या म्हणण्यानुसार, मेकर्स लॅबने कोरोना व्हायरसचे संगणकीय मॉडेलिंगचे विश्लेषण केले आणि त्या आधारे टेक महिंद्रा आणि रेजेन बायोसायन्स कंपनीने एफडीएने मान्यता दिलेल्या आठ हजार रेणूंपैकी १० औषध रेणू वेगळे करण्यात आले. त्यानंतर या १० औषध रेणूंपैकी तीघांना तंत्रज्ञानाच्या मदतीने शॉर्टलिस्ट केले गेले.

नंतर कंपनीने तंत्रज्ञानाच्या सहाय्याने थ्री डी फुफ्फुस विकसित केला आणि त्यावर औषधाच्या रेणूंची चाचणी केली. चाचणीमध्ये असे आढळले की रेणू अपेक्षेप्रमाणे काम करत आहे. बेंगळुरू येथे ही चाचणी घेण्यात आली होती. निखिल मल्होत्रा ​​म्हणाले की, ''भविष्यातील औषध शोधासाठी हे तंत्रज्ञान चांगले आहे. तथापि, यावर अजून संशोधन होणे आवश्यक आहे. जगभरात बर्‍याच औषधांवर चाचण्या सुरू आहेत आणि कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी सध्या लस हा एकमेव मार्ग आहे.''

कोरोनाची सौम्य लक्षणं असल्यास चुकूनही करू नका CT-SCAN; एम्स संचालकांचा धोक्याचा इशारा

दरम्यान राज्याच्या दैनंदिन रुग्णसंख्येचा आलेखही सपाट झालेला असून त्यात काही दिवसांपासून मोठी वाढ झालेली नाही. दुसरऱ्या लाटेत महाराष्ट्रात १८ एप्रिलला ६८ हजार ६३१ नवे रुग्ण आढळले होते.  त्यानंतर २ मे रोजी ५६ हजार ६४७ नवे रुग्ण आढळले होते. यावरुन नव्या रुग्णांमध्ये घट होतांना दिसत आहे. यापैकी बहुतांश जिल्ह्यांमध्ये ४ ते १७ एप्रिल या कालावधी रुग्णसंख्या सर्वोच्च बिंदूवर पोहोचल्याचे आढळले. त्यानंतर त्यात घट झालेली आहे. 

Web Title: Coronavirus Medicine tech mahindra and reagene biosciences to file patent for coronavirus attacking molecule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.