Coronavirus : क्या बात! मुंबईत बनवलेला मास्क कोरोना व्हायरसला करणार नष्ट; अमेरिकन लॅबने दिली मंजूरी, वाचा किंमत

By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2020 11:45 AM2020-08-01T11:45:57+5:302020-08-01T11:56:55+5:30

मुंबईतील एका स्टार्टअपने एक अनोखा मास्क विकसित केलाय. या मास्क कोरोना व्हायरस तोंडात आणि नाकाच्या माध्यमातून शरीरात जाण्यापासून रोखला तर जातोच, सोबतच व्हायरस नष्टही केला जातो.

Coronavirus : Mumbai based startup create a face mask which can kill coronavirus tested by US based iso certified laboratory | Coronavirus : क्या बात! मुंबईत बनवलेला मास्क कोरोना व्हायरसला करणार नष्ट; अमेरिकन लॅबने दिली मंजूरी, वाचा किंमत

Coronavirus : क्या बात! मुंबईत बनवलेला मास्क कोरोना व्हायरसला करणार नष्ट; अमेरिकन लॅबने दिली मंजूरी, वाचा किंमत

Next

अजूनही लोक कोरोना व्हायरसला नष्ट करणाऱ्या वॅक्सीनची वाट बघत आहेत. वेगवेगळ्या देशांमध्ये वॅक्सीन तयार करण्याचं काम सुरू असून त्याबाबत तुम्ही रोज काहीना काही वाचत असालच. अशातच एक आनंदाची बातमी मुंबईतून समोर आली आहे. मुंबईतील एका स्टार्टअपने एक अनोखा मास्क विकसित केलाय. या मास्क कोरोना व्हायरस तोंडात आणि नाकाच्या माध्यमातून शरीरात जाण्यापासून रोखला तर जातोच, सोबतच व्हायरस नष्टही केला जातो.

मुंबईतील स्टार्टअपने नॅनोटेक्नॉलॉजीचा वापर करून कोरोना व्हायरस किलर मास्क तयार केला आहे. या मास्कची खास बाब ही आहे की, या मास्कचा वापर केल्यावर मास्कवर लागलेल्या कोरोना व्हायरस ड्रापलेट्सने संक्रमण पसरण्याचा धोकाही पूर्णपणे दूर होतो. सोबतच मास्कला याच्या वॉशिंगच्या आधारावर ६० ते १५० वेळा वापरलं जाऊ शकतं.

(सांकेतिक छायाचित्र)

आता मुंबईतील स्टार्टअप थरमॅसेंसने ज्या मास्कची निर्मिती केली आहे. त्या मास्कबाबत दावा केला जातोय की, हा मास्क ना केवळ कोरोना व्हायरसला शरीरात जाण्यापासून रोखतो तर मास्कच्या वरील भागावर चिकटलेल्या व्हायरसला नष्ट करण्याचं कामही करतो. या मास्कबाबत विश्वास वाढलाय कारण या मास्कला भारतीय लॅबसहीत अमेरिकेतील लॅबनेही मंजूरी दिली आहे. म्हणजे मास्क तयार करणाऱ्यांकडून हा दावे केले जात आहेत की, हा मास्क सर्व गोष्टींमध्ये खरा उतरला आहे.

या स्टार्टअप कंपनीने दावा केला आहे की, त्यांच्याकडून तयार केलेल्या मास्कला International Organization for Standardization (आयएसओ) प्रमाणित अमेरिकन प्रयोगशाळा आणि भारतात National Accreditation Board for Testing and Calibration Laboratories(NABL) कडून उत्पादनासाठी तसेच वापरासाठी मान्यता मिळाली आहे.

अर्थातच हा मास्क नेमका कसा तयार केला याची उत्सुकता तुम्हाला लागली असेल. तर हा मास्क तयार करणाऱ्या एक्सपर्ट्सनी सांगितले की, हा मास्क ज्या कापडापासून तयार केलाय, त्यात नॅनोटेक्नॉलॉजीचा वापर केला गेला आहे. हा मास्क वापरल्याने केवळ कोरोनापासूनच नाही तर इतरही प्रकारच्या व्हायरस आणि बॅक्टेरिया नष्ट होतील. अमेरिकन लॅबनुसार मुंबईत तयार केलेला मास्क ५ मिनिटात साधारण ९३ टक्के कोरोना व्हायरस नष्ट करतो. तर एक तासात याने ९९.९९ टक्के व्हायरस नष्ट होतात. 

रिपोर्टनुसार, जेव्हा हे मास्क तयार मार्केटमध्ये येतील तेव्हा एका मास्कची किंमत ३०० ते ५०० रूपये असेल. हा मास्क किती वेळा वापरला जाऊ शकतो हे यावर अवलंबून असेल की, हा मास्क वापरणारी व्यक्ती मास्क धुण्यासाठी कोणती पद्धत वापरत आहे. मास्क तयार केलेल्या टीमनुसार, हा मास्क तयार करण्यासाठी वापरेल्या कापडाला जर तुम्ही हाताने धुवत असाल तर हा मास्क तुम्ही १५० वेळा धुवून वापरू शकता. मशीनमध्ये तुम्ही हा मास्क १०० पेक्षा जास्त वेळा वापरू शकता. जर तुम्ही हा मास्क धुण्यासाठी केमिकल वॉश, ब्लीच किंवा ड्रायक्लीनसारख्या पद्धती वापरत असाल तर ६० वेळा तुम्ही हा मास्क धुवून वापरू शकता.

Web Title: Coronavirus : Mumbai based startup create a face mask which can kill coronavirus tested by US based iso certified laboratory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.