CoronaVirus News: कोणकोणत्या पदार्थांमुळे वाढते रोगप्रतिकारशक्ती; केंद्रानं शेअर केली महत्त्वाची यादी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2021 04:17 PM2021-05-07T16:17:36+5:302021-05-07T16:21:50+5:30
CoronaVirus News: कोरोनावर मात करण्यासाठी रोगप्रतिकारशक्ती वाढणं गरजेचं; रोगप्रतिकारशक्ती वाढल्यास कोरोनामुक्त होणं सहज शक्य
नवी दिल्ली: देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढत आहे. मे महिन्यात आतापर्यंत तीन दिवस देशात ४ लाख नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. रोगप्रतिकारशक्ती वाढल्यास कोरोनावर लवकर मात करता येते. त्यामुळे कोरोना रुग्णांनी रोगप्रतिकारशक्ती वाढवणारे पदार्थ खाण्यास प्राधान्य द्यायला हवं. अशा पदार्थांची यादी केंद्र सरकारनं माय गव्हर्नमेंट इंडिया या ट्विटर हँडलवरून शेअर केली आहे.
सीरमच्या कोविशील्डबद्दल मोदी सरकार महत्त्वाचा निर्णय घेणार; लसीकरणावर थेट परिणाम होणार
रोगप्रतिकारक्षमता वाढवण्यासाठी आणि कोरोनावर मात करण्यासाठी सरकारनं काही पदार्थांची यादी शेअर केली आहे. कोरोनाच्या दोन्ही लाटेत काही ठळक लक्षणं दिसून आली आहेत. तोंडाची चव जाणं आणि वास न येणं कोरोनाचं लक्षणं मानलं जातं. तोंडाची चवच गेल्यानं कोरोना रुग्णांना जेवताना अडचणी येतात. भूक लागत नसल्यानं, अन्न गिळताना त्रास होत असल्यानं रुग्णांच्या पोटात फारसं काही जात नाही. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढत नाही. अशा स्थितीत नरम पदार्थ ठराविक अंतरानं खाण्याचा, पदार्थांमध्ये आमचूर वापरण्याचा सल्ला सरकारनं दिला आहे.
Are you looking for natural ways to boost your immunity?
— MyGovIndia (@mygovindia) May 6, 2021
We’ve got you covered!
Here’s few general measures which you can follow to boost your immunity organically amidst #COVID19. #StayHomeStaySafe#IndiaFightsCorona@MoHFW_INDIA@MIB_India@PIB_Indiapic.twitter.com/KfKk2pLyeL
तुमची फुफ्फुसं किती सक्षम?; घरच्याघरी तपासून पाहण्यासाठी वापरा सोपी ट्रिक
कोरोना रुग्णानं कोणता आहार घ्यावा:
- व्हिटामिन आणि मिनरल्स मिळवण्यासाठी फळं आणि भाज्या खाव्यात
- किमान ७० टक्के कोको असलेलं डार्क चॉकलेट थोड्या प्रमाणात खावं
- दिवसातून एकदा हळद घातलेलं दूध प्यावं
- ठराविक अंतरानं नरम पदार्थ खावेत. त्यात आमचूर घालावं.
- नाचणी, ओट्स आणि राजगिऱ्याचे पदार्थ खावेत
- प्रोटिनयुक्त आहार घ्यावा. चिकन, मासे, अंडी, पनीर, सोया, सुकामेवा खावा.
- अक्रोड, बदाम, ऑलिव्ह तेल आणि मोहरीचं तेल उपयुक्त