चिंता वाढली! आणखी घातक होत आहे कोरोना व्हायरस, रूग्णांमध्ये दिसू लागलेत हे नवीन गंभीर लक्षणे!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2021 02:31 PM2021-06-08T14:31:39+5:302021-06-08T14:31:48+5:30

इंग्लंड आणि स्कॉटलॅंडमध्ये सुरूवातीला बघण्यात आलं की, या नव्या स्ट्रेनमुळे रूग्ण हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याचा धोका वाढला आहे.

Coronavirus new dangerous symptoms like gangrene, deafness are seen in patients | चिंता वाढली! आणखी घातक होत आहे कोरोना व्हायरस, रूग्णांमध्ये दिसू लागलेत हे नवीन गंभीर लक्षणे!

चिंता वाढली! आणखी घातक होत आहे कोरोना व्हायरस, रूग्णांमध्ये दिसू लागलेत हे नवीन गंभीर लक्षणे!

googlenewsNext

कोरोना व्हायरसची काही नवीन लक्षणे समोर आली आहे. याआधी बहिरेपणा, रक्ताच्या गाठी तयार होणे त्याचं रूपांतर गॅंगरीनमध्ये होणे अशी लक्षणे कोरोना रूग्णांमध्ये आढळून आली नव्हती. आता याचा संबंध भारतात कथित डेल्टा व्हेरिएंटसोबत डॉक्टर जोडत आहेत. इंग्लंड आणि स्कॉटलॅंडमध्ये सुरूवातीला बघण्यात आलं की, या नव्या स्ट्रेनमुळे रूग्ण हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याचा धोका वाढला आहे.

डेल्टा ज्याल B.1.617.2 च्या नावाने ओळखलं जातं. याने गेल्या सहा महिन्यात साधारण ६० देशात थैमान घातलं आहे. आणि ऑस्ट्रेलियापासून यूएसपर्यंत संक्रमण रोखण्यासाठी आंतराष्ट्रीय प्रवासावर बंदी घातली गेली आहे. याच डेल्टा व्हेरिएंटमध्ये इतर व्हेरिएंटच्या तुलनेत संक्रमणाची तीव्रता अधिक आहे. तसेच वॅक्सीनचा प्रभाव न होणे अशाही समस्या या व्हेरिएंटमुळे होत आहेत. (हे पण वाचा : Coronavirus : महाराष्ट्रात कोरोनाने तब्बल ४७ वेळा बदललं रूप, तिसरी लाट ठरेल अधिक घातक?)

एनडीटीव्हीने दिलेल्या एका वृत्तानुसार, चेन्नईच्या अपोलो हॉस्पिटलमधील संक्रमण आजारांचे फिजिशिअन डॉ. अब्दुल गफूर म्हणाले की,  B.1.617 चा नव्या लक्षणांसोबत संबंध आहे की, नाही हे जाणून घेण्यासाठी आम्हाला आणि वैज्ञानिकांना रिसर्च करण्याची गरज आहे. गफूर म्हणाले की, महामारीच्या सुरूवातीच्या लाटेच्या तुलनेत यावेळी डायरियाचे जास्त रूग्ण बघायला मिळत आहेत.

गेल्यावर्षी आम्हाला वाटलं होतं की, आपण व्हायरस चांगल्या प्रकारे जाणतो. पण आता यावेळी त्याने आपल्या नव्या रूपाने सर्वांना हैराण केलं आहे. यावेळी पोटदुखी, जांबई येणे, उलटी, भूक कमी लागणे, बहिरेपणा, सांधेदुखीसारखी लक्षणे कोविड १९ रूग्णांमध्ये बघायला मिळत आहेत. इतकंच नाही तर डॉक्टर म्हणाले की, यावेळी काही रूग्णांमध्ये मायक्रो थ्रोंबी आणि छोट्या रक्ताच्या गाठीही आढळून येत आहेत. ज्या पुढे जाऊन गॅंगरीनमध्ये बदलत आहेत. (हे पण वाचा : कोरोना लसीकरणासाठी केंद्राकडून नवी गाइडलाइन जारी; डोस वाया घालवणाऱ्या राज्यांना बसणार फटका!)

भारत सरकारच्या एका पॅनलच्या नुकत्याच करण्यात आलेल्या रिसर्चनुसार, भारतात दुसरी लाट घातक होण्यामागे डेल्टा व्हेरिएंट होता. हा स्ट्रेन यूकेमध्ये पहिल्यांदा आढळलेल्या अल्फा स्ट्रेनच्या तुलनेत ५० टक्के जास्त संक्रामक होता.

असामान्य स्थिती

डेल्टा व्हेरिएंटने भारतात आपलं भयानक रूप दाखवलं आहे आणि दाखवत आहे. सध्या भारतात सर्वात मोठी चिंतेची बाब आहे हा व्हेरिएंट वेगाने पसरण्याची आणि याचा लहान मुलांवर प्रभाव बघायला मिळत आहे. यावेळी संपूर्ण परिवारात कोविडची लक्षणे बघायला मिळत आहेत. हे याआधी बघायला मिळालं नव्हतं. 
 

Web Title: Coronavirus new dangerous symptoms like gangrene, deafness are seen in patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.