आता कोरोनाच्या नव्या स्ट्रेनपासून 'असा' करता येईल बचाव; तज्ज्ञांनी सांगितले बचावाचे प्रभावी उपाय

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2020 12:40 PM2020-12-23T12:40:22+5:302020-12-23T13:16:56+5:30

CoronaVirus News & Latest Updates : या संक्रमणापासून स्वतःचा कसा बचाव करता येऊ शकतो?. तसंच हिवाळ्याच्या वातावरणात या संक्रमणाचा धोका वाढेल का? याबाबत भारतीय वैद्यकिय तज्ज्ञांनी आपलं मत व्यक्त केलं आहे.

Coronavirus new strain covid-19 information coronavirus question answer | आता कोरोनाच्या नव्या स्ट्रेनपासून 'असा' करता येईल बचाव; तज्ज्ञांनी सांगितले बचावाचे प्रभावी उपाय

आता कोरोनाच्या नव्या स्ट्रेनपासून 'असा' करता येईल बचाव; तज्ज्ञांनी सांगितले बचावाचे प्रभावी उपाय

googlenewsNext

कोरोना व्हायरसच्या वाढत्या संक्रमणामुळे लोकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. कारण जगभरात ७ कोटी ७७ लाखांपेक्षा जास्त लोकांना संक्रणाचा सामना करावा लागला आहे. आतापर्यंत १७ लाखांपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला असून ब्रिटनमध्ये पसरलेल्या कोरोनाच्या नव्या स्ट्रेनने आता सर्वत्र भीतीचं वातावरण तयार झालं आहे. कोरोनाचं हे नवं रूप अधिक संक्रामक असल्याचे सांगितले जात आहे. त्यासाठीच भारतासह इतर ४० देशांनी ब्रिटनवरून येत असलेली विमानं रोखली आहेत. या संक्रमणापासून स्वतःचा कसा बचाव करता येऊ शकतो?. तसंच हिवाळ्याच्या वातावरणात या संक्रमणाचा धोका वाढेल का? याबाबत भारतीय वैद्यकिय तज्ज्ञांनी आपलं मत व्यक्त केलं आहे.

दिल्लीतील राम मनोहर लोहिया रुग्णालयातील डॉ. ए. के वार्ष्णेय यांनी सांगितले की, ''व्हायरस आपलं अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी म्यूटेशन  करत असतो. कोरोना व्हायरसचे आधीसुद्धा अनेक स्ट्रेन दिसून आले असून त्यांचा प्रभाव पाहायला मिळालेला नाही. ब्रिटनमध्ये पसरलेला व्हायरस हा म्यूटेशन मोड असून या व्हायरसच्या पसरण्याची तीव्रता जास्त आहे. म्हणूनच त्या ठिकाणी लॉकडाऊन लावण्यात आला आहे. युकेमध्ये आंतराराष्ट्रीय उड्डाणांवर बंदी घालण्यात आली आहे. जेणेकरून इतर देशांमध्ये व्हायरसचा हा नवीन स्ट्रेन पसरणार नाही. या व्हायरसला घाबरण्यापेक्षा खबरदारी घेतली तर व्हायरसपासून बचाव होऊ शकतो. ''

डॉ. ए. के. वार्ष्णेय यांनी सांगितले की, ''व्हायरच्या म्यूटेशनवर वैज्ञानिकांचे संशोधन सुरू आहे. इन्फ्फुएंजा  व्हायरस कोरोना व्हायरसच्या तुलनेत जास्त वेगाने म्यूटेट होतो. वैज्ञानिक यावर अधिक अभ्यास करत आहेत. इन्फ्लूएंजा व्हायरस कोरोनाच्या तुलनेत जास्त वेगाने म्यूटेट होत आहे. वैज्ञानिक निरंतर या व्हायरसचे अध्ययन करत आहेत. फ्लू ची नवीन लस दरवर्षी येते. त्याचप्रमाणे कोविड १९ चे अध्ययन सुद्धा सुरू राहिल. वैज्ञानिकांनी दिलेल्या माहितीनुसार गरजेनुसार लसीमध्ये बदल केला जाईल. ''

डॉ. ए. के. वार्ष्णेय यांनी सांगितले की, ''हिवाळ्याच्या वातावरणात जेव्हा आपण थंड पाण्याने अंघोळ करतो तेव्हा शरीराचे तापमान अचानक कमी होते.  त्यामुळे शरीराच्या नसा आकुंचन पावतात. त्यामुळे हृदय, मस्तक आणि  शरीरातील अन्य भागांमध्ये रक्त संचार कमी होतो. त्यामुळे शरीराचं नुकसान होऊ शकतं. म्हणून शरीराचं तापमान बाहेरच्या वातावरणाप्रमाणे अनुकूल असालयला हवे. म्हणून हिवाळ्यात कोमट पाण्याने अंघोळ करा.'' CoronaVirus : ...म्हणून कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी महिला सक्षम; पण पुरूषांना धोका जास्त

प्रत्येक प्रकारचे व्हायरस थंडीच्या वातावरणात जास्त काळ जीवंत राहू शकतात. जास्तीत जास्त व्हायरस थंडीच्या वातावरणात जास्त पसरतात. उत्तर भारतात नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारीत वातावरणातील थंडीमुळे सर्दी, खोकला आणि  तापाची समस्या उद्भवते. कोविड १९ हा नवा व्हायरस असून आता हिवाळ्यात या व्हायरसचा कसा परिणाम होतो. हे आता सांगता येणार नाही. काळजी वाढली! कोरोनाचा नवा स्ट्रेन अधिक संक्रामक; तरूणांना सगळ्यात जास्त धोका

Web Title: Coronavirus new strain covid-19 information coronavirus question answer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.