फक्त मास्क लावून चालणार नाही; कोरोनापासून बचावासाठी 'हा' उपाय करावाच लागणार, तज्ज्ञांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2020 05:32 PM2020-12-25T17:32:18+5:302020-12-25T17:40:36+5:30

CoronaVirus news & latest Updates : हे संशोधन फिजिक्स ऑफ फ्लूइड नावाच्या पत्रकात प्रकाशित करण्यात आलं आहे. 

Coronavirus new study finds masks not enough to stop covid-19 spread without distancing | फक्त मास्क लावून चालणार नाही; कोरोनापासून बचावासाठी 'हा' उपाय करावाच लागणार, तज्ज्ञांचा दावा

फक्त मास्क लावून चालणार नाही; कोरोनापासून बचावासाठी 'हा' उपाय करावाच लागणार, तज्ज्ञांचा दावा

Next

कोरोना व्हायरसपासून बचावासाठी अनेक देशांमध्ये लसीकरण अभियान सुरू करण्यात आलं आहे.   वैज्ञानिकांनी दिलेल्या माहितीनुसार लसीकरण झाल्यानंतरही  कोरोनाच्या संसर्गापासून बचावासाठी मास्क लावावाच लागेल. नुकत्याच समोर आलेल्या नवीन संशोधनानुसार संक्रमणापासून बचाव करण्यासाठी मास्कचा वापर पुरेसा नाही तर सोशल डिस्टेंसिंगचं पालन केलं जाणंही तितकंच महत्वाचं आहे. हे संशोधन फिजिक्स ऑफ फ्लूइड नावाच्या पत्रकात प्रकाशित करण्यात आलं आहे. 

संशोधकांनी कोरोनापासून बचावासाठी पाच प्रकारच्या पदार्थांपासून बनवलेल्या मास्कचा परिणाम आणि खोकल्या दरम्यान व्हायरसयुक्त थेंबांचा प्रसार यांचा अभ्यास केला. त्यांच्या मते, वेगवेगळ्या प्रकारे मास्क विषाणूजन्य थेंब पसरण्यापासून रोखतात. संशोधकांच्या मते, एखादा संक्रमित व्यक्ती खोकला किंवा शिंकला तर, त्यामधून विषाणूजन्य असलेले काही थेंब इतर व्यक्तीला आजारी बनवू शकतात. अशा परिस्थितीत व्हायरसपासून सुरक्षित राहण्यासाठी सहा फूट अंतर आवश्यक आहे.

प्रतीकात्मक तस्वीर

संशोधकांनी सांगितले की,'' सर्वप्रकारचे मास्क विषाणूजन्य ड्रॉपलेट्स रोखण्यास प्रभावी ठरले आहेत.  सामान्य कपड्यापासून तयार झालेल्या मास्कमधून ३.६ टक्के ड्रॉपलेट्स  बाहेर आले होते. तर एन ९५ मास्क व्हायरसला रोखण्यासाठी १०० टक्के यशस्वी ठरला होता. म्हणजेच  शरीरात प्रवेश करण्याआधीच व्हायरसला रोखण्यात यश आलं होतं.'' कोरोनाच्या संकटात आता जपानमध्ये बर्ड फ्लूचा हाहाकार; १० लाख कोंबड्यांना मारलं जाणार

संक्रमित व्यक्तीला फक्त एक शिंका आल्याने त्याच्या तोंडातून 200 दशलक्ष विषाणूचे कण बाहेर येतात. यातील बहुतेक कणांपासून मास्कच्या वापराने बचाव करता येतो, परंतु असे असूनही असे काही कण आहेत जे मास्कमधूनही दूर  जाऊ शकतात आणि जर तसे झाले तर जवळपास उभे असलेल्या दुसर्‍या व्यक्तीलाही कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो. कोरोनामुक्त रुग्णांना जीवघेण्या 'गुलियन बेरी सिंड्रोम'चा धोका; जाणून घ्या लक्षणं

असं करण्यात आलेलं संशोधन

संशोधकानी असं एअर जनरेटर तयार केलं आहे. जे माणसाच्या शिंका आणि  खोकल्याचे अनुकरण करू शकतात. या जनरेटरच्या वापराने बंद ट्यूब लेदर शीटद्वारे सुक्ष्मकणांना हवेत सोडण्यात आलं होतं. त्यानंतर वैज्ञानिक स्पष्ट केले की, व्हायरसचा प्रसार होण्यापासून रोखण्यासाठी मास्क आणि सोशल डिस्टेंसिंग या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. सर्जिकल मास्क, सामान्य कपड्यांसह बनवलेले मास्क, दोन-लेअर्सचे कपड्याचे मास्क, एन ९५ मास्क या पाच प्रकरच्या मास्कचा वापर  संशोधकांनी या संशोधनासाठी केला होता.

Web Title: Coronavirus new study finds masks not enough to stop covid-19 spread without distancing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.