कोरोनानं होणारा मृत्यूचा धोका कमी करणार डायबिटीसचं 'हे' औषधं; नवीन संशोधनातून खुलासा
By Manali.bagul | Updated: January 26, 2021 11:38 IST2021-01-26T11:20:36+5:302021-01-26T11:38:13+5:30
CoronaVirus News & Latest Updates : समोर आलेल्या नव्या संशोधनातून असा दावा करण्यात आला आहे की, मेटाफॅर्मिन हे औषध डायबिटीसच्या रुग्णांचा मृत्यूचा धोका कमी करू शकते.

कोरोनानं होणारा मृत्यूचा धोका कमी करणार डायबिटीसचं 'हे' औषधं; नवीन संशोधनातून खुलासा
जगभरात आतापर्यंत कोरोना व्हायरसच्या संक्रमणानं २१ लाखांपेक्षा अधिक लोकांना मृत्यूचा सामना करावा लागला आहे. सध्या देशात कोरोनाची लसीकरणाचे अभियान सुरू आहे. कोरोनामुळे वाढणारा मृत्यूचा धोका कमी करण्यासाठी वारंवार प्रयत्न केले जात आहेत. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोनामुळे मृत्यू होण्याचा धोका अशा लोकांना जास्त असतो जे डायबिटीस किंवा अन्य गंभीर आजारांनी ग्रासलेले असतात कारण त्यांची रोगप्रतिकारकशक्ती फारच कमकुवत असते. समोर आलेल्या नव्या संशोधनातून असा दावा करण्यात आला आहे की, मेटाफॅर्मिन हे औषध डायबिटीसच्या रुग्णांचा मृत्यूचा धोका कमी करू शकते.
'फ्रंटियर्स इन एंडोक्रिनोलॉजी' या पत्रकात हे संशोधन प्रकाशित करण्यात आलं आहे. या अभ्यासादरम्यान संशोधकांनी मेटाफॉर्मिन हे औषधानं उपचार घेत असलेल्या डायबिटीसनं पिडीत असलेल्या लोकांमध्ये कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण कमी आहे. याआधीही चीनच्या वुहानमध्येही डॉक्टरांनी मेटाफॉर्मिन या औषधावर संशोधन केले होते. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार हे औषध कोरोना रुग्णांच्या उपचारांमध्ये परिणामकारक ठरत असल्याचे दिसून आलं आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार डायबिटीसचे रुग्ण जे कोरोनानं संक्रमित होते ते सुद्धा मेटाफॉर्मिन औषध घेत होते. Corona Vaccine: कोरोना लसीविषयी गैरसमजूत बाळगू नका; अफवांकडे दुर्लक्ष करा, परंतु 'हे' लक्षात ठेवा
हे औषध घेणाऱ्यांच्या तुलनेत हे औषध न घेणाऱ्यांमध्ये मृत्यूचा धोका जास्त होता. संशोधकांनी या संबंधित आकडेवारी समोर ठेवली आहे. त्यानुसार मेटाफॉर्मिन औषध न घेतल्यानं २२ डायबिटीसच्या रुग्णांचा मृत्यू झाला होता. तेव्हा हे औषध फक्त तीन रुग्ण घेत होते. मागच्यावर्षीही जून जुलै महिन्याच्या आसपास अमेरिकेतील मिन्नीसोटा युनिव्हर्सिटीतील संशोधकांनी जवळपास ६ हजार रुग्णांवर मेटाफॉर्मिन औषधाचा प्रयोग केला होता. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोना व्हायरसनं संक्रमित असलेल्या रुग्णांचा मृत्यूचा धोका कमी करता येतो. अरे व्वा! कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखणारा नेजल स्प्रे लवकरच बाजारात येणार, तज्ज्ञांचा दावा
कोणत्या आजाराचं औषध आहे मेटाफॅर्मिन
हे खूप जुनं औषध असून याचा वापर १९५० च्या दशकापासून केला जात आहे. हे औषध टाईप २ डायबिटीसच्या रुग्णांच्या उपचारांसाठी वापरलं जातं. इंग्रजी माध्यम द सन नं दिलेल्या माहितीनुसार ब्रिटनचे प्रमुख आरोग्य संस्थान नॅशनल हेल्थ सर्विसकडून सुरूवातीपासूनच या औषधाचा वापर केला जात आहे.