कोरोना व्हायरसमुळे पुरूषांच्या प्रजनन क्षमतेवर परिणाम?; नवीन संशोधनातून खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2021 02:21 PM2021-01-31T14:21:39+5:302021-01-31T14:30:09+5:30
CoronaVirus News & Latest Updates : शुक्राणूंवर होणारे हे परिणाम शुक्राणूंची गुणवत्ता आणि प्रजनन क्षमतेशी संबंधित आहेत.
कोरोना व्हायरसनं गेल्या एका वर्षापासून कहर केला आहे. अजूनही कोरोना व्हायरसची नवनवीन लक्षणं संशोधनातून समोर येत आहेत. नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार कोरोना व्हायरसच्या संक्रमणानं पुरूषांच्या प्रजनन क्षमतेवर परिणाम होऊ शकतो. कोरोनाच्या प्रभावामुळे पुरुषांमधील शुक्राणूंची गुणवत्ता कमी होऊ शकते. संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार प्रत्यक्ष पुरावे सापडले आहेत. कोरोनामुळे प्रजनन प्रणालीला नुकसान पोहोचू शकते. रिप्रोडक्शन या वैद्यकीय पत्रकात याबाबत अहवाल प्रकाशित करण्यात आला आहे.
पुरुषांमधील प्रजननक्षमतेवर विषाणूचा परिणाम अद्याप स्पष्ट झालेला नाही. या निष्कर्षापर्यंत पोहोचण्यासाठी १०५ निरोगी आणि कोरोना संक्रमित पुरुषांच्या ८४ शुक्राणूंच्या सॅम्पलवर अभ्यास केला गेला. जर्मनीतील जस्टस लायबिग विद्यापीठाचे संशोधक बेहजाद हजीजादे मालेकी म्हणाले, ''शुक्राणूंवर होणारे हे परिणाम शुक्राणूंची गुणवत्ता आणि प्रजनन क्षमतेशी संबंधित आहेत. कालांतराने हे प्रभाव सुधारले असले तरी कोविड -१९ मधील रूग्णांमध्ये ते लक्षणीय प्रमाणात दिसून आले. कोरोनाचा त्रास जेवढा तीव्र असेल तितके मोठे बदल होत आहेत.''
संशोधक बेहजाद हाजीजादे मालेकी म्हणाले की, ''पुरुष प्रजनन प्रणालीला 'कोविड -१९ संसर्गाचा धोका हा संवेदनशील मुद्दा आहे. जागतिक आरोग्य संघटनेनेदेखील उच्च जोखीम घोषित करायला हवी.'' तथापि, यावर अधिक संशोधन होणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्याच वेळी, ब्रिटनमधील केअर फर्टिलिटी ग्रुपमधील भ्रूणविज्ञानाचे संचालक एलिसन कॅम्पबेल म्हणतात की, ''पुरुषांनी अनावश्यक काळजी करू नये. कोविड -१९ मुळे शुक्राणूंची गुणवत्ता किंवा पुरुषांची प्रजनन क्षमतेचे कायमचे नुकसान होण्याचे निश्चित पुरावे सध्या सापडलेले नाहीत.''शिळे झाल्यानंतर चुकूनही करू नका 'या' पदार्थांचे सेवन; उरलेलं अन्न खाणं ठरू शकतं घातक
अलीकडेच ‘ओपन बायोलॉजी’ या जर्नलमध्येही एक संशोधन अहवाल प्रसिद्ध करण्यात आला ज्यामध्ये असा दावा केला गेला आहे की पुरुषांच्या प्रजननक्षमतेवर कोरोना विषाणूचा नकारात्मक प्रभाव पडतो, कारण हा विषाणू पुरुषांमध्ये स्त्रियांपेक्षा अधिक प्रभावीपणे हल्ला करतो. तुम्हालाही सतत तहान लागत असेल तर असू शकतो 'हा' गंभीर आजार; दुर्लक्ष करणं पडू शकतं महागात