खुशखबर! कोरोना संसर्ग रोखण्यसाठी ९४ टक्के प्रभावी ठरणार मॉडर्नाची कोरोना लस; तज्ज्ञांचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2021 12:41 PM2021-01-01T12:41:58+5:302021-01-01T12:43:05+5:30
CoronaVirus News & Latest Updates : यासंबंधी एक अध्ययन बुधवारी 'द 'न्यू इंग्लँड जर्नल ऑफ मेडिसिन' मध्ये प्रकाशित करण्यात आलं होतं.
अमेरिकेनं अलिकडेच मॉर्डना कंपनीद्वारे कोरोनाची लस विकसीत केली असून आपातकालीन वापरासाठी परवानगी दिली आहे. या ठिकाणी लसीकरण अभियानाअंतर्गत लोकांना लसीचे डोस दिले जात आहे. आतापर्यंत या प्रायोगिक परिक्षणाचे परिणाम समोर आलेली नाहीत. रिपोर्ट्सनुसार मॉर्डनाची लसीच्या तिसऱ्या ट्प्प्यातील वैद्यकिय चाचणीनंतर असं दिसून आलं की, कोरोनाला रोखण्यासाठी ही लस परिणामकारक ठरत असून ९४.१ टक्के प्रभावी ठरत आहे. यासंबंधी एक अध्ययन बुधवारी 'द 'न्यू इंग्लँड जर्नल ऑफ मेडिसिन' मध्ये प्रकाशित करण्यात आलं होतं.
या अध्ययनानुसार प्रयोगिक परिक्षणाअंतर्गत ३० हजारांपेक्षा अधिक लोकांना सहभागी करून लस देण्यात आली होती. या स्वयंसेवकांमध्ये काही प्रमाणात कोरोनाची लक्षणं दिसून आली होती. त्यानंतर ही लस कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी ९४.१ टक्के प्रभावी ठरत असल्याचे दिसून आले. तसंच गंभीर आजार असलेल्या लोकांना प्लेसबो देण्यात आले होते.
हे प्रायोगिक परिक्षण अमेरिकेतील ब्रिघम एंड विमेंस रुग्णालयात करण्यात आलं होतं. द न्यू इंग्लँड जर्नल ऑफ मेडिसिन'मध्ये प्रकाशित करण्याता आलेल्या या लेखाचे सह लेखक आणि संक्रामक रोग विशेषज्ञ लिंडसें बॅडेन यांनी सांगितले की, या लसीच्या चाचण्यांवरून दिसून येतं की मॉर्डनाची लस गंभीर आजार असलेल्या लोकांसाठी परिणामकारक ठरू शकते. याचे संकेत मिळायला सुरूवात झाली आहे. लस दिल्यास काही वेळासाठी संक्रमण तसंच संक्रमणामुळे होणारे मृत्यू रोखता येऊ शकतात.
नववर्षाला आनंदाची बातमी! देशात कमी होतोय कोरोनाचा प्रभाव; समोर आली दिलासादायक आकडेवारी
रिपोर्ट्सनुसार या संशोधनासाठी अमेरिकेतील ९९ ठिकाणाहून ३०,४२० वयस्कर लोकांचा समावेश करण्यात आला होता. ज्यात ब्रिघममधील ६०० पेक्षा जास्त स्वयंसेवकांचा समावेश होता. यात वेगवेगळ्या वयाचे लोक सहभागी झाले होते. लिंडसे बॅडेन यांनी सांगितले की, आमचे काम सुरू आहे. पुढच्या महिन्यात आमच्याकडे यासंबंधी वेगळी माहिती असेल. ज्याद्वारे कोरोना लसीच्या परिणामांबाबत अधिक माहिती मिळवता येऊ शकते.
आधीपेक्षा जास्त जीवघेणा ठरणार कोरोनाचा नवा स्ट्रेन? संशोधनातून समोर आली महत्वाची माहिती
दरम्यान कोरोनाच्या नव्या स्ट्रेनविरोधात कोवॅक्सिन (Covaxin) म्हणजेच BBV152 लस प्रभावी आहे, अशी माहिती ही लस तयार करणाऱ्या हैदराबादमधील भारत बायोटेकनं दिली होती. कंपनीनं याआधीच या लशीला आपात्कालीन वापरासाठी मंजुरी मिळावी यासाठी केंद्र सरकारकडे अर्ज केला होता.
भारत बायोटेकआयसीएमआर, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी यांच्या संयुक्त विद्यमाने ही लस तयार केली आहे. कोवाक्सिन SARS-Cov-2 ची इनअॅक्टिव्हेटेड स्ट्रेनमधून तयार केली आहे. या लशीचं तिसऱ्या टप्प्यातील वैद्यकिय चाचणी सुरू आहे. कंपनीनं याआधी पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील चाचणीचा अहवाल दिला होता.