चिंताजनक! मार्चपर्यंत 'या' देशात वेगानं वाढणार कोरोनाचा नवा स्ट्रेन; वैज्ञानिकांचा धोक्याचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2021 11:40 AM2021-01-18T11:40:50+5:302021-01-18T11:47:20+5:30
CoronaVirus News & Latest Updates : आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार ब्रिटनमध्ये पसरलेला कोरोना व्हायरसचा नवीन स्ट्रेन मार्चपर्यंत अमेरिकेतील मोठ्या समुहाला संक्रमित करू शकतो.
जगभरातील वेगवेगळ्या देशात कोरोना लसीकरणाच्या मोहिमेला सुरूवात झाली आहे. तरीसुद्धा कोरोना व्हायरसच्या नवीन स्ट्रेनच्या प्रसारानं जगभरात चिंतेचे वातावरण पसरले आहे. कोरोना व्हायरसनं सगळ्यात जास्त संक्रमित असलेल्या देशांमध्ये अमेरिकेचा समावेश आहे. अमेरिकन अधिकाऱ्यांनी कोरोनाच्या नवीन स्ट्रेनबाबत धोक्याची सुचना दिली आहे. आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार ब्रिटनमध्ये पसरलेला कोरोना व्हायरसचा नवीन स्ट्रेन मार्चपर्यंत अमेरिकेतील मोठ्या समुहाला संक्रमित करू शकतो.
गेल्या शुक्रवारी अमेरिकेचे नव निर्वाचित राष्ट्राध्यक्ष जिओ बायडन यांनी कोरोनाच्या माहामारीशी लढण्यासाठी आपली योजना समोर ठेवली. ज्यात असं म्हटलं होतं की, लसीकरण प्रक्रिया अधिक वेगानं करावी लागणार. त्याचवेळी अमेरिकेतील सेंटर फॉर डिजीज कंट्रोल अॅण्ड प्रिवेंशनने याबाबत धोक्याची सुचना दिली आहे.
सीडीसीने दिलेल्या माहितीनुसार पुढच्या काही आठवड्यात कोरोनाच्या या नवीन स्ट्रेनचा प्रसार वेगानं होताना दिसून येत आहे. हिवाळ्यात सुरूवातीपासूनच कोरोना संक्रमणाच्या प्रकरणात वाढ झालेली पाहायला मिळाली. अशा स्थितीत नवीन स्ट्रेनचा प्रसार वाढल्यास आरोग्य व्यवस्थेवर ताण येण्याची शक्यता आहे.
तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोनाचा नवा स्ट्रेन अपेक्षेपेक्षा जास्त संक्रामक असू शकतो. पण याबाबत अद्याप कोणताही पुरावा सापडलेला नाही. सध्या तयार करण्यात आलेल्या लसी कोरोनाच्या नव्या स्ट्रेनवर प्रभावी ठरणार नाहीत असं काही तज्ज्ञांचे मत असून अमेरिकन कंपनी फायजरची कोरोनी लस लॅबमध्ये तपासणी केल्यानंतर या नवीन स्ट्रेनशी लढण्यासाठी प्रभावी ठरल्याचे दिसून आले आहे. हिवाळ्यात 'या' ५ पीठांपासून बनवलेली भाकरी खाल; तर आरोग्याच्या तक्रारींसाठी दवाखान्यात जाणं विसराल
कोरोनाच्या नवीन स्ट्रेनचा धोका लक्षात घेता अनेक देशांच्या विमान सेवांवर प्रतिबंध घालण्यात आले होते. यात इटलीचासुद्धा समावेश आहे. इटलीने ब्राझिलच्या उड्डानांवर बंदी घातली असून आरोग्यमंत्री रॉबर्टो स्पेरन्जा यांनी शनिवारी दिलेल्या माहितीनुसार १४ दिवसांमध्ये ज्यांनी ब्राझिलमध्ये प्रवास होता त्यांना इटलीत प्रवेश करण्यापासून रोखण्यात आलं आहे.
दरम्यान ब्राझिल ते इटली प्रवास करत असलेल्या लोकांना कोरोनाच्या नवीन स्ट्रेनची चाचणी करणं आवश्यक असणर आहे. वैज्ञानिकांनी दिलेल्या माहितीनुसार या नवीन स्ट्रेनचे अध्ययन करणं गरजेचं असून लोकांनी अधिक सावधगिरी बाळगायला हवी. जीवघेण्या ठरू शकतात भेसळयुक्त पीठाच्या चपात्या; 'असा' ओळखा बनावट अन् चांगल्या पीठातील फरक