कोरोनाच्या लढ्यात ५ पैकी ३ लसी चीनी कंपनीच्या; लसीच्या शर्यतीत चीन बाजी मारणार? जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2020 06:23 PM2020-07-28T18:23:21+5:302020-07-28T18:33:52+5:30
CoronaVirus News & Latest Updates : सगळ्यात आधी चीनी कंपन्याची लस तयार होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे.
जगभरातील देश कोरोनाच्या माहामारीतून बाहेर येण्यासाठी लसीच्या शोधात आहे. कोरोनाच्या लसीच्या या शर्यतीत आतापर्यंत ५ कंपन्यांना यश मिळाले आहे. विशेष म्हणजे कोरोनाची लस तयार करत असलेल्या पाचपैकी तीन लसी या चीनी कंपनीने तयार केलेल्या आहेत. अन्य दोन लसींच्या तुलनेत चीनी कंपनीनचे लसीचे परिक्षण वेगाने पूर्ण होत आहे. जागतीक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनसार आतापर्यंत कोरोनाच्या पाच लसी शर्यतीत पुढे आहेत. या लसींचे अंतीम टप्प्यातील ट्रायल सध्या सुरू आहे. सगळ्यात आधी चीनी कंपन्याची लस तयार होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे.
सिनोवॅक
चिनच्या सिनोवॅक कंपनीची लस शर्यतीत सगळ्यात पुढे आहे. सगळ्यात आधी या देशात माहामारी पसरल्यामुळे व्हायरसची लस तयार करण्यासाठी सगळ्यात जास्त सॅपल्स या कंपनीला मिळले. सिनोवॅक बायोटेकने लसीच्या चाचण्या पूर्ण केल्या आहेत. चीनी कंपन्या लसीच्या चाचण्या लवकरात लवकर तयार करू शकतात. या लसीचे शेवटच्या टप्प्यातील ट्रायल बांग्लादेशमध्ये सुरू आहे.
वुहान इंस्टिट्युट ऑफ बायोलॉजिकल प्रोडक्ट्स (सिनोफार्म)
ज्या शहरातून कोरोना व्हायरस पसरला त्या ठिकाणी वुहान इंस्टिट्युट ऑफ बायोलॉजिकल प्रोडक्ट्स ने सिनोफार्म (Sinopharm) नावाने लस तयार केली आहे. आतंरराष्ट्रीय स्तरावर ही लस लॉन्च करण्यासाठी ३ वैद्यकिय परिक्षणांना सुरूवात केली आहे.
बीजिंग इंस्टिट्युट ऑफ बायोलॉजिक प्रोडक्ट (सिनोफार्म)
चीनच्या राजधानीत बीजिंग इंस्टिट्युट ऑफ बायोलॉजिक प्रोडक्ट (सिनोफार्म) आपली लस लवकरात लवकर बाजारात आणणार आहे. सगळ्या प्रकारची परिक्षण झाल्यानंतर ही लस पूर्णपणे सुरक्षित असल्याचा दावा चीनी तज्ज्ञांनी केला आहे. आबूधाबीमध्ये या लसीचे ट्रायल सुरू झाले आहे.
एक्स्ट्राजेनका
ब्रिटनच्या ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीने या लसीचे नाव एक्स्ट्राजेनका असे ठेवले आहे. या लसीचे माणसांवरील परिक्षण सुरू झाले आहे. ब्रिटिश संशोधकांनी या लसीचे शेवटच्या टप्प्यातील ट्रायल दक्षिण आफ्रिका आणि ब्राजिलमध्ये करण्याचा निर्णय घेतला आहे.
युनिवर्सिटी ऑफ मेलबर्न
ऑस्ट्रेलियातील युनिव्हर्सिटी ऑफ मेलबर्नची लस सुद्धा या शर्यतीत पुढे आहे. तज्ज्ञांनी नऊ वर्ष आधीच्या टीबीच्या औषधाचा वापर करत कोरोनाची लस तयार केली आहे. चाचणीदरम्यान या लसीचे चांगले परिणाम दिसून आले आहेत. सुरूवातीच्या दोन टप्प्यातील चाचणी पूर्ण होऊन आता लसीचे शेवटच्या टप्प्यातील ट्रायल लवकरच सुरू होणार आहे.
दालचिनीच्या सेवनाने होतात 'हे' ६ फायदे; कोरोनाशी लढण्यासाठी रोगप्रतिकारकशक्ती वाढण्यास होईल मदत
जास्त खाणं सोडाल तरच कोविड 19 मुळे होणाऱ्या मृत्यूचा टळेल धोका, 'या' देशातील आरोग्यमंत्र्यांचा सल्ला