वृद्ध दाम्पत्याची कोरोनावर मात! ८५ वर्षीय कॅन्सरग्रस्त आजोबांनी पत्नीसह कोरोनाला हरवलं...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2020 02:15 PM2020-07-19T14:15:55+5:302020-07-19T14:18:12+5:30
काही दिवसांपूर्वी ८५ वर्षीय सुरेंद्रा पती त्यांना कोरोनाची लागण झाली. सुरेद्रा यांना कर्करोगाचा आजार सुद्धा आहे. त्यानंतर त्यांची पत्नी ७८ वर्षीय सावित्री यांनाही कोरोनाची लागण झाली.
(Image credit- India Today, NDTV)
कोरोना व्हायरसच्या प्रसाराने जगभरात हाहाकार पसरला आहे. तर दिवसेंदिवस कोरोना रुग्णांसह मृतांच्या संख्येत वाढ होत असल्याने भीतीचं वातावरण पसरलं आहे. कोरोनाशी लढा देण्यासाठी आरोग्य सेवेत कार्यरत असलेले कर्मचारी रात्रंदिवस झटत आहेत. उडिसामधील एका वृद्ध दाम्पत्याने कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. या घटनेने डॉक्टरांसह देशभरातील कोरोना रुग्णांनाही आशेचा किरण दाखवला आहे.
उडिसाच्या केंद्रपारा जिल्ह्यात वास्तव्यास असलेल्या एका वृद्ध दाम्पत्याने कोरोनाला हरवल्यामुळे सगळ्यांमध्येच उत्साहाच वातावरण आहे. काही दिवसांपूर्वी ८५ वर्षीय सुरेंद्रा पती त्यांना कोरोनाची लागण झाली. सुरेद्रा यांना कर्करोगाचा आजार सुद्धा आहे. त्यानंतर त्यांची पत्नी ७८ वर्षीय सावित्री यांनाही कोरोनाची लागण झाली. योग्य वैद्यकिय उपचार केल्यानंतर आता डॉक्टरांनी या दोघांनाही घरी सोडले आहे.
केंद्रपारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सामंत वर्मा यांनी इंडीया टू डे ला दिलेल्या माहितीनुसार, ''हे वृद्ध दाम्पत्य कोरोनासारख्या जीवघेण्या आजारातून सुखरूपपणे बाहेर आल्यामुळे आरोग्य सेवेतील कर्मचारी आणि जिल्ह्यातील इतर लोकांना प्रेरणा मिळाली आहे. ''
पुढे ते म्हणाले की, ''सर्वसामान्य लोकांसाठी आशेचा किरण ठरणारी ही गोष्ट आहे. ८५ वर्षीय सुरेंद्रा पती हे आधीपासूनच कर्करोगाशी लढा देत होते. अशा स्थितीत त्यांना आणि त्यांची ७८ वर्षीय पत्नी सावित्री या दोघांनाही कोरोनाची लागण झाली. खरंतर ही खूपच गंभीर स्थिती होती. पण या दोघांनीही कोरोनाला हरवल्यानंतर आता डॉक्टरांनी डिस्चार्ज दिला आहे. फक्त कोरोनाच नाही तर इतर आजारांशी झुंज देत असलेल्या लोकांनाही या वृद्ध दाम्पत्यामुळे प्रेरणा मिळाली आहे.''
उडिसाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनीही ट्विटरच्या माध्यामातून या वृद्ध दाम्पत्याचे अभिनंदन केले आहे. या दाम्पत्याच्या कोरोनातून बाहेर येण्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात उत्साहाचं वातावरण आहे. कोरोनाच्या या कठीण काळात या वृद्ध दाम्पत्याने कोरोनावर केलेली मात चर्चेचा विषय ठरला आहे.
ज्या व्यक्तीला भेटलात तीच व्यक्ती कोरोना पॉझिटीव्ह आल्यास; संक्रमणापासून कसा कराल बचाव?
Coronavirus : ६ प्रकारच्या कोरोना व्हायरस आजाराची माहिती आली समोर, वाचा कोणता किती घातक?