CoronaVirus News: ब्लॅक फंगसनंतर कोरोनामुळे नवं संकट; शरीराला सूज, हृदयक्रिया बंद पडण्याचा धोका
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2021 12:56 PM2021-05-17T12:56:18+5:302021-05-17T12:59:51+5:30
CoronaVirus News: कोरोना विषाणू नवे रंग दाखवतोय; लहान मुलांना असलेला धोका आणखी वाढतोय
मुंबई: देशातील कोरोना रुग्णांचा आकडा आता कमी होऊ लागला आहे. कोरोनाची दुसरी लाट ओसरू लागल्याचं आकडेवारीवरून दिसू लागलं आहे. मात्र कोरोना पाठोपाठ आलेल्या नव्या संकटांमुळे चिंता वाढू लागली आहे. गेल्या दीड वर्षांत कोरोना विषाणूनं अनेकदा आपलं रुप बदललं. कोरोनाची नवीन लक्षणं समोर आली. देशात आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ब्लॅक फंगसचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.
अरेरे! घरात विलगीकरणासाठी जागा नाही; पठ्ठ्याने झाडावर काढले तब्बल ११ दिवस
ब्रिटनमधील इव्हलिना लंडन चिल्ड्रन रुग्णालयात कोरोनाची लागण झालेल्या लहानग्यांमध्ये नवी लक्षणं दिसून येत आहेत. मुलांच्या शरीराला सूज येत असून अचानक त्यांच्या हृदयाची धडधड थांबत आहे. कोविड १९ च्या सुरुवातीला लहान मुलांमध्ये कावासाकी आजाराची लक्षणं दिसली आहे. कावासाकी आजार झाल्यावर शरीरावर लाल रंगाचे चट्टे उठतात. काही मुलांनी यामुळे जीवदेखील गमावला. आता ब्रिटनमध्ये अन्य प्रकारची लक्षणं आढळून येत असल्यानं चिंतेत भर पडली आहे.
कोरोनाचा वेग काहीसा मंदावला; नव्या कोरोनाबाधितांची संख्या ३ लाखांपेक्षाही कमी
ऑलिव्हर पॅटरसन नावाच्या ६ वर्षीय मुलाचा जीव नव्या लक्षणांमुळे धोक्यात सापडला आहे. ऑलिवरला वेगळाच आजार झाला आहे. या आजाराचा संबंध कोरोनाशी असल्याचं सांगितलं जात आहे. ऑलिव्हरच्या शरीरावर लाल चट्टे उठले आहेत. त्याच्या हृदयातील मांसपेशी आंकुचन पावल्या आहेत. ऑलिव्हरची आई लॉरानं तिच्या मुलाच्या शरीरात झालेले बदल सांगत जगभरातील महिलांना त्यांच्या मुलांची काळजी घेण्यास सांगितलं आहे.
'ऑलिव्हरच्या अंगावर अचानक लाल चट्टे आले. त्याला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. तेव्हा त्याला रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र तिथे त्याच्या शरीराला सूज आली. त्यामुळे त्याच्या हृदयातील मांसपेशी आंकुचन पावल्या. डॉक्टरांनी त्याला आयसीयूमध्ये ठेवलं. त्याची प्रकृती बरीच खालावली. त्याचा मृत्यू थोडक्यात टळला,' असं लॉरा यांनी सांगितलं.