CoronaVirus News: अशीही केली जाते ओमायक्रॉन टेस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2022 09:18 AM2022-01-18T09:18:34+5:302022-01-18T09:18:54+5:30

जिनोम सिक्वेन्सिंगच्या माध्यमातून ओमायक्रॉनची चाचणी केली जाते. परंतु व्हेरिएंटच्या प्रसारवेगापुढे जिनोम सिक्वेन्सिंगचा वेग कमी पडत आहे. त्यामुळे आरटी-पीसीआरमधूनही ओमायक्रॉनची चाचणी केली जाऊ शकते.

CoronaVirus News: This is also done Omycron test | CoronaVirus News: अशीही केली जाते ओमायक्रॉन टेस्ट

CoronaVirus News: अशीही केली जाते ओमायक्रॉन टेस्ट

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क : देशात सध्या ओमायक्रॉनचा प्रसार झपाट्याने होत आहे. जिनोम सिक्वेन्सिंगच्या माध्यमातून ओमायक्रॉनची चाचणी केली जाते. परंतु व्हेरिएंटच्या प्रसारवेगापुढे जिनोम सिक्वेन्सिंगचा वेग कमी पडत आहे. त्यामुळे आरटी-पीसीआरमधूनही ओमायक्रॉनची चाचणी केली जाऊ शकते.

आरटी-पीसीआर चाचणी
सर्वप्रथम व्यक्तीच्या घसा अथवा नाकाच्या माध्यमातून स्वॅब घेतले जातात. त्यानंतर आरटी-पीसीआर चाचणी केली जाते.
स्वॅबचे नमुने पुढील तपासासाठी प्रयोगशाळेत पाठविले जातात.
त्यातून व्यक्तीला बाधा झाली आहे किंवा कसे, हे निश्चित होते. त्यानंतर नमुन्यात एस-जीन आहेत का, हे पाहिले जाते.

भारतात : ओमायक्रॉन चाचणी
परदेशातून आलेल्या लोकांची आरटी-पीसीआर चाचणी केली जाते.
अहवाल पॉझिटिव्ह आल्यास स्वॅब नमुने प्रयोगशाळेत पाठवितात.
प्रयोगशाळेत या नमुन्यांची जिनोम सिक्वेन्सिंग चाचणी केली जाते.
त्यांचा अहवाल आल्यानंतरच ओमायक्रॉनबाबतचे चित्र स्पष्ट होते.

जिनोम सिक्वेन्सिंग खर्चीक
ओमायक्रॉन व्हेरिएंटचा छडा लावण्यासाठी जिनोम सिक्वेन्सिंग केले जाते.
परंतु जिनोम सिक्वेन्सिंग ही खर्चीक आणि वेळखाऊ प्रक्रिया आहे.
जिनोम सिक्वेन्सिंगचे अहवाल येण्यास वेळ लागतो आणि त्यामानाने संसर्गाचे प्रमाण वाढलेले असते.
आरटी-पीसीआरच्या माध्यमातूनही ओमायक्रॉनचा तपास लागू शकतो. ही चाचणी अवघ्या अडीचशे रुपयात उपलब्ध आहे.

एस-जीन नसणे म्हणजे ओमायक्रॉनबाधित
विषाणूत उपस्थित असलेल्या एस-जीनच्या माध्यमातूनच ओमायक्रॉनची पुष्टी केली जाते.
एखाद्याच्या स्वॅब नमुन्यात एस-जीन नसल्यास संबंधित व्यक्ती ओमायक्रॉनबाधित असल्याचे स्पष्ट होते.
एस-जीन उपस्थित असूनही अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्यास अन्य व्हेरिएंटची बाधा झाल्याचे समजतात.

Web Title: CoronaVirus News: This is also done Omycron test

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.