CoronaVirus : ७ महिन्यांच्या चिमुरडीनं कोरोनाला हरवताच; स्पर्शानं आईला हिंमत मिळाली; संपूर्ण कुटुंबाची कोरोनावर मात
By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2021 03:52 PM2021-04-26T15:52:28+5:302021-04-26T15:55:05+5:30
CoronaVirus Positive News : संपूर्ण घर पॉझिटिव्ह असताना अवंतिका नावाची ७ वर्षांची चिमुरडी बरी झाली आणि सगळ्यांनाच आशेचा किरण दिसला. तिला पाहता पाहता संपूर्ण कुटुंब कोरोनातून मुक्त झालं.
संपूर्ण जगभरात कोरोना व्हायरसनं हाहाकार पसरवलेला पाहायला मिळत आहे. ऑक्सिजनची कमतरता बेड्सचा अभाव यांमुळे ठिकठिकाणी लोकांना आपले प्राण गमवावे लागत आहेत. अशातच एका 7 महिन्यांच्या चिमुरडीनं कोरोनावर मात केल्याची सकारात्मक घटना बिहारची राजधानी पटना येथून समोर आली आहे. दैनिक भास्करच्या रिपोर्टनुसार संपूर्ण घर पॉझिटिव्ह असताना अवंतिका नावाची ७ वर्षांची चिमुरडी बरी झाली आणि सगळ्यांनाच आशेचा किरण दिसला. तिला पाहता पाहता संपूर्ण कुटुंब कोरोनातून मुक्त झालं.
डॉ. अमृत राज शर्मा हे एम्सच्या ईएनटी विभागात वरिष्ठ सर्जन आहेत. अमृत यांची पत्नी अनामिका पीएनबीमध्ये कामाला आहेत. हे सर्व अवंतिकाच्या जन्मासाठी घेतलेल्या प्रसूतीच्या रजेदरम्यान घडले. डॉ अमृत हे कोरोना कालावधीत रुग्णांची सेवा करत होते. घरात 7 महिन्यांची अवंतिका आणि दीड वर्षाचा मुलगा शिवांश आहे. मुलांची काळजी घेणारा एक मेड आणि एक नात्यातील मुलगी देखील एक कुटुंब म्हणून एकत्र राहते.
माध्यमांशी बोलताना डॉ. अमृत राज यांनी सांगितले की, ''अत्यंत सावधगिरी बाळगूनही संपर्कात असलेल्या रूग्णांवर उपचार करताना मी कोरोना संक्रमित झालो. मला एप्रिलमध्ये ताप आला आणि त्यानंतर मी घरीच राहीलो. रिपोर्ट 9 एप्रिल रोजी निगेटिव्ह आला. पण लक्षणं मात्र कमी झाली नव्हती. सर्दीबरोबर खोकला येऊ लागला. पत्नी अनामिकामध्येही लक्षणं दिसायला सुरूवा झाली. नंतर तीनंही स्वतःला क्वारंटाईन केले. 7 महिन्यांच्या मुलीला 24 तास आईपासून वेगळं ठेवावं लागलं. जेणेकरुन तिला संसर्ग होऊ नये. त्यानंतर पती-पत्नीने तपासणीनंतर दोघांचेही रिपोर्ट पॉझिटिव्ह आले.''
पुढे त्यांनी सांगितले की, ''बघता बघता आमची दोन्ही लहान मुलंही कोरोना पॉझिटिव्ह आली. इतकंच नाही तर ज्या रुग्णालयात काम करत होतो. तिथंही बेड उपलब्ध झाला नाही. जनरल वॉर्डमध्ये जागा मिळाली. पण मुलांना अजूनही भरती करून न घेतल्यामुळे तणावाचं वातावरण होतं. कसंबसं एम्समध्ये माझ्या पत्नीला दाखल करून घेण्यात आलं. त्यानंतर माझी दोन्ही मुलंही पत्नीसह त्याच ठिकाणी दाखल झाली होती. ''
त्यांनी लसीचे दोन्ही डोस घेतले होते, त्यामुळे विषाणूचा त्यांच्यावर फारसा परिणाम झाला नाही. पण 7 महिन्यांच्या मुलीनेही या लस न घेताही कोरोनाशी चांगलाच लढा दिला. चिमुरडी पूर्णपणे बरी झाली, खेळू लागली तेव्हा सगळ्यांच्या जीवात जीव आला. तेव्हा तिच्या आईलाही लवकर बरं होण्याची हिम्मत मिळाली. अशाच पद्धतीनं संपूर्ण कुटुंबाला कोरोनाशी लढण्याचे बळ मिळाले.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेपासून बचावासाठी काय खायचं आणि काय टाळायचं?; WHO नं दिल्या गाईडलाईन्स
डॉ.अमृत म्हणतात की, '' जर आई- बाळ दोन्ही घरात कोरोना पॉझिटिव्ह असेल असतील आणि जर मुलाला आईच्या आहारांची आवश्यकता असेल तर त्या दोघांनाही एकत्र ठेवा. जेणेकरून दोघांच्याही तब्येतील वेगानं सुधारणा होईल. आमच्या घरातल्या सर्व सदस्यांपैकी 7 महिन्यांच्या मुलीने कोविडला लवकर हरवलं. यामागील मोठा संदेश असा आहे की तिला कोणतीही भीती नव्हती, तिला बाहेरच्या परिस्थीतीबाबत काहीही माहिती नव्हते. त्याचप्रमाणे कोरोनापासून कोणालाही घाबरू नका, फक्त धैर्याने मार्गदर्शक तत्त्वाचे अनुसरण करा आणि कोरोनाचा पराभव करा.''