ब्रिटनसह अनेक भागात कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचा हाहाकार; पुन्हा सक्तीच्या लॉकडाऊनमध्ये राहावं लागणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2020 04:43 PM2020-12-23T16:43:05+5:302020-12-23T16:55:41+5:30

CoronaVirus News & Latest Updates : दक्षिण, पश्चिम, मिडलँड आणि उत्तर इंग्लंडमध्ये कोरोना विषाणूचे नवीन प्रकरण समोर आल्यानंतर ब्रिटनचे मंत्री आणि वैद्यकीय तज्ज्ञांची काल रात्री भेट झाली.

CoronaVirus News : Britain mutant new coronavirus strain chaos tier 4 lockdown | ब्रिटनसह अनेक भागात कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचा हाहाकार; पुन्हा सक्तीच्या लॉकडाऊनमध्ये राहावं लागणार?

ब्रिटनसह अनेक भागात कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचा हाहाकार; पुन्हा सक्तीच्या लॉकडाऊनमध्ये राहावं लागणार?

googlenewsNext

ब्रिटनमधील बर्‍याच नवीन भागात कोरोना विषाणूचे नवीन स्ट्रेन सापडले आहेत. यामुळे, कठोर निर्बंधांची व्याप्ती वाढविली जात आहे. द सनच्या वृत्तानुसार, २ डिसेंबर डिसेंबरपासून इंग्लंडच्या बर्‍याच भागात कडक लॉकडाउन लागू केले जाईल. दक्षिण, पश्चिम, मिडलँड आणि उत्तर इंग्लंडमध्ये कोरोना विषाणूचे नवीन प्रकरण समोर आल्यानंतर ब्रिटनचे मंत्री आणि वैद्यकीय तज्ज्ञांची काल रात्री भेट झाली.

सध्या या भागात स्तर -2 किंवा 3 चे निर्बंध आहेत जे आता बदलून कठोर लॉकडाऊन केले जातील. सध्या लंडन आणि दक्षिण-पूर्व इंग्लंडमध्ये ब्रिटनने कडक बंदोबस्त लावले आहेत. संपूर्ण इंग्लंडमध्ये कडक लॉकडाउन होणार नाही, परंतु अनेक भागात निर्बंध वाढविण्यात येतील, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

बर्मिंघममध्ये ख्रिसमसच्या आधी कडक लॉकडाउन सुरू करण्याची तयारी सुरू आहे. यामुळे, ख्रिसमस साजरा करण्यासाठी लोक एकमेकांच्या कुटुंबियांना भेटू शकणार नाहीत.  दरम्यान सणांच्या दिवशी फेस्टिव बबल्सच्या माध्यमातून लोकांना भेटता यावं  यासाठी बोरिस जॉनसनचे सरकार प्रयत्न करीत आहे, परंतु याचवेळी वैद्यकीय तज्ञ धोक्याचे इशारे देत आहेत.

आधीपेक्षा जास्त घातक ठरू शकतो कोरोनाचा नवा स्ट्रेन; संसर्गाची तीव्रता ७० टक्क्यांनी वाढली, तज्ज्ञांचा दावा

ब्रिटननंतर जगातील अन्य देशांमध्ये नवीन कोरोना विषाणूचे प्रमाण वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. अमेरिकेतील आघाडीची आरोग्य संस्था सीडीसीने म्हटले आहे की, 'अमेरिकेत कोरोनाचा एक नवीन स्ट्रेन आधीच अस्तित्वात आहे. कोरोनाच्या एक कोटी 70 लाख प्रकरणांपैकी जीन सीक्वेन्सिंग केवळ ५१ हजार प्रकरणांमध्ये केले गेले आहे आणि या कारणास्तव कदाचित कोरोनाच्या नवीन प्रकारबाबत माहिती मिळालेली नाही.' कोरोना संकटातच आता मानवी मेंदू खाणाऱ्या जीवाणूचा कहर; CDC चा सतर्कतेचा इशारा

United Kingdom Tier 4 lockdown

कोरोनाचा नवीन प्रकार कुठून आला?

तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोना व्हायरसचा नवीन प्रकार ब्रिटनमध्ये दिसून आला. नवीन स्ट्रेन खूप बदललेला आहे. बीबीसीच्या एका रिपोर्टनुसार  कोणत्याही एका रूग्णाच्या शरीरात जाऊन हा व्हायरस बदलल्याची शक्यता असू शकते. रोगप्रतिकारकशक्ती कमी असल्याने ती व्यक्ती व्हायरसला नष्ट करू शकली नाही आणि व्हायरसने रूप बदललं आहे. 

जगभरात सगळ्यात जास्त दिसून येतो कोरोनाचा  D614G प्रकार 

तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार चीनमध्ये जेव्हा कोरोना व्हायरस दिसून आला होता. त्यानंतर कोरोनाची अनेक रूपं दिसून आली होती. व्हायरसचा सगळ्यात सामान्य प्रकार D614G हा आहे. फेब्रुवारी महिन्यात युरोपात हा व्हायरस दिसून आला होता.  सध्या जगभरात पसरत असलेल्या नव्या स्ट्रेनशी हा प्रकार मिळता जुळता आहे. याव्यतिरिक्त कोरोना व्हायरसचा एक नवीन स्ट्रेन युरोपात पसरला होता. त्याचे नाव A222V होते. 

नवीन प्रकारच्या व्हायरस व्हायरसवर लस परिणामकारक ठरणार का?

सध्या वैज्ञानिकांना व्हायरसच्या नवीन स्ट्रेनबद्दल अधिक माहिती मिळालेली नाही. असं मानलं जात नाही. असं मानलं जात आहे की, नवीन प्रकारच्या व्हायरसवर लस परिणामकारक ठरेल. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार ब्रिटनमध्ये लोकांनी जी लस दिली जात आहे. त्यामुळे रोगप्रतिराकशक्ती मजबूत होत आहे. अशा स्थितीत व्हायरसने रूप बदलून शरीरावर आक्रमण केलं तरी लसीची क्षमता व्हायरसवर आक्रमण त्याला नष्ट करू शकते. 

Web Title: CoronaVirus News : Britain mutant new coronavirus strain chaos tier 4 lockdown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.