मोठा दिलासा! मानवी चाचणीत कोरोना लसीचे सकारात्मक परिणाम; कधी तयार होणार लस, जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2020 10:06 AM2020-07-03T10:06:58+5:302020-07-03T10:15:50+5:30
CoronaVirus News & Latest Updates : AZD1222 ही लस परिक्षणच्या अंतीम टप्प्यात आहे.
कोरोना व्हायरसच्या संक्रमणाचा सामना जगभरातील २१० पेक्षा जास्त देशांना करावा लागत आहे. कोरोना व्हायरसचा प्रार्दुभाव रोखणारी लस कधी उपलब्ध होणार याबाबत लोकांच्या मनात संभ्रमांचे वातावरण आहे. कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण असलेल्या देशांच्या क्रमवारीत भारत चौथ्या क्रमांकावर आहे. पाच दिवसांत कोरोनाचे एक लाख नवे रुग्ण आढळून आले आहेत.
देशातील रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. कोणत्याही आजाराची लस तयार होण्यासाठी वर्षानुवर्ष वाट पाहावी लागते. पण कोरोनाच्या लसीचे संशोधन वेगाने सुरू आहे. या वर्षाच्या अखेरपर्यंत लस उपलब्ध होऊ शकते. अशी आशा तज्ज्ञांना आहे. कोरोना लसीच्या चाचणीत ब्रिटेनची ऑक्सफोर्ड युनिव्हरर्सिटीची लस सगळ्यात पुढे आहे. कोरोनाच्या लसीबाबत सकारात्मक माहिती समोर येत आहे.
कोरोनाची लस तयार करत असलेल्या ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीत लसीचे सकारात्मक परिणाम दिसून आले आहेत. युनिव्हर्सिटीतील तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार मानवी चाचणीत या लसीचे सकारत्मक परिणाम दिसून आले आहेत. या युनिव्हर्सिटीतील वॅक्सीनोलॉजीच्या प्रोफेसर सारा गिल्बर्ट यांनी सांगितले की, AZD1222 ही लस परिक्षणच्या अंतीम टप्प्यात आहे.
व्हायरसशी लढण्यासाठी ही लस परिणामकारक ठरू शकते. रुग्णांना कोरोना व्हायरसपासून वाचवण्यासाठी ही लस प्रभावी ठरेल. अंतीम टप्प्यातील परिक्षण आणि पहिल्या दोन टप्प्यातील चाचण्यांचे निकाल याचे मुल्यांकन केले जात आहे. सध्या १८ वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या लोकांमध्ये ही लस परिणामकारक ठरेल की नाही. याशिवाय कोरोना रुग्णांची गंभीर स्थिती होण्यापासून वाचवण्यासाठी ही लस किती परिणामकारक ठरेल. याबाबत संशोधन सुरू आहे.
दरम्यान युरोपात या वर्षाच्या शेवटापर्यंत कोरोना व्हायरसची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशा स्थितीत लस लवकरात लवकर तयार होणं गरजेचं आहे. ऑक्सफोर्डच्या लसीबाबत २०२१ च्या सुरूवातीला चांगली माहिती समोर येण्याची शक्यता आहे. वैज्ञानिकांनी कोरोनाची लस तयार होण्याबाबत एक निश्चित वेळेची माहिती दिलेली नाही. त्यांनी सांगितले की, लस कधी तयार होणार याबाबत आम्ही सांगू शकत नाही. पण लस विकसित होण्याची वेळ ही मानवी चाचणीवर अवलंबून असेल.
CoronaVirus : लढ्याला यश! भारतात बनवलेली कोरोनावरची पहिली लस 'या' दिवशी येणार बाजारात
दिलासादायक! भारत बायोटेक कंपनीची लस बाजारात कधीपर्यंत उपलब्ध होणार? जाणून घ्या