धक्कादायक! चीनमध्ये 'असा' झाला कोरोनाचा प्रसार; WHO च्या पडताळणीआधीच खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2020 12:31 PM2020-07-05T12:31:57+5:302020-07-05T13:40:09+5:30

CoronaVirus : अहवालानुसार आजारी असलेल्या ४ जणांच्या शरीरात कोरोना व्हायरसचे एंटीबॉडीज मिळाले होते. पण तपासणीआधीच दोघांचा मृत्यू झाला होता. 

CoronaVirus News : China secretly found similar corona virus strain 2013 | धक्कादायक! चीनमध्ये 'असा' झाला कोरोनाचा प्रसार; WHO च्या पडताळणीआधीच खुलासा

धक्कादायक! चीनमध्ये 'असा' झाला कोरोनाचा प्रसार; WHO च्या पडताळणीआधीच खुलासा

Next

(image credit- rigzone, washingtone times)

कोरोना व्हायरसची माहामारी जगभरात पसरल्यानंतर चीनवर गंभीर स्वरूपाचे आरोप करण्यात आले आहेत. एका अहवालातील माहितीनुसार चीनमध्ये ७ वर्षांपूर्वीच अशा व्हायरसबाबात माहिती मिळाली होती. ज्याचा कोरोना व्हायरसशी घनिष्ठ संबंध होता. thetimes.co.uk च्या रिपोर्टनुसार चीनमध्ये २०१३ मध्ये सापडलेल्या या व्हायरसची माहिती लपवण्यात आली होती.

द सनमध्ये प्रकाशित झालेल्या माहितीनुसार वटवाघूळ आणि उंदंरांच्या प्रजातीत चीनमध्ये २०१३ मध्ये कोरोना व्हायरसशी जोडलेला स्टेन मिळाला होता. या व्हायरस स्टेनला चीनने अनेक वर्षांपासून वुहानच्या विवादित प्रयोगशाळेत ठेवले होते. काही दिवसांपूर्वी  WHO ने दिलेल्या माहितीनुसार त्यांची एक टीम कोरोना व्हायरसच्या उगम स्त्रोताबाबत पडताळणी आणि चौकशी करण्याासाठी जाणार होती. आत्ताच्या घडीला सात वर्षांपूर्वी सापडलेल्या व्हायरसच्या पुराव्यांना महत्वपूर्ण समजले  जात आहे.

पहली बार चीन में कैसे फैला कोरोना? WHO की जांच से पहले ये खुलासा

२०१२ मध्ये खोदकाम करत असलेल्या लोकांना ताप, कफ आणि न्युमोनिया यांसारख्या आजाारांची लागण झाली होती. यापैकी ३ जणांची स्थिती गंभीर होती. अहवालानुसार आजारी असलेल्या ४ जणांच्या शरीरात कोरोना व्हायरसचे एंटीबॉडीज मिळाले होते. पण तपासणीआधीच दोघांचा मृत्यू झाला होता. 

चीनच्या बॅटवुमन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डॉ. शी  झेंगली यांनी फेब्रुवारीमध्ये कोरोना व्हायरसवर एकॅडमिक पेपर्स तयार केले होते. Nature जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या माहितीनुसार वुहानमधील लॅबमध्ये वटवाघळांमधून मिळणारे RaTG13 व्हायरस ठेवण्यात आला होता.  

पहली बार चीन में कैसे फैला कोरोना? WHO की जांच से पहले ये खुलासा

जो  व्हायरस कोरोना व्हायरशी ९६.२ टक्के मिळताजुळता आहे. झेंगली यांच्या सहकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार RaTG13 हा खोदकामादरम्यान आढळून आलेल्या व्हायरसचा नमुना आहे. याबाबतची माहिती गुप्त ठेवण्यात आली होती.  याआधीच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी कोरोना व्हायरस चीनच्या वुहान इंस्टीट्यूट ऑफ वायरोलॉजीमधून आल्याचा दावा केला होता.  

आता हर्डा आणि चहाने होणार कोरोना विषाणूंपासून बचाव; आयआयटी तज्ज्ञांचा संशोधनातून खुलासा

जगभरातील 'या' १० मोठ्या कंपन्यामध्ये तयार होतेय कोरोनाची लस, जाणून घ्या कधीपर्यंत येणार

Web Title: CoronaVirus News : China secretly found similar corona virus strain 2013

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.