CoronaVirus News : पॉझिटिव्ह आल्यापासून उपचारांपर्यंत; लवकर बरं होण्यासाठी कोरोनाबाबत या गोष्टी माहीत करून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2021 11:15 AM2021-04-18T11:15:52+5:302021-04-18T11:27:41+5:30

CoronaVirus News :कोरोनाबाबत कितीतरी गोष्टी अद्याप शास्त्रज्ञांच्याही आकलनापलीकडच्या आहेत. पण जी माहिती उपलब्ध आहे ती सर्वांना माहित असणं महत्त्वाचं आहे.

CoronaVirus News : Corona test to corona treatment know all about coronavirus with corona symptoms | CoronaVirus News : पॉझिटिव्ह आल्यापासून उपचारांपर्यंत; लवकर बरं होण्यासाठी कोरोनाबाबत या गोष्टी माहीत करून घ्या

CoronaVirus News : पॉझिटिव्ह आल्यापासून उपचारांपर्यंत; लवकर बरं होण्यासाठी कोरोनाबाबत या गोष्टी माहीत करून घ्या

googlenewsNext

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं देशभरात कहर केला आहे. वाढत्या कोरोनाच्या प्रसाराला नियंत्रण ठेवणं अवघड झालं असून आता दिवसेंदिवस रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढताना दिसून येत आहे. लोकांच्या मनात कोरोनाचा प्रसार आणि चाचणी यांबाबत अजूनही संभ्रमाचं वातावरण आहे.  कोरोनाबाबत कितीतरी गोष्टी अद्याप शास्त्रज्ञांच्याही समजण्यापलीकडच्या आहेत. पण जी माहिती उपलब्ध आहे ती सर्वांना माहित असणं महत्त्वाचं आहे.

कोरोनाचं संक्रमण झाल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारे परिणाम दिसून येतात. शरीराच्या विशिष्ट अवयवांवर याचा परिणाम जाणवू शकतो. आपल्याला बरं वाटत नसल्यास कोणत्या स्थितीत आपण रुग्णालयात दाखल होणं आवश्यक आहे आणि गंभीर स्थिती नसल्यास घरी स्वतःला आयसोलेट करणं उत्तम ठरेल.

संक्रमणानंतरची स्थिती

सुरूवातीला कोरोनाची लागण झाल्यानंतर फारच सौम्य लक्षणं असतील किंवा काहीही लक्षणे दिसत नसतील. फार त्रास होत नसेल  घाबरून न जाता, स्वतःला इतरांपासून वेगळं केलं पाहिजे. कोणत्याही परिस्थितीत, निरोगी लोकांच्या संपर्कात येऊ नये आणि चुकून भेट झाली तरी मास्क (Mask) घालून, सुरक्षित शारीरिक अंतराच्या नियमांचे पालन करणं आवश्यक आहे. 

खूप ताप, अतिसार, श्वास घेण्यात अडचण अशी लक्षणे दिसत असतील तसंच पल्स ऑक्सिमीटरवरील ऑक्सिजनची पातळी 94 पेक्षा कमी होत असेल तर अशा रुग्णांनी त्वरित रुग्णालयात जाणं गरजेचं आहे. कारण अशी लक्षणे हे फुफ्फुसात संसर्ग झाल्याचं दर्शवतात

काय आहे हेमोफीलिया, या आजाराच्या नावानं लोक का घाबरतात?

फुफ्फुसांमध्ये कोरोनाचं संक्रमण वाढल्यास रुग्णाला श्वास घ्यायला त्रास होण्याची शक्यता असते. रक्तातील ऑक्सिजनची पातळी 92 किंवा त्यापेक्षा कमी होण्यास सुरुवात होते. छातीच्या एक्सरे मध्ये संसर्गाच्या खुणा दिसून येतात. अशा वेळी रुग्णाला सामान्य कोविड वॉर्डमधून आयसीयूमध्ये हलवण्याची गरज भासते. डॉक्टरांनी या संबंधी सुचना दिल्यास पुढील गोष्टी कराव्या लागतात.

या २ कारणांमुळे वेगानं होतोय कोरोनाचा प्रसार; AIIMS च्या संचालकांनी सांगितली मोठी कारणं

शेवटच्या गंभीर टप्प्यात रुग्णाला व्हेंटिलेटरवर ठेवण्याची वेळ आलेली असते. फुफ्फुसांची क्षमता कमी झालेली असल्यानं व्हेंटिलेटर लावलं जातं. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार या कालावधीत रुग्णाच्या शरीरातील विषाणू कमी होण्याची आणि फुफ्फुसांची क्षमता सुधारण्याची वाट पाहिली जाते. अनेकदा  थ्रोम्बोसिसपर्यंत स्थिती पोहोचते. शरीरातील कोणत्याही भागातील रक्तपुरवठा  थांबल्यानं अवयव निकामी व्हायला सुरूवात होते. 

चाचणी कधी करावी? 

कोरोनाच्या लक्षणांबाबत लोकांच्या मनात संभ्रमाचं वातावरण आहे. आधी पूर्वी ताप, सर्दी, खोकला ही कोरोनाची लक्षणं होती. आता कोरोनाच्या म्यूटेशननंतर जीभेत बदल होणं, ऐकण्याच्या क्षमतेवर परिणाम, अतिसार ही कोरोनाची लक्षणं दिसून आली आहेत. अशी लक्षणं असतील तर त्वरित चाचणी करून घ्या. आपल्या आजूबाजूच्या लोकांची काळजी घ्या. लक्षणं तीव्रतेनं जाणवण्याआधीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.


 

Web Title: CoronaVirus News : Corona test to corona treatment know all about coronavirus with corona symptoms

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.