CoronaVirus News : धोका वाढला! फुफ्फुसांव्यतिरिक्त 'या' अवयवांवर आक्रमण करतोय कोरोनाचा नवा स्ट्रेन; अशी ओळखा लक्षणं

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2021 04:38 PM2021-04-29T16:38:53+5:302021-04-29T16:48:17+5:30

CoronaVirus News & Latest Updates फुफ्फुसांव्यतिरिक्त  शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांवरही कोरोना व्हायरसमुळे गंभीर परिणाम होत आहे. तज्ज्ञांनी दिलेल्या  माहितीनुसार आता पूर्वीपेक्षा अधिक सावध राहावं लागणार आहे.

CoronaVirus News : Corona virus can affect many other organs besides the lungs | CoronaVirus News : धोका वाढला! फुफ्फुसांव्यतिरिक्त 'या' अवयवांवर आक्रमण करतोय कोरोनाचा नवा स्ट्रेन; अशी ओळखा लक्षणं

CoronaVirus News : धोका वाढला! फुफ्फुसांव्यतिरिक्त 'या' अवयवांवर आक्रमण करतोय कोरोनाचा नवा स्ट्रेन; अशी ओळखा लक्षणं

Next

कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेमुळे  देशाची परिस्थिती खूपच चिंतानजक झाली आहे. व्हायरसचं नवीन म्यूटेशन आणि आव्हानांमुळे जास्तीत जास्त लोकांच्या फुफ्फुसांवर गंभीर संक्रमण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. फुफ्फुसांव्यतिरिक्त  शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांवरही कोरोना व्हायरसमुळे गंभीर परिणाम होत आहे. तज्ज्ञांनी दिलेल्या  माहितीनुसार आता पूर्वीपेक्षा अधिक सावध राहावं लागणार आहे. कोरोना व्हायरस शरीराच्या कोणकोणत्या अवयवांवर आक्रमण करतो याबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. कर्करोग तज्ज्ञ डॉ. मनिष सिंगल यांनी अमर उजालाशी बोलताना याबाबत अधिक माहिती दिली आहे. 

तज्ज्ञांच्यामते कोरोन व्हायरस प्रथम श्वसनमार्गावर संक्रमित होतो, ज्यामुळे लोकांना खोकला होतो, श्वास घेण्यास त्रास होतो. तसेच यामुळे रुग्णाच्या फुफ्फुसांना गंभीर नुकसान होऊ शकते. निरोगी पेशींमध्ये प्रवेश केल्यामुळे हा व्हायरस शरीरात त्याची संख्या वाढवते, ज्यामुळे फुफ्फुसांच्या पेशींवर त्याचा नकारात्मक प्रभाव पडतो. परंतु अलिकडील प्रकरणांमध्ये, तज्ञांना असे आढळले आहे की व्हायरसचा परिणाम शरीराच्या इतर भागांवर देखील दिसून येतो.

शरीरातील बदलांवर लक्ष ठेवा

आरोग्य तज्ञांच्यामते शरीरात कोरोनाचा वावर वाढत असल्याने विविध भागांमध्ये तीव्र जळजळ होते. या व्यतिरिक्त जर एखाद्या व्यक्तीस आधीच मधुमेह, उच्च रक्तदाब किंवा लठ्ठपणासारख्या समस्या असतील तर त्या लोकांमध्ये धोका अधिक असू शकतो. ऑन्कोलॉजिस्ट डॉ मनीष सिंघल म्हणतात की अशा परिस्थितीत रुग्णाला शरीरातील सर्व लक्षणांवर नजर ठेवणे आणि  बदल झाल्यास विशेष काळजी घेणं आवश्यक आहे.

हृदयावर परिणाम

हृदय आणि चयापचय यासारखे आजार असलेल्या लोकांना कोविड -१९चा धोका जास्त असतो. तज्ञांना असे आढळले आहे की कोविड रुग्णांच्या हृदय स्नायूंमध्ये देखील तीव्र जळजळ होऊ शकते. हार्वर्ड हेल्थ पब्लिकेशनच्या म्हणण्यानुसार, कोविड -१९ मध्ये एक चतुर्थांश  रुग्णांच्या रक्तप्रवाहामध्ये ट्रोपोनिन एंजाइमचे प्रमाण वाढत आहेत, ज्यामुळे संक्रमित व्यक्तीला छातीत दुखणे, धडधडणे आणि तीव्र थकवा यासारखे लक्षणे जाणवू शकतात.

बाहेरून कोणीही आल्यास तुमच्या घरातही होऊ शकतो कोरोनाचा शिरकाव; CDC नं दिल्या गाईडलाईन्स

न्यूरोलॉजिकल समस्या

अनेक अहवाल असे सूचित करतात की कोविड -१९ रूग्णांमध्ये मानसिक त्रास, डोकेदुखी, चक्कर येणे आणि अंधुक दृष्टीची लक्षणे दिसतात. जामा न्यूरोलॉजीमध्ये प्रकाशित केलेल्या अभ्यासानुसार वुहानमधील २१४ रूग्णालयात दाखल झालेल्यांपैकी एक तृतीयांश  लोकांना आणि स्ट्रोक सारख्या गंभीर न्यूरोलॉजिकल समस्यांचा सामना करावा लागत आहे. अभ्यासात असा दावाही केला आहे की कोविड -१९ च्या दीर्घकालीन परिणामामुळे अल्झायमर आणि पार्किन्सन हे आजार उद्भवण्याची शक्यता असते. 

 लक्षणं असतानाही या ५ कारणांमुळे तुमची कोरोनाची टेस्ट येऊ शकते निगेटिव्ह; वेळीच सावध व्हा

किडनी खराब होणं

तज्ज्ञंनी दिलेल्या माहितीनुसार कोरोना रुग्णांना किडनीच्याही समस्यांचा सामना करावा लागत आहे. डॉक्टरांच्या मते व्हायरस आता किडनीच्या पेशींवरही हल्ला करत आहे. त्यामुळे सूज येण्याचा धोका वाढतो. परिणामी रुग्णाचे मुत्र उत्पादन कमी प्रमाणात होते. ही समस्या गंभीर संक्रमणाचे कारण ठरू शकते.  म्हणून शरीरातील बदलांकडे वेळीच लक्ष देणं गरजेचं आहे. जेणेकरून तज्ज्ञांशी संपर्क साधून आजाराची तीव्रता कमी करता येईल. 

Web Title: CoronaVirus News : Corona virus can affect many other organs besides the lungs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.