CoronaVirus News : मास्क लावूनही होऊ शकतो कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचा संसर्ग; जर तुम्हीही करत असाल याच चुका
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2021 01:07 PM2021-04-15T13:07:10+5:302021-04-15T13:26:41+5:30
CoronaVirus News & Latest Updates : कोरोना संसर्गाची प्रकरणे गेल्या वर्षीच्या तुलनेत दुप्पटीने वाढत आहेत. मास्कचा वापर करूनही संक्रमणाच्या केसेससमध्ये वाढ होत आहे ही गंभीर बाब आहे.
भारतात पुन्हा एकदा कोरोना विषाणूच्या लाटेनं कहर केला आहे. कारण गेल्या २४ तासात कोरोना विषाणूच्या संसर्गाची २ लाखाहून अधिक नवीन प्रकरणे नोंदली गेली आहेत. एकीकडे सरकार लस घेण्यासाठी लोकांवर दबाव आणत आहे. तर दुसरीकडे कोरोना संसर्गाची प्रकरणे गेल्या वर्षीच्या तुलनेत दुप्पटीने वाढत आहेत. मास्कचा वापर करूनही संक्रमणाच्या केसेससमध्ये वाढ होत आहे ही गंभीर बाब आहे. मास्क लावल्यानंतर लोकांकडून वारंवार काही चूका केल्या जात आहेत. त्यामुळे संक्रमणाच्या केससमध्ये झपाट्यानं वाढ झालेली पाहायला मिळत आहे. मास्क वापरताना कोणत्या चूका टाळायला हव्यात याबाबत आम्ही तुम्हाला काही महत्वाच्या गोष्टी सांगणार आहोत.
बरेच लोक असे आहेत की जे मास्क घालतात, परंतु त्यांना मास्क घालण्याचा आणि तो वापरण्याचा योग्य मार्ग माहीत नाही. यामुळे ते अशा काही चुका करतात ज्यामुळे त्यांना त्रास सहन करावा लागतो आणि मास्क घातल्यानंतरही ते संसर्गाला बळी पडतात. मास्क लावताना कोणत्या 5 चुका महागात पडू शकतात हे जाणून घ्यायला हवं.
मास्कला सतत हात लावणं
अनेकदा आपण लोकांना पाहिले आहे की मास्क घातल्यानंतर ते त्यास पुन्हा पुन्हा स्पर्श करत असतात. कधीकधी नाकातून किंवा कधी तोंडच्या बाजूने स्पर्श केला जातो. ही सर्वात मोठी चूक आहे. मास्कच्या बाहेरील भागात संसर्ग पसरविणारे व्हायरस असू शकतात, म्हणून मास्कला वारंवार स्पर्श करू नका. तसेच, पुन्हा पुन्हा तोच मास्क घालू नका, कारण जर आपण मास्क काढून टाकला आणि संक्रमित झालेल्या जागी ठेवला तर पुन्हा तो परिधान केल्याने संक्रमित कण नाक आणि तोंडातून शरीरात प्रवेश करू शकतात.
मास्क लावूनही नाक उघडं राहणं
आपण मास्क घातलेले बरेच लोक तोंड झाकलेले पाहिले असतील परंतु त्यांचे नाक खुले असते. अमेरिकेच्या सीडीसी (सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन) च्या मते, आपण एक फेस मास्क घातला पाहिजे ज्याने आपले नाक, तोंड तसेच हनुवटी झाकली पाहिजे. मास्क तोंडाला चांगला घट्ट बसला पाहिजे जेणेकरून बाजूला अंतर नसेल. आपण मास्क व्यवस्थित घातला नाही तर संसर्ग होण्याचा धोका आहे.
मास्क घातल्यावर आणि काढल्यानंतर हात न धुणं
आपल्या चेहर्याच्या मास्कला स्पर्श केल्यानंतर आपण प्रत्येक वेळी आपले हात धुवावेत. मास्क घालण्यापूर्वी आणि ते काढण्यापूर्वी साबणाने पाण्याने किंवा सॅनिटायझरने हात पूर्णपणे स्वच्छ करणे खूप महत्वाचे आहे. मास्क घालण्यापूर्वी हात धुण्यामुळे हे सुनिश्चित होईल की मास्कवर कोणत्याही प्रकारचे संक्रमण नाही तर मास्क काढून टाकल्यानंतर आपले हात धुणे आवश्यक आहे जेणेकरून आपल्या हातात आलेल्या मास्कवरील संक्रमित कण निघून जाऊ शकतील.
भारतात ४ ते ६ परदेशी कोरोना लसी येणार; जाणून घ्या किंमत किती असणार
मास्कचा योग्य वापर
केवळ मास्क परिधान करणे पुरेसे नाही, स्वच्छ मास्क असणं महत्वाचे आहे. आपण डिस्पोजेबल मास्क वापरल्यास काही फरक पडत नाही. परंतु जर आपण फॅब्रिकसह रीयूज मास्क वापरत असाल तर गरम पाण्याने आणि डिटर्जंटने ते चांगले स्वच्छ करा आणि नंतर उन्हात कोरडे करा. वारंवार न धुता मास्क घालण्याने संसर्ग होण्याचा धोका वाढतो.
लस घेतली तरी कोरोना होतोच, मग कशासाठी घ्यायची लस?; डॉ. संजय ओक यांनी सांगितले अनुभवाचे बोल
उन्हाळ्याच्या हंगामात वारंवार घाम आल्यामुळे जास्त काळ मास्क परिधान केल्यामुळे मास्क ओला होऊ शकतो. जर मास्क ओला झाला तर तो त्वरित बदला. डब्ल्यूएचओकडून असा सल्लाही देण्यात आला आहे की कोरोना व्हायरसपासून बचाव करण्यासाठी ओला मास्क प्रभावी ठरणार नाही. तर जर मास्क मॉईश्चराइझ झाला तर तो बदला. तसेच, आपल्या मास्कचे फॅब्रिक 3 थरांसह असणं खूप महत्वाचे आहे.
(टिप- वरील माहिती आणि खबरदारीचे उपाय आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून कोणताही दावा करत नाही. कोणतीही समस्या उद्भवण्याआधीच मास्कच्या वापराबाबत तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्यावा.)