खुशखबर! ३ महिन्यानंतर आपोआप चांगली होताहेत कोरोनामुळे संक्रमित झालेली फुफ्फुसं, तज्ज्ञांचा दावा 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2020 02:50 PM2020-09-07T14:50:39+5:302020-09-07T14:57:11+5:30

कोरोनाचं गंभीर स्वरुपात इन्फेक्शन होऊन गेल्यानंतर फुफ्फुसांची बिघडलेली स्थिती आपोआप सुधारते.  साधारपणे तीन महिन्यांच्या कालावधीत फुफ्फुसं आपोआप सुरळीतपणे कार्य करू लागतात.

CoronaVirus News : Coronavirus lungs damaged repaired in three months | खुशखबर! ३ महिन्यानंतर आपोआप चांगली होताहेत कोरोनामुळे संक्रमित झालेली फुफ्फुसं, तज्ज्ञांचा दावा 

खुशखबर! ३ महिन्यानंतर आपोआप चांगली होताहेत कोरोनामुळे संक्रमित झालेली फुफ्फुसं, तज्ज्ञांचा दावा 

googlenewsNext

कोरोना व्हायरसनं संक्रमित झाल्यानंतर सगळ्यात जास्त नुकसान फुफ्फुसांचं होतं. व्हायरसच्या संक्रमणामुळे फुफ्फुसांवर गंभीर परिणाम झालेला अनेक रिसर्चमधून दिसून आला आहे. संशोधनादरम्यान दिसून आलं होतं की गंभीर स्थितीतील कोरोना रुग्णांना फुफ्फुसांच्या समस्येचा दीर्घकाळ सामना करावा लागू शकतो. दरम्यान एक सकारात्मक माहिती समोर येत आहे. नुकत्यात करण्यात आलेल्या रिसर्चनुसार कोरोनाचं इन्फेक्शन होऊन गेल्यानंतर फुफ्फुसांची बिघडलेली स्थिती आपोआप सुधारते.  साधारपणे तीन महिन्यांच्या कालावधीत फुफ्फुसं आपोआप सुरळीतपणे कार्य करू लागतात.

 ब्रिटिश टेलिग्राफच्या रिपोर्टनुसार जवळपास तीन महिन्याच्याआत फुफ्फुसं आपली कार्यक्षमता सुधारतात. या संशोधनानं आशेचा किरण दाखवला आहे.  या अभ्यासात दिसून आलं की, कोरोनाचं संक्रमण झालेल्या व्यक्तीला  दीर्घकाळ समस्यांचा सामना करावा लागणार नाही. या संशोधनात कोरोनाच्या संक्रमणातून रिकव्हर झालेल्या रुग्णांच्या शरीरात १२ आठवड्यानंतर फुफ्फुसांमध्ये कोणतंही संक्रमण दिसून आलं नाही. फुफ्फुसांची कार्यक्षमता  सुधारली होती. दरम्यान कोरोनाचे उपचार करत असलेल्या डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार रिकव्हर झाल्यानंतर अनेक आठवड्यांपर्यंत रुग्णांमध्ये साईड इफेक्ट्स दिसू शकतात

या अभ्यासासाठी ऑस्ट्रियात 86 रुग्णांची तपासणी करण्यात आली. हे रुग्ण 29 एप्रिल ते 9 जूल दरम्यान रुग्णालयात भरती झाले होते. रुग्णालयातून सोडल्यानंतर त्यांची 6 ते 12 आठवड्यानंतर तपासणी करण्यात आली. 88 टक्के रुग्णांच्या फुफ्फुसांमध्ये संक्रमण दिसून आलं.  पण 12 आठवड्यात मात्र संक्रमणाचं प्रमाण 56 टक्क्यांनी कमी झालं होतं. आणि फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढली होती. या संशोधनात सहभागी असलेल्या रुग्णांचे वय 60 वर्षांच्या आसपास होते. 65  टक्के पुरूषांचा समावेश होता. कोरोनातून बाहेर आलेल्या अर्ध्या रुग्णांना स्मोकिंगची सवय होती. 20 टक्के रुग्णांना कोरोना विषाणूंच्या संक्रमणामुळे रुग्णालयात भरती व्हायची वेळ आली होती. 

Coronavirus

दरम्यान जगभरात कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. अनेक देश कोरोना संकटाचा सामना करत आहेत. काही देशांमधील मृतांचा आकडा हा दिवसागणिक वाढत असून गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. जगभरातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या ही तब्बल 27,292,583 वर गेली असून आतापर्यंत 887,554 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. भारतातही कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल 42 लाखांचा टप्पा पार केला आहे. 

गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत विक्रमी वाढ झाली असून ब्राझीलला मागे टाकत कोरोनाग्रस्त देशांच्या आकडेवारीत भारत दुसऱ्या स्थानी पोहोचला आहे. सोमवारी (7 सप्टेंबर) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 90,802 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 1,016 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 42,04,614 वर पोहोचली असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 71,642  वर पोहोचला आहे. 

हे पण वाचा-

हृदयरोग, कॅन्सर आणि डायबिटीसमुळे दरवर्षी होतात ४ कोटींपेक्षा अधिक मृत्यू; WHO चा दावा

रडावंस वाटत असेल तर मनमोकळेपणानं रडा; अश्रूंना रोखल्यानं आरोग्यावर 'असा' होतो परिणाम

लढ्याला यश! झाडांमधील रासायनिक तत्वाने कोरोना विषाणू नष्ट होणार; भारतीय तज्ज्ञांचा दावा

Web Title: CoronaVirus News : Coronavirus lungs damaged repaired in three months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.