कोरोनापासून बचावासाठी 'हा' नवा नियम पाळावाच लागणार; WHO च्या तज्ज्ञांची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2020 11:41 AM2020-12-09T11:41:11+5:302020-12-09T11:49:31+5:30
World Health organization : कोरोनाकाळात लोकांनी आपल्या प्रियजनांच्या जास्त जवळ जाण्यापेक्षा दूर राहून संवाद साधायला हवा.
कोरोना व्हायरसपासून बचावासाठी जागतिक आरोग्य संघटनेसह जगभरातील संपूर्ण देशातील वैज्ञानिकाचे प्रयत्न सुरू आहेत. आता पुन्हा एकदा जागतिक आरोग्य संघटनेनं लोकांना सुट्टीदरम्यान काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. जागतिक आरोग्य संघटनेतील तज्ज्ञांनी लोकांना गळाभेट करण्यापासून रोखण्यासाठी आवाहन केलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे आपातकात्कालीन प्रमुख डॉ. माइकल रेयान यांनी कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी सोमवारी दिलेल्या माहितीनुसार अमेरिकेत कोरोना व्हायरसच्या संक्रमणामुळे होत मृतांचा आकडा वाढत आहे. म्हणूनच लोकांनी आपल्या प्रियजनांच्या जास्त जवळ जाण्यापेक्षा दूर राहून संवाद साधायला हवा.
डॉ. रेयान यांनी दिलेल्या माहितीनुसार अमेरिकेत माहामारीचा प्रकोप वाढत आहे. अमेरिकेत चांगली आरोग्य प्रणाली आणि अधुनिक तंत्रज्ञान विकसित आहे. तरिही कमी कालावधीत संक्रमण झाल्याने एक ते दोन लोकांचा मृत्यू होणं ही आश्चर्यकारक गोष्ट आहे. रेयान यांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोना व्हायरसचे एकूण तीन तृतीयांश केसेस अमेरिकेत आहेत.
जॉन हॉपकिंस युनिव्हर्सिटीने दिलेल्या माहितीनुसार देशात संक्रमणामुळे आतापर्यंत २ लाख ८० हजार लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. गळाभेट घेणं हा जवळचा संपर्क मानला जाऊ शकतो. संयुक्त राष्ट्राच्या एंजेसीने कोरोना व्हायरसच्या संक्रमणाचा जास्त धोका असलेल्या देशातील लोकांना गळाभेट न घेण्याचे आवाहन केलं आहे. खुशखबर! केंद्राने पहिल्यांदाच जाहीर केला कोरोना लसीकरणाचा प्लॅन; सगळ्यात लसीकरण कोणाचं?
कोविड -१९ वर डब्ल्यूएचओच्या तांत्रिक प्रमुख मारिया व्हॅन केरखोव्ह म्हणाल्या की,'' संक्रमणाच्या बहुतेक केसेस एकत्र बसून खाणे व एकत्र राहिल्याने समोर आल्या आहेत. तथापि, व्हायरसचा प्रसार कसा झाला हे सांगणे कठीण आहे.'' रायन म्हणाले की, "साथीच्या रोगाच्या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेने लोकांना एकमेकांपासून दूर राहण्यास सांगितले आहे.'' ब्रिटनचे मुख्य वैद्यकीय अधिकारी ख्रिस व्हट्टी यांनीही नोव्हेंबरमध्ये ब्रिटीश नागरिकांना सांगितले होते की, ''जर वृद्ध प्रियजनांना जिवंत आणि निरोगी ठेवायचं असेल तर त्यांना मिठी मारू नका. या सुट्ट्यांमध्ये मिठी मारणे आणि त्यांचे चुंबन घेण्यास टाळा.'' आनंदाची बातमी! 'या' देशात आजपासून सामान्यांना मिळणार कोरोनाची लस; भारतातही तयारीला सुरूवात